Marathi govt jobs   »   Maha TAIT 2023   »   शिक्षक भरतीचा रोडमॅप
Top Performing

शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर, शिक्षक भरती 2023 ची प्रक्रिया महिन्याभरात सुरु होणार

शिक्षक भरतीचा रोडमॅप

शिक्षक भरतीचा रोडमॅप: शिक्षक भरती 2023 संदर्भात एक अपडेट प्राप्त झाला आहे. शिक्षणमंत्र्यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत येत्या एक महिन्यात पवित्र पोर्टल द्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु होणार असल्याचे सांगितले. याआधी शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी विधान परिषदेमध्ये शिक्षक भरतीचा रोडमॅप दिनांक 26 जुलै 2023 रोजी जाहीर केला होता. महाराष्ट्रात प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक पदांची सुमारे 30000 पदांची भरती 2023 मध्ये होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शिक्षण परीक्षा मंडळाने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 घेतली ज्याचा निकाल निकाल 24 मार्च 2023 रोजी जाहीर झाला परंतु त्यानंतर पुढील प्रक्रिया पार पडली नाही. यासंदर्भात एक SMPIL याचिका औरंगाबाद खंडपिठाने शिक्षण विभागातील चुकीच्या पद्धतीने पदोन्नती दिल्या प्रकरणी भरतीस स्थगिती (स्टे) दिली होती. आता भरती प्रक्रियेवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे आता शिक्षणमंत्र्यांनी परिषदेमध्ये शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर केला. आज या लेखात आपण शिक्षक भरती 2023 च्या अपडेट आणि रोडमॅप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.

शिक्षक भरतीचा रोडमॅप: विहंगावलोकन

महाराष्ट्रात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती केल्या जाते. आता शिक्षक भरती 2023 ची प्रक्रिया महिन्याभरात सुरु होणार आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 निकाल लागल्यावर पुढील प्रक्रियेसंदर्भात एक सविस्तर माहिती शिक्षण मंत्र्यांनी दिली होती. शिक्षक भरतीचा रोडमॅपबद्दल संक्षिप्त स्वरुपात माहिती खालील ताक्त्यावरून मिळवू शकतात.

शिक्षक भरतीचा रोडमॅप: विहंगावलोकन
श्रेणी अद्ययावत माहिती
विभागाचे नाव शिक्षण विभाग महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023
पदाचे नाव

शिक्षक

एकूण रिक्त पदे सुमारे 30000
लेखाचे नाव शिक्षक भरतीचा रोडमॅप
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
शिक्षण विभागाचे अधिकृत संकेतस्थळ www.education.maharashtra.gov.in

शिक्षक भरती 2023 बद्दल अद्ययावत माहिती

महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षकांचे रोस्टर अनुशेष प्रक्रिया पूर्ण झाली असून कोणावरही अन्याय होणार नाही, या दृष्टीने न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार येत्या महिन्याभरात ही भरती प्रक्रिया सुरू होईल आणि जे उमेदवार ज्या जिल्ह्यात अर्ज करतील त्याच जिल्ह्यात त्यांना कायम नोकरी करावी लागेल. जेणेकरून शिक्षणाचा दर्जाही अधिकाअधिक सुधारेल. यादृष्टीने शिक्षण विभागाने निर्णय घेतला असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी 15 ऑगस्ट 2023 रोजी पत्रकार परिषदेत दिली.

सिंधुदुर्ग येथे स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण सोहळ्यानंतर चहापान कार्यक्रमातशालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर पत्रकारांशी बोलत होते. यावेळी केसरकर म्हणाले, जिल्ह्यात शिक्षकांची संख्या कमी आहे आणि हा प्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यादृष्टीने अनुशेष भरून काढण्यासाठी असलेला रिझर्वेशन कोटा आणि पद निश्चिती याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. त्यामुळे आता येत्या एक महिन्यात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरु होणार आहे. शिक्षक भरती 2023 चा हा अपडेट डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

शिक्षक भरती 2023 चा अपडेट (16 ऑगस्ट 2023)

शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तपशील_3.1
शिक्षक भरती बद्दल अद्ययावत माहिती

शिक्षक भरतीच्या रोडमॅप बद्दल माहिती

तब्बल अडीच लाख बेरोजगार उमेदवारांना प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरतीचा मुहूर्त येत्या ऑक्टोबर महिन्यात निघाला आहे. सध्या कार्यरत शिक्षकांची आधार निहाय संचमान्यता अखेरच्या टप्यात आहे. त्यानंतर नव्या शिक्षक भरतीसाठी पवित्र पोर्टल सुरु करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने आखले आहे. विद्यार्थ्यांच्या आधार व्हॅलिडेशननुसारच शिक्षकांची 2022-23 ची संचमान्यता करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर रिक्त पदांचे चित्र स्पष्ट होईल व त्यानंतरच नव्या भरतीची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. प्राप्त माहितीनुसार शिक्षक पदाची नियुक्तीपत्रे 21 ऑक्त्बर 2023 पर्यंत देण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. या लेखात आपण शिक्षक भरतीचा रोडमॅप बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2023

शिक्षक भरतीच्या रोडमॅप नुसार संभाव्य वेळापत्रक

शिक्षक भरतीच्या रोडमॅप नुसार संभाव्य वेळापत्रक खालील तक्त्यात प्रदान करण्यात आले आहे.

शिक्षक भरतीच्या रोडमॅप नुसार संभाव्य वेळापत्रक
पवित्र पोर्टल वर जाहिराती अपलोड करणे 15 ऑगस्ट 2023 ते 31 ऑगस्ट 2023
उमेदवारांना प्राधान्यक्रम देण्याची सुविधा 01 सप्टेंबर 2023 ते 15 सप्टेंबर 2023
निवड यादी प्रसिद्ध करणे 10 ऑक्टोबर 2023
मुलाखतीशिवाय घेण्यात येणाऱ्या सर्व शाळांसाठी कागदपत्र पडताळणी व निवड पत्र देणे 11 ऑक्टोबर 2023 ते 20 ऑक्टोबर 2023
पदस्थापनेसाठी समुपदेशनाचे आयोजन 21 ऑक्टोबर 2023 ते 24 ऑक्टोबर 2023

शिक्षक भरतीच्या रोडमॅप मधील महत्वपूर्ण मुद्दे

शिक्षण मंत्री श्री. दीपक केसरकर यांनी परिषदेमध्ये सांगितलेल्या माहितीमधील महत्वाचे मुद्दे खालीलप्रमाणे आहे.

  • राज्यातील शिक्षकांची रिक्त पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू करण्यात येणार आहे
  • राज्यातील शिक्षकांच्या रिक्त पदापैकी 30 हजार पदे ‘पवित्र’ प्रणालीद्वारे भरण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी विधान परिषदेत दिली. राज्यातील शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांतील शिक्षकांच्या रिक्त पदे भरण्यासंदर्भात सदस्य सुधाकर अडबाले यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना मंत्री श्री.केसरकर बोलत होते.
  • मंत्री श्री. केसरकर म्हणाले की, शिक्षण अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणीच्या (टेट) आयोजनाबाबतचे वेळापत्रक उच्च न्यायालयात सादर करण्यात आले होते. त्यानुसार शिक्षक अभियोग्यता व बुद्ध‍िमत्ता चाचणी 22 फेब्रुवारी, 2023 ते 3 मार्च,2023 या कालावधीत आयबीपीएस कंपनीमार्फत घेण्यात आली असून, परीक्षेमध्ये उमेदवारांस प्राप्त गुणांकनाच्या आधारे राज्यात अंदाजे 30 हजार शिक्षकांची पदे भरण्याची कार्यवाही सुरू आहे.
  • यानुसार जिल्हा परिषदांच्या बिंदुनामावली व विषयांची माहिती पोर्टलवर भरून पदभरती करण्याचा कार्यक्रम असा शिक्षणमंत्री यांनी जाहीर केला तो वरील तक्त्यात देण्यात आला आहे.
  • तसेच शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी ‘पवित्र’ प्रणालीमार्फत नियमित शिक्षकांची नियुक्ती होईपर्यंत निवृत्त शिक्षकांना मानधन तत्त्वावर तात्पुरती नियुक्ती देण्याबाबतच्या सूचना देखील आयुक्त (शिक्षण), सर्व विभागीय आयुक्त व मुख्य कार्यकारी यांना 07 जुलै 2023 रोजीच्या शासन पत्रान्वये देण्यात आली असल्याची माहिती मंत्री श्री. केसरकर यांनी यावेळी दिली.
शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तपशील_4.1
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर, जाणून घ्या संपूर्ण तपशील_6.1

FAQs

शिक्षक भरती 2023 बद्दल काय अपडेट काही?

शिक्षक भरती 2023 ची प्रक्रिया महिन्याभरात पवित्र पोर्टलद्वारे सुरु होणार आहे.

शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर झाला का?

होय, शिक्षक भरतीचा रोडमॅप जाहीर झाला.

शिक्षक भरतीचा रोडमॅप कोणी जाहीर केला?

शिक्षक भरतीचा रोडमॅप शिक्षणमंत्री श्री. दीपक केसरकर यांनी विधानपरिषदेमध्ये जाहीर केला.

शिक्षक भरतीच्या रोडमॅपनुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरती कधीपर्यंत पूर्ण होईल?

शिक्षक भरतीच्या रोडमॅपनुसार पहिल्या टप्प्यातील शिक्षक पदभरती 20 ऑगस्ट 2023 पर्यंत पूर्ण होईल.