Marathi govt jobs   »   Study Materials   »   शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023
Top Performing

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023, 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023: शिवाजी महाराज मराठा साम्राज्याचे संस्थापक आणि प्रथम छत्रपती म्हणून ओळखले जातात. भोसले कुळातील या राजाने विजापूरच्या आदिलशाहीविरुद्ध आणि मोगल साम्राज्याविरुद्ध संघर्ष करून मराठा स्वराज्य स्थापन केले. त्यानंतरसर्वमान्यता मिळावी या हेतूने  शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा पार पडला. आज संपूर्ण महाराष्ट्रात उत्साहात तिथीनुसार 350 वा शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 रायगड येथे संपन्न होत आहे. आज या लेखात आपण याच शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवणार आहोत.

प्रौढ प्रताप पुरंदर, क्षत्रिय कुलावतंस,
सिंहासनाधिश्वर, महाराजाधिराज,
शिव छत्रपती श्री शिवाजी महाराजांना मानाचा त्रिवार मुजरा .!!!
शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023: विहंगावलोकन

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 संपूर्ण विश्वात अतिउत्साहात साजरा केल्या जातो. शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात मिळावा.

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय इतिहास
लेखाचे नाव शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023
साम्राज्य मराठा साम्राज्य
शिवाजी महाराज राज्याभिषेक 06 जून 1974
2023 मध्ये शिवाजी महाराज राज्याभिषेक दिन 02 जून 2023 (तिथीनुसार)
राज्याभिषेक कोणी केला पंडित गागाभट्ट

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023

भोसले कुळाचा उदयपूरातील क्षत्रिय घराण्याशी संबंध होता. हे सिद्ध करण्यामध्ये बाळाची अवजी आणि त्यांचे काही इतर सरदाराने पुढाकार घेतला होता. खूपच चढाओढी नंतर भोसले कुळ हे प्रभू रामचंद्रांच्या सूर्य वंशातील शुद्ध क्षत्रिय कुळ आहे. हे सिद्ध झालं. या भक्कम पुराव्याची शहानिशा केल्या नंतर पं. गागाभट्ट महाराष्ट्रात येऊन महाराजांच्या राज्याभिषेकाचे प्रमुख पुरोहित म्हणून त्यांनी जबाबदारी घेतली. त्या नंतर 6 जून 1674 मध्ये महाराजांवर रायगड मध्ये राज्यभिषेक झाला. 

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023
रायगडावरील शिवाजी महाराजांची समाधी

या सोहळ्यासाठी सिंहासनावर बसण्यासाठी बत्तीस हृदयांचे सुवर्ण सिंहासन तयार केले होते. तिजोरीत असलेल्या सर्व खजिन्यातून मौल्यवान दागिने शोधून सिंहासनावर बसवले गेले. रायरिकाला ‘रायगड’ असे नाव देण्यात आले. सिंहासनाची जागा किल्ला म्हणून ठेवली होती. सात महान नद्या आणि मुख्य नद्या, समुद्र आणि नामांकित तीर्थांचे पाणी आणले गेले. सोन्याचे कलश आणि भांडी बनवली. राजाला आठ कलश आणि आठ भांड्यांनी अभिषेक करायचे ठरवून, ‘शालिवाहन शके 1596, ज्येष्ठ महिन्याची शुक्ल त्रयोदशी हा शुभ दिवस म्हणून पाळण्यात आला आणि शुभ मुहूर्त ठेवण्यात आला.’

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याबद्दल थोडक्यात माहिती

6 जून 1674 रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक झाला. भारतीय इतिहासात या घटनेकडे खूप महत्वाची घटना म्हणून पाहिले जाते. कारण त्या काळात संपूर्ण भारत परकिय आक्रमणांनी ग्रासला होता आणि एवढ्या मोठ्या शत्रूंना तोंड देऊन छत्रपतींनी आपला राज्याभिषेक केला होता. ही भारतीय इतिहासातील सामान्य गोष्ट नव्हती.

राज्याभिषेक करून राजा ही पदवी धारण करुन भारतातील परकीयांना शह देणे ही त्या काळात खुप धाडसाची कामगिरी छत्रपतींनी केली म्हणून भारतीय इतिहासात या घटनेकडे एक युगप्रवर्तक घटना म्हणून बघितले जाते. राज्याभिषेक झाल्यानंतर छत्रपतींनी अनेक सुधारणा घडवून आणल्या. परकीय शत्रूंना शह देणारा छत्रपती म्हणून शिवाजी महाराजांकडे बघितले जाऊ लागले.

या सोहळ्यासाठी विविध राज्यांचे राजदूत, प्रतिनिधी, परदेशी उद्योगपतींनाही आमंत्रित करण्यात आले होते. शिवाजीने छत्रपती ही पदवी धारण केली. यामध्ये काशीचे पंडित विश्वेश्वर जी भट्ट यांना विशेष आमंत्रित करण्यात आले होते, परंतु त्यांच्या राज्याभिषेकानंतर केवळ 12 दिवसांनी त्यांच्या आईचे निधन झाले. या कारणास्तव, 4 ऑक्टोबर 1674 रोजी त्यांचा दुसऱ्यांदा राज्याभिषेक झाला. दोन वेळा झालेल्या या सोहळ्यात सुमारे 50 लाख रुपये खर्च झाले. या सोहळ्यात हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेची घोषणा करण्यात आली . विजयनगरच्या पतनानंतर दक्षिणेतील हे पहिले हिंदू राज्य होते  एखाद्या स्वतंत्र राज्यकर्त्याप्रमाणे स्वराज्याला स्वतःची ओळख मिळाली.

शिवाजी महाराज छत्रपती झाले

राज्याभिषेकच्या दिवशी पहाटे उठून, मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर आंघोळ करून, कुलदेवतेला स्मरून, प्रमुख ब्राह्मणांच्या पायी पडून, राज्याभिषेक सुरू झाला. यावेळी शिवाजीमहाराजांनी शुभ्र वस्त्र परिधान केले होते. गळ्यात फुलांच्या माळा घातलेल्या होत्या. राज्याभिषेकात राजाचा अभिषेक आणि डोक्यावर छत्र धरणे हे दोन प्रमुख विधी होते. दोन फूट लांब दोन फूट रुंद अशा सोन्याने मढवलेल्या मंचावर शिवाजी महाराज बसले. आठ प्रधान नद्यांतून आणलेल्या पाण्याने शिवाजीमहाराजांबर अभिषेक केला गेला. सोळा सुवासिनींनी पंचारती ओवाळली. यानंतर शिवाजीने लालरंगाचे वस्त्र परिधान केले. जडजवाहिर, अलंकार परिधान केले. गळ्यात फुलांचे हार घातले. एक राज मुकुट घातला. आपल्या ढाल तलवार आणि धनुष्यबाणाची पूजा केली आणि मुहूर्ताच्या वेळी राजसिंहासनाच्या दालनात प्रवेश केला. शिवाजी महाराज ३२ मण सोन्याच्या सिंहासनावर आरुढ झाले. सोळा सवाष्णींनी त्यांना ओवाळले. ब्राह्मणांनी मोठ्या स्वरात मंत्रांचे उच्चारण केले. ’शिवराज की जय’ शिवराज की जय’ च्या घोषणा दिल्या गेल्या. सोन्याचांदीचे फुले उधळली गेली. विविध तालवाद्य-सूरवाद्यांच्या जयघोषात आसमंत भरून गेले. ठरल्याप्रमाणे प्रत्येक गडावरून तोफा डागल्या गेल्या. मुख्य पुरोहित गागाभट्टांनी पुढे येऊन राजांच्या डोक्यावर मोत्याची झालर ठेवत ‘शिवछत्रपती’ म्हणून आशीर्वाद दिला.

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023: शिवशक कालगणना आणि चलन निर्मिती 

शिवशक ही नवीन कालगणना सुरू झाली. छत्रपतींचा राज्याभिषेक झाल्यानंतर राजांनी शिवशक ही नवीन कालगणना सुरु केली. आजही शिवशक ही कालगणना अस्तित्वात आहे. या कालगणनेमागे राजांचा दूरदृष्टीचा महत्वपूर्ण गुण दिसून येतो.

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023
मुद्रा

शिवराज्याभिषेकानंतर महाराजांनी शिवराई व होन या दोन चलनाची निर्मिती केली. शिवराई ही चांदीची नाणी व होन ही सोन्याची नाणी चलनात आणली. राजांनी राज्यकारभाराच्या सोयीसाठी ही चलन निर्मिती केली. शिवरायांनी राज्याभिषेक झाल्यानंतर राज्यकारभारासाठी मराठी भाषेचा वापर केला. मराठी भाषेस महत्त्व दिले. परकीय भाषा वापरण्यापेक्षा आपली मातृभाषा महाराजांनी राज्यकारभारात वापरली. यातून महाराजांचे भाषा प्रेम दिसून येते.

अण्णासाहेब चांदणे कृषी तंत्रनिकेतन भरती 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

छत्रपती शिवाजी महाराजांशी संबंधित इतर लेख

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023, 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा_7.1

FAQs

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 कधी साजरा केल्या जात आहे?

शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळा 2023 दिनांक 02 जून 2023 रोजी साजरा केल्या जात आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कधी झाला?

छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा 06 जून 1674 मध्ये झाला होता.

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा कोणी पार पाडला?

विद्वान पंडित गंगाभट्ट यांनी शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला.