Table of Contents
Social Reformers of Maharashtra- Part 1, In this article, you will get detailed information about the Social Reformers of Maharashtra. In Part 1 You will get information about Social Reformers Bhau Daji Lad, Balshastri Jambhekar, and Sarvajanik Kaka.
Social Reformers of Maharashtra- Part 1 | |
Category | Study Material |
Exam | MPSC Group B and Group C Exam |
Subject | History (Social Reformers) |
Name | Social Reformers of Maharashtra- Part 1 |
Social Reformers Cover in this Article |
|
Social Reformers of Maharashtra- Part 1
Social Reformers of Maharashtra- Part 1: MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा आणि MPSC गट गट क संयुक्त परीक्षेत इतिहासाच्या विषयात महाराष्ट्रातील समाज सुधारकांवर (Social Reformers of Maharashtra) बऱ्याच वेळा प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारक (Social Reformers of Maharashtra) घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा आहे.
28 ऑक्टोबर 2021 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सहायक कक्ष अधिकारी (ASO), राज्य कर निरीक्षक (STI) आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) या पदांसाठी MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2021 ची जाहिरात जाहीर केली आहे. ज्याची परीक्षा 26 फेब्रुवारी 2022 ला होणार आहे. सोबतच एप्रिल महिन्यात होणाऱ्या MPSC गट गट क परीक्षेच्या दृष्टीने उपयुक्त असे अभ्यास साहित्य (Study Materia), Adda247 मराठी तुमच्यासाठी घेऊन येत आहे. आजच्या या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील Social Reformers of Maharashtra Part 1 पाहणार आहोत.
MPSC गट ब संयुक्त पूर्व परीक्षा 2022 चे प्रवेशपत्र जाहीर
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1 | महाराष्ट्रातील समाज सुधारक- भाग 1
Social Reformers of Maharashtra for MPSC- Part 1: MPSC साठी इतिहासाच्या अभ्यास करताना समाज सुधारकांचा अभ्यास करणे अत्यंत आवश्यक आहे. समाज सुधारकांचा Social Reformers of Maharashtra अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. त्यामुळेच MPSC च्या अभ्यासक्रमातील ,महाराष्ट्रातील समाज सुधारक (Social Reformers of Maharashtra) आपण क्रमश: पद्धतीने बघणार आहोत. या लेखात आपण भाऊ दाजी लाड, बाळशास्त्री जांभेकर आणि सार्वजनिक काका यांचा अभ्यास करणार आहोत.
Social Reformers of Maharashtra- Bhau Daji Lad | महाराष्ट्रातील समाज सुधारक – भाऊ दाजी लाड
MPSC Social Reformers of Maharashtra- Bhau Daji Lad: (1822 – 1874) भाऊ दाजी लाड (Social Reformers of Maharashtra) हे महाराष्ट्रातील एक प्राच्यविद्या पंडित, समाजसेवक व कुशल धन्वतंरी होते. त्यांचे पूर्ण नाव रामकृष्ण विठ्ठल लाड. त्यांच्या वडीलांना दाजी म्हणत व मित्र परिवारात ते भाऊ या नावाने परिचित होते. त्यामुळे पुढे भाऊ दाजी हे नाव रूढ झाले.
त्यांचा जन्म आजोळी गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला. वडील पार्से (गोवा) येथे शेती तसेच कारकुनीचे काम करीत. व्यवसायानिमित्त लाड कुटुंब मुंबईला गेले (1832). तिथे विठ्ठलराव मातीच्या बाहुल्या करून विकत असत. भाऊदाजींचे प्राथमिक शिक्षण नारायणशास्त्री पुराणिकांच्या मराठी शाळेत झाले. पुढे एल्फिन्स्टन विद्यालय व कॉलेजमधून त्यांनी उच्च शिक्षण घेतले. खाजगीरित्या त्यांनी संस्कृतचे अध्ययन केले. त्यांची एल्फिन्स्टन विद्यालयात अध्यापक म्हणून नियुक्ती झाली (1843). या सुमारास त्यांचा पार्वतीबाई या मुलीबरोबर विवाह झाला. त्यांना विठ्ठल व व्दारकानाथ हे दोन मुलगे होते. व्दारकानाथ तारूण्यातच निधन पावला. वडीलांनी संन्यास घेऊन एलेफंटा (घारापुरी) येथे वास्तव्य केले.
भाऊंनी कच्छ, काठेवाड या गुजरातच्या विभागातील बालकन्या हत्येच्या प्रथेवर इंग्रजी व गुजराती अशा दोन्ही भाषांत एक निबंध लिहिला. निबंधस्पर्धेत त्यांना 600 रूपयांचे पारितोषिक मिळाले आणि त्यांच्या चिकित्सक अभ्यासू संशोधनवृत्तीला चालना मिळाली. डॉ. जॉन विल्सन यांनी आपल्या ग्रंथात यातील मजकूर उद्धृत केला आहे.
मुंबईत 1845 मध्ये ग्रँट मेडिकल कॉलेजची स्थापना झाली. तेव्हा भाऊंनी शिक्षकाची नोकरी सोडून त्यात नाव घातले. फॅरिश शिष्यवृत्ती मिळविली आणि वैद्यकशास्त्रात पदवी घेतली (1851). कॉलेजमध्ये असताना त्यांनी ग्रंथपालाचेही काम केले. त्यांनी वैद्यकीय व्यवसाय सुरू केला. अचूक निदान व शस्त्रक्रियेतील हातोटी (कौशल्य) यांमुळे त्यांना लोकप्रियता लाभली व पैसाही मिळू लागला. त्यांनी कुष्ठरोगावर खष्ठ नावाच्या वनस्पतीच्या बियांपासून तयार केलेले एक देशी औषध शोधून काढले. खष्ठ (कवटी) म्हणजेच चौलमुग्रा हा सदापर्णी वृक्ष असावा. त्यांच्या बियांपासून तयार केलेले तेल कुष्ठरोगावर गुणकारी आहे. बाँबे ॲसोसिएशनचे ते चिटणीस झाले. पुढे दादाभाई नवरोजींनी इंग्लंडमध्ये ईस्ट इंडिया ॲसोसिएशन नावाची संस्था काढली. तिच्या मुंबई शाखेचे भाऊ अध्यक्ष झाले. सामाजिक सुधारणांबरोबर त्यांनी औद्योगिक सुधारणांकडेही लक्ष दिले. मुंबईत कागद व कापूस यांच्या गिरण्या काढण्यात त्यांनी पुढाकार घेतला. 1854 मध्ये ते वेस्टर्न इंडियन कॅनल अँड इरिगेशन या कंपनीचे संचालक झाले.
जुन्या रूढी व परंपरा यांना डावलून त्यांनी स्त्री शिक्षणासाठी अनेक वर्षे आर्थिक झीज सोसली. स्त्रियांना शिक्षण देणाऱ्या स्टुडंट्स लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी या संस्थेचे ते पहिले भारतीय अध्यक्ष होत (1863-73). या संस्थेतर्फे मुलींच्या तीन शाळा चालविल्या जात. विधवाविवाहाच्या चळवळीलाही त्यांनी सक्रिय पाठींबा दिला. लोहार चाळीतील कन्याशाळेला ते दरमहा आर्थिक साहाय्य देत. याच शाळेला पुढे ‘भाऊ दाजी गर्ल्स स्कूल’ हे नाव देण्यात आले. जातीव्यवस्थेचे निर्मूलन करावे आणि अंधश्रध्देला फाटा द्यावा, या मताचे ते होते. त्यांचे सार्वजनिक कार्य लक्षात घेऊन सरकारने त्यांची शेरीफ पदावर नियुक्ती केली (184-69).
वनस्पती व प्राचीन इतिहास यांच्या संशोधनात त्यांनी विशेष लक्ष घातले. राणीचा बाग (जिजामाता बाग), ॲल्बर्ट म्यूझीयम, नेटिव्ह जनरल लायब्ररी, पेटीट इस्टिट्युट इ. संस्था स्थापन करण्यात ते अग्रेसर होते. जिजामाता बागेत त्यांच्या स्मरणार्थ एक वस्तुसंग्रहालयही उभारले आहे. भाऊंनी भारतभर दौरा करून हस्तलिखिते, शिलालेखांचे ठसे, दुर्मिळ चित्रे, नाणी, ताम्रपट, शस्त्रे इ. वस्तूंचा संग्रह केला. मुंबईच्या रॉयल एशियाटिक सोसायटीचे ते सदस्य होते व पुढे उपाध्यक्ष झाले. वेगवेगळ्या परिषदांत त्यांनी त्यांनी प्राच्यविद्येच्या संदर्भात अनेक शोधनिबंध सादर केले. मुकुंदराज, हेमाद्री, सायण, हेमचंद्र इ. व्यक्तींचे तसेच कालीदासाचा कालनिर्णय आणि शिलालेख व ताम्रपट यांवरील त्यांचे शोधनिबंध अभ्यासपूर्ण होते. माक्स म्यूलर व रा. गो. भांडारकर यांनी या शोधनिबंधांविषयी गौरवोद्गार काढले आहेत. कालीदासाचे कुमारसंभव व मेरूतुंगाचार्याचा प्रबंध चिंतामणि हे ग्रंथ त्यांनी संपादित केले. तथापि त्यांनी लिहिलेला एकही स्वतंत्र ग्रंथ नाही. त्यांच्या मरणोत्तर रामचंद्र घोष यांनी द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या शीर्षकाने त्यांचे संशोधनात्मक शोधनिबंध प्रसिध्द केले. तसेच रायटिंग्ज अँड स्पिचिस ऑफ डॉ. भाऊदाजी या शीर्षकाने त्र्यं. गो. माईणकर यांनी त्यांचे समग्र लेखन संपादित करून प्रसिध्द केले (1974).
त्यांच्यावर 1865 मध्ये आर्थिक संकट आले. त्यातून ते अखेरपर्यंत सावरले नाहीत. परिणामत: त्यांचे उर्वरित आयुष्य दु:ख, दैन्य व वैफल्य यांनी ग्रासले गेले. त्यातच पक्षाघाताने त्यांचा मुबईमध्ये अंत झाला. त्यांच्या स्मरणार्थ संस्कृत विषयात बी. ए. ला पहिल्या येणाऱ्या विद्यार्थ्याला भाऊ दाजी हे पारितोषिक देण्यात येते.
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार आणि अभयारण्ये बद्दल माहिती पहायासाठी येथे क्लिक करा.
Social Reformers of Maharashtra- Balshastri Jambhekar | महाराष्ट्रातील समाज सुधारक – बाळशास्त्री जांभेकर
MPSC Social Reformers of Maharashtra Balshastri Jambhekar: (1812-1846) : बाळशास्त्री जांभेकर (Social Reformers of Maharashtra) यांना मराठी वृत्तपत्र व्यवसायाचे जनक आणि पहिल्या आंग्लशिक्षित पिढीतील अग्रगण्य विद्वान म्हणून संबोधले जाते. त्यांचा जन्म रत्नागिरी जिल्ह्यातील पोंभुर्ले या गावी झाला. गंगाधरशास्त्री ह्या व्युत्पन्न पित्याच्या मार्गदर्शनाखाली प्राथमिक शिक्षण घेतल्यानंतर मुंबईस येऊन सदाशिव काशीनाथ ऊर्फ ‘बापू छत्रे’ आणि बापूशास्त्री शुक्ल यांजकडे अनुक्रमे इंग्रजी व संस्कृत शिकू लागले. या दोन विषयांबरोबरच गणित आणि शास्त्र या विषयांत त्यांनी प्रावीण्य मिळविले. अनेक भारतीय व परदेशी भाषांचा त्यांनी परिचय करून घेतला होता. ‘बाँबे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी’चे ‘नेटिव्ह सेक्रेटरी’, अक्कलकोटच्या युवराजाचे शिक्षक, एल्फिन्स्टन इन्स्टिट्यूटमध्ये पहिले असिस्टंट प्रोफसर, शाळा तपासनीस, अध्यापनशाळेचे (नॉर्मल स्कूल) संचालक अशा अनेक मानाच्या जागांवर त्यांनी काम केले. त्यांना ‘जस्टिस ऑफ द पीस’ ही करण्यात आले होते (1840).
दर्पण हे वृत्तपत्र 1832 मध्ये काढून मराठी वृत्तपत्रव्यवसायाचा त्यांनी पाया घातला. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक त्यांनीच 1840 मध्ये काढले. लोकशिक्षण व ज्ञानप्रसार हेच हेतू या उपक्रमांमागे होते.
भूगोल, व्याकरण, गणित, इतिहासादी विषयांवर त्यांनी ग्रंथरचना केली. काही पाठांतरे नोंदवून त्यांनी ज्ञानेश्वरीचे संपादन केले. ‘रॉयल एशियाटिक सोसायटी’च्या कार्यात भाग घेणारे ते पहिले एतद्देशीय विद्वान होत. या संस्थेच्या त्रैमासिकात भारतीय शिलालेख व ताम्रपट यांसंबंधी त्यांचे संशोधनात्मक निबंध येत असत.
त्यांचे विचार प्रगमनशील होते. ख्रिस्त्याच्या घरात राहिल्यामुळे वाळीत टाकल्या गेलेल्या एका हिंदू मुलास त्यांनी तत्कालीन सनातन्यांच्या विरोधास न जुमानता शुद्ध करून पुन्हा हिंदू धर्मात घेण्याची व्यवस्था केली. अल्पावधीच्या आजारानंतर मुंबईत त्यांचे निधन झाले.
Social Reformers of Maharashtra-Sarvajanik Kaka | महाराष्ट्रातील समाज सुधारक – सार्वजनिक काका
MPSC Social Reformers of Maharashtra-Sarvajanik Kaka: (9 एप्रिल 1828–25 जुलै 1880): महाराष्ट्रातील एकोणिसाव्या शतकातील एक निष्ठावान सामाजिक कार्यकर्ते (Social Reformers of Maharashtra) म्हणजे सार्वजनिक काका. त्यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी होते. त्यांचा जन्म वासुदेव व सावित्रीबाई या दांपत्यापोटी सातारा येथे झाला. त्यांचे घराणे मूळचे कसबा संगमेश्वर, रत्नागिरीचे पण चरितार्थासाठी हे घराणे देशावर येऊन सातारला स्थायिक झाले. त्यांचे इंग्रजी सातवीपर्यंतचे शिक्षण सातारा येथे झाले.
नोकरीच्या निमित्ताने ते पुण्यात आले (1848) आणि न्यायालयात कारकून म्हणून रुजू झाले. अंतर्गत मतभेदांमुळे त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला (1856). नंतर त्यांनी वकिलीची परीक्षा दिली (1865) आणि पुण्यातच ते वकिली करू लागले. वकिलीच्या व्यवसायाबरोबरच त्यांनी सार्वजनिक कामात रस घेतला. अल्पावधीतच त्यांनी नावलौकिक मिळविला. क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचे वकीलपत्र घेण्यास पुण्यातील कोणीही वकील पुढे येण्यास धजेना. अशा वेळी त्यांनी फडक्यांचे वकीलपत्र स्वीकारण्याचे धाडस दाखविले. ‘फडक्याला जसा फासावर चढवतील तसा मलाही चढवतील, यापेक्षा जास्त काही करणार नाहीत ना?’ असे निर्भय उद्गार त्यांनी यावेळी काढले होते.
सार्वजनिक काकांच्या समाजसेवेत सार्वजनिक सभेचा त्यांनी वाहिलेला कार्यभार व सभेचे स्थान महत्त्वाचे आहे. बॉम्बे असोसिएशनच्या धर्तीवर पुण्यात 2 एप्रिल 1870 रोजी ‘सार्वजनिक सभे’ची स्थापना करण्यात आली. ही सनदशीर मार्गाने काम करणारी एक प्रमुख राजकीय संस्था होती. तिचे मुख्य सूत्रधार व पहिले चिटणीस गणेश जोशी होते आणि औंध संस्थानाधिपती श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी अध्यक्ष होते. प्रथम या संस्थेचा उद्देश केवळ पर्वती संस्थानच्या कारभारातील गोंधळ सरकारदरबारी मांडणे, एवढाच मर्यादित होता पण लवकरच संस्थेला सामाजिक व राजकीय असे व्यापक स्वरूप प्राप्त झाले. पुढे न्यायमूर्ती म. गो. रानडे यांच्या सहभागामुळे राष्ट्रीय पातळीवर तिचे नाव झाले (1871). सभेचे राजकारण हे सनदशीर व इंग्रजांच्या मदतीनेच होणार होते. जोशी आणि रानडे यांनी मिळून आर्थिक, औद्योगिक आणि राजकीय स्वरुपांची अनेक कामे हातात घेतली आणि जनतेला जागृत व संघटित करण्याचे मौलिक काम केले. शिवाय जनतेची गाऱ्हाणी व अडचणी सरकारदरबारी मांडण्याचे प्रयत्न या संस्थेमार्फत सार्वजनिक काकांनी केले.
न्यायमूर्ती रानडे यांच्याशी सल्लामसलत करून सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्रीगणेशा केला. लो. टिळक, म. गांधी यांच्या कितीतरी वर्षे अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली होती. 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली व ती आयुष्यभर पाळली. खादीचा वापर व त्यासाठी जाणीवपूर्वक प्रचार व प्रसार करणारे सार्वजनिक काका हे पहिले द्रष्टे देशभक्त होत. एवढेच नव्हे तर खादीचा पोशाख करून ते 1877 च्या दिल्ली दरबारात गेले. या दरबारात इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिला ‘हिंदुस्थानची सम्राज्ञी’ हा किताब बहाल करण्यात येणार होता. त्यावेळी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठविले होते. या मानपत्रात सभेने हिंदी लोकांना ब्रिटिश राष्ट्राबरोबरीचा राजकीय व सामाजिक दर्जा द्यावा, तसेच स्वावलंबी बनविणारे शिक्षण व राजकीय हक्क द्यावेत, अशा मागण्या नोंदविल्या होत्या. याशिवाय ब्रिटिश पार्लमेंटमध्ये हिंदी जनतेचे प्रतिनिधी असावेत, अशीही मागणी एका स्वतंत्र अर्जाने केली होती. त्यांनी ‘देशी व्यापारोत्तेजक मंडळ’ या संस्थेची स्थापना करून शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इ. स्वदेशी वस्तूंचे उत्पादन करण्यास प्रोत्साहन दिले. त्यासाठी स्वतः आर्थिक झीज सोसली. त्या मालाच्या विक्रीसाठी सहकारी तत्त्वावर पुणे, सातारा, नागपूर, मुंबई, सुरत आदी ठिकाणी दुकाने काढण्यास लोकांना प्रोत्साहित केले. स्वदेशी वस्तूंची प्रदर्शने भरविली, व्याख्याने दिली. त्यांच्या या प्रयत्नांमुळे आग्रा येथे ‘कॉटन मिल्स’ सुरू करण्यात आली.
महाराष्ट्र राज्य वाङ्मय पुरस्कार 2021-22
जातिभेदाच्या अनिष्ट प्रथेला त्यांचा विरोध होता. त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई यांनी पुढाकार घेऊन 1871 मध्ये पुण्यात ‘स्त्री विचारवती’ या नावाची एक सामाजिक संस्था स्थापन केली. या संस्थेद्वारे जातिभेद दूर करण्यासाठी हळदीकुंकू यासारखे उपक्रम आयोजित करण्यात आले. या कार्यक्रमात सर्व जातिजमातींच्या स्त्रिया सामील होत असत.
सार्वजनिक सभेच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रातील बहुतेक सर्व जिल्ह्यांतील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी केली (1873). या पाहणीतून शेतकऱ्यांच्या दारिद्र्याची माहिती प्रकाशात आली. 1876-77 मध्ये महाराष्ट्रात फार मोठा दुष्काळ पडला असताना त्यांनी दुष्काळ फंड उभारून दुष्काळ समित्या नेमल्या. स्वस्त धान्याची दुकाने उघडली. सार्वजनिक सभेने दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मोठे साहाय्य केले. तसेच सरकारने आपल्या ‘पब्लिक वर्क्स’ खात्यामार्फत दुष्काळग्रस्तांसाठी कामे सुरू करावीत म्हणून लढा दिला.
ब्रिटिशांच्या वेळखाऊ व खर्चिक न्यायालयांना पर्याय म्हणून त्यांनी स्वदेशी लवाद न्यायालयाची कल्पना मांडली आणि त्यांच्या प्रयत्नानेच पुणे येथे त्या सुमारास लवाद न्यायालयाची स्थापना झाली (1876).
सार्वजनिक काकांना लोकजागृतीच्या कार्यातील वृत्तपत्रांच्या सामर्थ्याची जाणीव होती. त्यामुळेच त्यांनी व्हाइसरॉय लॉर्ड लिटनच्या 1878 मधील मुद्रणस्वातंत्र्यावर निर्बंध लादणाऱ्या कायद्याला कडाडून विरोध केला. या कृतीचा निषेध करण्यासाठी इंदुप्रकाश चे संपादक जनार्दन सुंदरजी कीर्तिकर यांच्या अध्यक्षतेखाली वृत्तपत्रकारांचे एक संमेलन 29 मार्च 1878 रोजी मुंबई येथे भरविले. शिवाय कलकत्ता (कोलकाता) येथील त्याच वर्षीच्या अशाच प्रकारच्या अन्य संमेलनांस ते आवर्जून उपस्थित राहिले.
सार्वजनिक सभेच्या कार्याला त्यांनी स्थापनेपासून अखेरपर्यंत वाहून घेतले होते. त्यामुळे सार्वजनिक सभा म्हणजे गणेश वासुदेव असे समीकरण झाले होते. त्यांच्या या समर्पित जीवनामुळे त्यांना सार्वजनिक काका हे नामाभिधान प्राप्त झाले. या दगदगीच्या जीवनात त्यांना हृदयविकार जडला आणि त्यातच त्यांचे पुण्यात निधन झाले.
अशा प्रकारे आपण महाराष्ट्रातील काही प्रमुख सुधारकांचा अभ्यास केलेला आहे. उर्वरीत समाज सुधारक आपण या पुढील लेखांमध्ये बघणार आहोत. आम्ही अशीच उपयुक्त माहिती तुमच्यासाठी यापुढेही घेऊन येणार आहोत. त्याचा तुम्हाला अभ्यास करताना नक्कीच खूप फायदा होईल. त्यासाठी Adda247 च्या संकेतस्थळावर भेट देत रहा. तुम्हाला Adda247 च्या टीम कडून अभ्यासासाठी खूप खूप शुभेच्छा.
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: MPSC स्पर्धा परीक्षांचा अभ्यासक्रम खूप जास्त आहे आणि प्रश्न नेमके कशातून येतात हे समजायला वेळ लागतो. तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट देत रहा. यामुळे तुम्हाला MPSC च्या आगामी सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
Latest Posts:
RBI Assistant Notification 2022 Out for 950 Posts
MPSC PSI Departmental Exam 2022 Notification Out
SPMCIL Mumbai Recruitment 2022
FAQS: MPSC Social Reformers of Maharashtra
1. सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव काय होते?
उत्तर : सार्वजनिक काका यांचे पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी होते.
2. कोणाला मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी वृत्तपत्राचे जनक म्हणतात
3. बाळशास्त्री जांभेकर यांनी कोणते मराठी वृत्तपत्र काढले?
उत्तर : बाळशास्त्री जांभेकर यांनी दर्पण हे मराठी वृत्तपत्र काढले
4. भाऊ दाजी लाड यांचा जन्म कुठे झाला?
उत्तर : भाऊ दाजी लाड यांचा जन्म गोव्यातील मांजरे (पेडणे तालुका) या गावी झाला.
YouTube channel- Adda247 Marathi
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group