Table of Contents
SRPF परीक्षा विश्लेषण 2023
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: राज्य राखीव पोलीस बलाने दिनांक 23 जुलै 2023 रोजी कॉन्स्टेबल पदाची परीक्षा यशस्वीरित्या घेतली. परीक्षेला गेलेल्या उमेदवारांच्या मिलाल्याल्या प्रतिसादानुसार SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. याआधी आपण कॉन्स्टेबल आणि चालक कॉन्स्टेबल पदासाठी मुंबई पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 आणि महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल परीक्षा विश्लेषण 2023 केले आहे. या लेखात SRPF कॉन्स्टेबल पदाच्या SRPF परीक्षा विश्लेषण 2023 विस्तृत स्वरुपात देण्यात आले आहे. ज्यात विषयवार चांगले प्रयत्न, एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
SRPF अपेक्षित उत्तरतालिका 2023
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
SRPF कॉन्स्टेबल पदाची परीक्षा दिनांक 23 जुलै 2023 रोजी झाली. या लेखात SRPF परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. उमेदवार SRPF परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात तपासू शकतात.
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
बलाचे नाव | राज्य राखीव पोलीस बल, महाराष्ट्र पोलीस |
भरतीचे नाव | महाराष्ट्र पोलीस भरती 2023 |
लेखाचे नाव | SRPF परीक्षा विश्लेषण 2023 |
पदांचे नाव |
SRPF कॉन्स्टेबल |
SRPF कॉन्स्टेबल परीक्षेची तारीख 2023 | 23 जुलै 2023 |
परीक्षेची वेळ | सकाळी 11.00 |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
एकूण गुण | 100 |
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट
SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत सोपी ते मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | गणित | 8-9 | सोपी ते मध्यम |
2 | बौद्धिक चाचणी | 17-18 | सोपी ते मध्यम |
3 | मराठी | 18-19 | सोपी ते मध्यम |
4 | सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी | 47-48 | सोपी ते मध्यम |
एकूण | 90-94 | सोपी ते मध्यम |
विषयानुरूप SRPF परीक्षा विश्लेषण 2023
SRPF कॉन्स्टेबल परीक्षेत गणित, बौद्धिक चाचणी, मराठी व्याकरण आणि सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी या विभागांवर एकूण 100 प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामुळे या लेखात आम्ही विषयानुरूप मुंबई चालक पोलीस परीक्षा विश्लेषण 2023 खाली प्रदान करण्यात आले आहे.
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: मराठी विषयाचे विश्लेषण
SRPF कॉन्स्टेबलल परीक्षा 2023 मधील मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी ते मध्यम स्वरुपाची होती. मराठी विषयात एकूण 20 प्रश्न विचरण्यात आले होते. यात प्रामुख्याने शब्दांच्या जाती, काळ, समास, वाक्यरचना, समानार्थी विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्प्रचार, यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
शब्दांच्या जाती | 8 |
संधी | 1 |
समानार्थी शब्द | 3 |
विरुद्धार्थी शब्द | 2 |
म्हणी व वाक्प्रचार | 3 |
मराठीतील पुस्तके आणि त्यांचे लेखक | 2 |
मराठी गौरव भाषा दिन | 1 |
Total | 20 |
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: गणित विषयाचे विश्लेषण
कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत गणित या विषयात एकूण 10 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने सरलीकरण, नफा व तोटा, काळ व वेळ, वय आणि क्षेत्रफळ या घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
सरलीकरण | 2 |
नफा व तोटा | 1 |
गुणोत्तर व प्रमाण | 2 |
काळ व वेळ | 1 |
काळ व काम | 1 |
वय | 1 |
भूमिती | 1 |
क्षेत्रफळ | 1 |
Total | 10 |
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
SRPF कॉन्स्टेबल पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयावर एकूण 20 प्रश्न विचारण्यात आले होते. या विषयात प्रामुख्याने अक्षरमाला, आकृती, दिशा, कोडी आणि सांकेतिक भाषा या घटकावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
अक्षरमाला | 1 |
संख्यामाला | 3 |
सांकेतिक भाषा | 3 |
कोडी | 4 |
क्रिया क्रमाने लावा | 1 |
आकृत्या मोजणे | 1 |
समसंबंध | 5 |
दिशा | 1 |
एकूण | 20 |
SRPF परीक्षा विश्लेषण 2023: सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडी विषयाचे विश्लेषण
SRPF भरती परीक्षेत सामान्य ज्ञान या विषयावर एकूण 50 प्रश्न विचारण्यात आले होते. यात प्रामुख्याने राज्यघटना, इतिहास, भारताचा भूगोल आणि चालू घडामोडी यावर प्रश्न विचारण्यात आले होते.
टॉपिक | प्रश्न संख्या |
भूगोल | 14 |
इतिहास | 8 |
राज्यघटना | 3 |
विज्ञान | 2 |
स्टॅटिक जनरल नॉलेज | 15 |
चालू घडामोडी | 8 |
Total | 50 |
SRPF कॉन्स्टेबल पेपर PDF
23 जुलै 2023 रोजी झालेला पुणे SRPF कॉन्स्टेबल पदाचा पेपर डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
SRPF कॉन्स्टेबल पेपर PDF (23 जुलै 2023)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |