Table of Contents
राज्य उत्पादन शुल्क विभाग वेतन 2023
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: राज्य उत्पादन शुल्क विभाग विभाग भरती 2023 अंतर्गत जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदाची भरती होणार आहे. जे उमेदवार राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 ची परीक्षा देत असतील त्यांना राज्य उत्पादन शुल्क त्यांच्या कर्मचार्यांना ऑफर करत असलेले राज्य राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 याबद्दल जाणून घ्यायची उत्सुखता असेल. या लेखात आपण राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 अंतर्गत भरती होणाऱ्या सर्व पदांचे वेतन, भत्ते, मानधन, जॉब प्रोफाईल (कामाचे स्वरूप) इत्यादींबद्दल माहिती पाहणार आहोत
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: विहंगावलोकन
या लेखात पदानुसार राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 देण्यात आले आहे. ज्यात वेतनश्रेणी आणि इतर भत्ते याबद्दल माहिती दिली आहे. त्यासोबतच पदानुसार कोणती कर्तव्य उमेदवारास पार पडावी लागतात याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: विहंगावलोकन |
|
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
विभागाचे नाव | राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 |
पदांची नावे |
|
लेखाचे नाव | राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | www.stateexcise.maharashtra.gov.in |
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: पदानुसार वेतनश्रेणी आणि जॉब प्रोफाइल
जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदांच्या भरतीसाठी राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 जाहीर करण्यात आली होती. या लेखात वरील सर्व पदास किती वेतन मिळते, त्याची वेतनश्रेणी, महाराष्ट्र शासनातर्फे मिळणारे इतर भत्ते व जॉब प्रोफाइल (कामाचे स्वरूप) याबद्दल माहिती प्रदान करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023: पदानुसार वेतन संरचना
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 मधील सर्व पदांची वेतन संरचना खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
पदाचे नाव | वेतन श्रेणी |
जवान | S7: रु. 25,500 ते रु. 81,100 |
जवान-नि-वाहनचालक | S7: रु. 25,500 ते रु. 81,100 |
लघुलेखक (निम्नश्रेणी) | S15: रु. 41,800 ते रु. 1,32,300 |
लघुटंकलेखक | S8: रु. 25,500 ते रु. 81,800 |
चपराशी | S1: रु. 15,000 ते रु. 47,600 |
राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023 सोबत मिळणारे इतर भत्ते
राज्य उत्पादन शुल्क विभाग त्यांच्या कर्मचाऱ्यांना वेतानासोबत इतर भत्ते सुद्धा देते. ते पुढीलप्रमाणेआहेत.
- DA- महागाई भत्ता
- HRA- घरभाडे भत्ता
- TA- वाहतूक भत्ता
- OTA- ओव्हरटाइम भत्ता
हे सर्व भत्ते बेसिक पे वर अवलंबून असतात. जसे जवान पदासाठी बेसिक पे 25,500 आहे तर जवान पदाची इन हॅन्ड सॅलरी (एकूण वेतन) खालीलप्रमाणे असेल.
वेतन संरचना | रु. मध्ये रक्कम |
मुळ वेतन | 25500 |
महागाई भत्ता (DA) | 10710 |
घरभाडे भत्ता (HRA) | 4590 |
वाहतूक भत्ता (TA) | 2556 |
एकूण वेतन | 43356 |
टीप: हे वेतन फक्त उदाहरण म्हणून दार्शाविण्यात आले आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे, नोकरीच्या ठिकाणांनुसार यात बदल असू शकतो.
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत येणाऱ्या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल
राज्य उत्पादन शुल्क विभाग प्रामुख्याने मद्यार्कयुक्त /अंमली पदार्थांवर उत्पादन शुल्क जमा करण्याचे काम करतो. तसेच अशा मद्यार्कयुक्त पदार्थांवर नियंत्रण ठेवण्याचे कामकाज या विभागमार्फत केले जाते. सदरचा उद्देश हा मद्यार्कयुक्त पदार्थांची निर्मिती / वाहतुक / विक्री / बाळगणे / आयात / निर्यात / इत्यादीसाठी विविध अनुज्ञप्ती / परवाने मंजुर करुन साध्य करण्यात येते. तसेच गुन्हा अन्वेषण करून सक्त अंमलबजावणी व दक्षता राखली जाते. राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 मधील जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या सर्व पदांचे जॉब प्रोफाईल खालील तक्त्यात दिले आहे.
पदाचे नाव | जॉब प्रोफाईल |
जवान |
|
जवान-नि-वाहनचालक |
|
लघुलेखक (निम्नश्रेणी) |
|
लघुटंकलेखक |
|
चपराशी |
|
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 शी संबंधित इतर महत्वाचे लेख
- राज्य उत्पादन शुल्क भरती 2023
- राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
- राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023
- राज्य उत्पादन शुल्क वेतन 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |