Table of Contents
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: राज्य उत्पादन शुल्क भरती तयारी करतांना आपणास राज्य उत्पादन शुल्क भरती अभ्यासक्रम 2023 बद्दल माहिती असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देऊ शकतो. जवान आणि जवान-नि-वाहनचालक पदाची पहिले ऑनलाईन परीक्षा घेण्यात येणार आहे त्यानंतर त्यांची शारीरिक (मैदानी) चाचणी घेण्यात येईल. त्याचप्रमाणे लघुलेखक व लघुटंकलेखक पदाची लेखी परीक्षा व नंतर कौशल्य चाचणी घेण्यात येईल. आज या लेखात आपण पदानुसार राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 आणि परीक्षेचे स्वरूप याबद्दल सविस्तर पाहणार आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसूचना
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच आपल्याला चांगले यश मिळू शकते. राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 बद्दल संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात प्रदान करण्यात आली आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षेचा अभ्यासक्रम |
विभाग | राज्य उत्पादन शुल्क विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 |
पदांची नावे |
|
एकूण रिक्त पदे | 512 |
लेखाचे नाव | राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 |
लेख तुम्हाला काय प्रदान करतो | परीक्षेचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप |
निवड प्रक्रिया |
|
अधिकृत संकेतस्थळ | www.stateexcise.maharashtra.gov.in |
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 परीक्षेचे टप्पे
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान, जवान-नि-वाहनचालक, लघुलेखक (निम्नश्रेणी), लघुटंकलेखक आणि चपराशी या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार परीक्षेचे टप्पे खाली देण्यात आले आहे.
पदाचे नाव | टप्पे | एकूण गुण | इतर माहिती |
जवान आणि जवान-नि-वाहनचालक |
|
200 गुण |
|
लाघुलेखक (निम्नश्रेणी) आणि लघुटंकलेखक |
|
200 गुण |
|
चपराशी |
|
200 गुण | – |
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप 2023
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत एकूण 512 रिक्त पदांची भरती केल्या जाणार आहे. महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार आता पहिले ऑनलाईन परीक्षा होणार असून रिक्त पदाच्या 1:10 या प्रमाणत सर्व उत्तीर्ण विध्यार्थ्यांना मैदानी चाचणी / कौशल्य चाचणी साठी बोलावण्यात येईल या लेखात आपण राज्य उत्पादन शुल्क भरतीचा अभ्यासक्रम व परीक्षेचे स्वरूप पाहणार आहे. सोबतच सर्व विषयातील महत्वाचे Topic सुद्धा या लेखात देण्यात आले आहे. ज्याचा आपणास नक्की फायदा होईल
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक)
जवान, लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी पहिले लेखी परीक्षा व त्यानंतर शारीरिक चाचणी / लघुलेखन चाचणी घेण्यात येणार आहे. राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 खालीलप्रमाणे आहे.
टप्पा 1: लेखी परीक्षा
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान लघुलेखक व लघुटंकलेखक पदाची पहिले ऑनलाईन लेखी परीक्षा व त्यानंतर एकूण 80 गुणांसाठी जवान पदासाठी 1:10 या प्रमाणात शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे आणि 80 गुणांसाठी लघुलेखक व लघुटंकलेखक या पदासाठी 1:10 या प्रमाणात लघुलेखन चाचणीसाठी बोलावण्यात येणार आहे. सदर पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची होणार असून यात बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी या विषयावर प्रत्येकी 30 प्रश्न (प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी) विचारल्या जाणार आहे.
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्यम | कालावधी |
बुद्धिमापन चाचणी | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | 1 तास 30 मिनिटे |
सामान्य ज्ञान | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | |
मराठी | 30 | 30 | मराठी | |
इंग्रजी | 30 | 30 | इंग्रजी | |
एकूण | 120 | 120 |
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
- उमेदवारांना 1 तास 30 मिनिटे (90 मिनिटे) एवढा कालावधी असेल
- परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळांत परीक्षेएवढा असेल.
- बुद्धिमापन चाचणी व सामान्य ज्ञान हे विषय दोन्ही मराठी व इंग्रजी भाषेतून असतील.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
टप्पा 2: शारीरिक चाचणी
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी मधील क्रिया व त्यांचे गुण खाली देण्यात आले आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष) | |
1.5 किमी धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 80 गुण |
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी मधील क्रिया व त्यांचे गुण खाली देण्यात आले आहे.
शारीरिक चाचणी (महिला) | |
1 किमी धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 80 गुण |
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (जवान-नि-वाहनचालक)
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान-नि-वाहनचालक पदाची पहिले ऑनलाईन लेखी परीक्षा व त्यानंतर 1:10 या प्रमाणात शारीरिक चाचणी / मैदानी चाचणी घेण्यात येणार आहे. जवान-नि-वाहनचालक पदाची परीक्षा एकूण 120 गुणांची होणार असून यात बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी या विषयावर प्रत्येकी 30 प्रश्न (प्रत्येक प्रश्न 1 गुणांसाठी) विचारल्या जाणार आहे. जवान-नि-वाहनचालक पदाच्या परीक्षेचे स्वरूप खाली प्रदान करण्यात आले आहे. त्यानंतर या उमेदवारांची हलके व जड वाहन चालवणे ही फक्त अहर्ताकारी परीक्षा आहे.
टप्पा 1: लेखी परीक्षा
जवान आणि जवान-नि-वाहनचालक पदाची पहिले ऑनलाईन लेखी परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्यम | कालावधी |
बुद्धिमापन चाचणी | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | 1 तास 30 मिनिटे |
सामान्य ज्ञान | 30 | 30 | मराठी व इंग्रजी | |
मराठी | 30 | 30 | मराठी | |
इंग्रजी | 30 | 30 | इंग्रजी | |
एकूण | 120 | 120 |
नोट:
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
- उमेदवारांना 1 तास 30 मिनिटे (90 मिनिटे) एवढा कालावधी असेल
- परीक्षेचा दर्जा हा सर्वसाधारण शैक्षणिक अहार्तेनुसार परीक्षेएवढा असेल.
- बुद्धिमापन चाचणी व सामान्य ज्ञान हे विषय दोन्ही मराठी व इंग्रजी भाषेतून असतील.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
टप्पा 2: मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान-नि-वाहनचालक पुरुष उमेदवारांसाठी मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी मधील क्रिया व त्यांचे गुण खाली देण्यात आले आहे.
शारीरिक चाचणी (पुरुष) | |
1.5 किमी धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 80 गुण |
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत जवान-नि-वाहनचालक महिला उमेदवारांसाठी मैदानी चाचणी / शारीरिक चाचणी मधील क्रिया व त्यांचे गुण खाली देण्यात आले आहे.
शारीरिक चाचणी (महिला) | |
1 किमी धावणे | 30 गुण |
100 मीटर धावणे | 30 गुण |
गोळाफेक | 20 गुण |
एकूण गुण | 80 गुण |
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचे स्वरूप 2023 (चपराशी)
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अंतर्गत चपराशी या पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. बुद्धिमापन चाचणी, सामान्य ज्ञान, मराठी व इंग्रजी या विषयावर प्रत्येकी 50 प्रश्न याप्रमाणे एकूण 200 प्रश्न विचारल्या जाणार आहेत. चपराशी पदाच्या परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
विषयाचे नाव | एकूण प्रश्न | एकूण गुण | परीक्षेचे माध्यम | कालावधी |
बुद्धिमापन चाचणी | 50 | 50 | मराठी व इंग्रजी | 02 तास |
सामान्य ज्ञान | 50 | 50 | मराठी व इंग्रजी | |
मराठी | 50 | 50 | मराठी | |
इंग्रजी | 50 | 50 | इंग्रजी | |
एकूण | 200 | 200 |
- लेखी परीक्षा ही वस्तुनिष्ठ स्वरुपाची असेल.
- परीक्षेत एक चतुर्थांश (1/4) निगेटिव्ह मार्किंग राहणार आहे.
- उमेदवारांना 2 तास एवढा कालावधी असेल
- परीक्षेचा दर्जा हा माध्यमिक शाळांत परीक्षेएवढा असेल.
- बुद्धिमापन चाचणी व सामान्य ज्ञान हे विषय दोन्ही मराठी व इंग्रजी भाषेतून असतील.
- उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारांना किमान 45% गुण मिळवणे आवश्यक आहे.
राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 अधिसूचनेत राज्य उत्पादन शुल्क भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023 जाहीर झाला आहे. सर्व विषयातील घटक व उपघटक खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
विषयाचे नाव | घटक व उपघटक |
बुद्धिमापन चाचणी | उमेदवार किती लवकर व अचूकपणे विचार करु शकतो याचा अंदाज घेण्याच्या दृष्टीने सदर प्रश्न विचारण्यात येतील. |
सामान्य ज्ञान | महाराष्ट्राचा भूगोल, भारताचा भूगोल, आधुनिक भारताचा इतिहास महाराष्ट्राच्या विशेष संदर्भासह, नागरीकशास्त्र, विज्ञान व चालू घडामोडी |
मराठी | सर्वसामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ, वाक्यात उपयोग तसेच उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे |
इंग्रजी | Common vocabulary, Sentence structure, Grammar, Use of Idioms & Phrases and their meaning, and Comprehension of passage |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |