Marathi govt jobs   »   Study Materials   »   वनस्पतीची रचना व कार्ये

वनस्पतीची रचना व कार्ये – तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

वनस्पतीची रचना व कार्ये

वनस्पतीची रचना व कार्ये: वनस्पती हे जीवांचे समूह आहेत जे प्रकाशसंश्लेषणाद्वारे त्यांचे अन्न तयार करतात. हालचाल करू न शकणाऱ्या बहुपेशीय सजीव वनस्पतींमध्ये झाडे, झुडपे, वेली, शेवाळे व कवक यांचाच समावेश होतो. वेगवेगळ्या वनस्पतीचे मूळ, खोड, पाने, फुले, फळे इत्यादी वेगवेगळी असतात. या विशेष गुणधर्मांचा वापर करून आपण वनस्पतींना ओळखतो. वनस्पतीची रचना व कार्ये हा जीवशास्त्रातील एक प्रमुख आणि मुलभूत घटक आहे. आगामी काळातील तलाठी भरती 2023, कृषी विभाग भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, पशुसंवर्धन विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेत विज्ञान हा फार महत्वाचा विषय आहे. आज या लेखात आपण याच विज्ञानांतील प्रमुख घटक वनस्पतीची रचना व कार्ये याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन

वनस्पतीची रचना व कार्ये: विहंगावलोकन

वनस्पती ही जीवसृष्टीतील एक महत्वाची संरचना आहे. ज्यावर संपूर्ण निसर्ग अवलंबून असतो. या लेखात आपण वनस्पतीची रचना त्याचे अंग त्याचे उपप्रकार याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

वनस्पतीची रचना व कार्ये: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय जीवशास्त्र
उपयोगिता तलाठी आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव वनस्पतीची रचना व कार्ये
लेख तुम्हाला काय प्रदान करतो वनस्पतीची रचना, त्याचे अवयव व कार्ये

वनस्पतीची रचना: मूळ

  • बीच्या आतून जमिनीच्या दिशेने वाढणाऱ्या भागास आदिमूळ (Radicle), तर जमिनीच्या वर वाढणाऱ्या भागास अंकुर (Plumule) म्हणतात. आदिमुळापासून बनलेल्या मुळाची वाढ जमिनीखाली होते. मुळाचा जमिनीलगतचा भाग जाडसर असतो. पुढे तो निमुळता होत जाऊन टोकदार होतो.
  • जमिनीखाली आधारासाठी वाढणाऱ्या वनस्पतींच्या या अवयवास मूळ म्हणतात. जमिनीमध्ये काही वनस्पतींच्या मुळांना उपमुळे फुटतात व ती तिरपी वाढून जमिनीत दूरवर पसरतात. मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ (Tap root) असे म्हणतात.
  • मुळांच्या टोकांच्या भागांवर केसासारखे धागे असतात. त्यांना मूलरोम (Root hair) म्हणतात. मुळाच्या टोकाचा भाग नाजूक असतो. मुळाची वाढ याच भागात होत असते. त्याला इजा होऊ नये म्हणून त्यावर टोपीसारखे आवरण असते. त्याला मूलटोपी (Root cap) म्हणतात.
  • खोडापासून फुटणाऱ्या तंतूसारख्या मुळांना तंतुमय मुळे (Fibrous roots) म्हणतात. मुळांचे सोटमूळ व तंतुमय मूळ हे दोन प्रमुख प्रकार असून द्‌विदल वनस्पतींमध्ये सोटमूळ असते, तर एकदल वनस्पतींमध्ये तंतुमय मुळे असतात.
  • मका, ऊस, ज्वारी यांना जमिनीत वाढणारी मुळे व जमिनीच्या वरील खोडांपासून वाढणारी आगंतुक मुळे अशी दोन प्रकारची मुळे असतात. माती घट्ट धरून ठेवणे, पाणी, खनिजे व क्षार शोषून घेणे, आधार देणे अशी विविध कार्ये मुळांना करावी लागतात, त्यासाठी त्यांच्यामध्ये झालेल्या बदलांमुळे त्यांना रूपांतरित मुळे म्हणतात. यामध्येप्रामुख्याने हवाई मुळे, आधार मुळे, धावती मुळे, श्वसन मुळे यांचा समावेश हाेतो.
वनस्पतीची रचना व कार्ये: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_3.1
मुळाची रचना

वनस्पतीची रचना: खोड

  • रुजणाऱ्या बीजातील जमिनीच्या वर वाढणाऱ्या अंकुरापासून खोडाची वाढ जमिनीच्या वर होते. अंकुर जसजसा वाढतो तसतशी खोडाची लांबी वाढते.
  • खोडावर पेरे (Node) असतात. ज्या ठिकाणी पेरे असतात तेथे पाने फुटतात.
  • खोडाच्या दोन पेरांतील अंतराला कांडे (Internode) म्हणतात.
  • खोडाच्या अग्रभागाला मुकुल (Bud) असे म्हणतात.

वनस्पतीची रचना: पान

  • खोडाला पेराच्या जागी पाने असतात. सामान्यतः ती पातळ, पसरट आणि हिरव्या रंगाची असतात. पानाच्या पसरट भागाला पर्णपत्र (Leaf blade) म्हणतात.
  • पर्णपत्राच्या कडेला पर्णधारा (Leaf margin) म्हणतात. पर्णधारा या प्रामुख्याने सलग, खंडित किंवा दंतेरी असतात.
  • पर्णपत्राच्या पुढच्या टोकाला पर्णाग्र (Leaf apex) म्हणतात. यात मुख्यतः निमुळते, टोकदार व गोलाकार असे प्रकार असतात.
  • काही वनस्पतींच्या पानांना देठ (Petiole) असतात, तर काही वनस्पतींच्या पानांना देठ नसतात.
  • पर्णपत्राचा खोडाशी जोडलेला भाग म्हणजे पर्णतल (Leaf base) होय.
  • काही पानांच्या पर्णतलापाशी छोटासा पानासारखा भाग दिसतो. त्याला उपपर्णे (Stipules) म्हणतात.
  • काही वनस्पतींच्या पानांमध्ये एकच पर्णपत्र असून एकच मध्यशीर असते, अशा पानांना साधे पान म्हणतात तर काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये (Leaflet) विभागलेले असते, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात.

वनस्पतीची रचना: फूल

  • फुलाला लांब किंवा आखूड देठ (Pedicel) असतो. देठाचे एक टोक खोडाला जोडलेले असते. फूल ज्या ठिकाणी देठाला येते, तो भाग सामान्यतः पसरट व फुगीर असतो. त्याला पुष्पाधार (Receptacle) असे म्हणतात. फुलाच्या पाकळ्या आणि इतर भाग या पुष्पाधारावर असतात.
  • निदलपुंज (Calyx) –  कळी अवस्थेत पाकळ्या हिरव्या रंगाच्या पानासारख्या भागाने झाकलेल्या असतात. हे आवरण म्हणजे निदलपुंज होय.
  • दलपुंज (Corolla) – दलपुंज पाकळ्यांनी (Petals) बनलेला असतो. वेगवेगळ्या फुलांचे दलपुंज जसे गुलाब, मोगरा, शेवंती, जास्वंद, तगर, कण्हेर या फुलांच्या दलपुंजांचे आकार, गंध व रंग यांचे निरीक्षण केल्यावर आपल्याला माहिती मिळते. 
  • पुमंग (Androecium) –  फुलाचा हा पुल्लिंगी भाग असून तो पुंकेसराचा (Stamen) बनलेला असतो. त्यात परागकोष व वृंत असतात. 
  • जायांग (Gynoecium) –  फुलाचा हा स्त्रीलिंगी भाग असून तो स्त्रीकेसराचा (Carpel) बनलेला असतो त्यात कुक्षी, कुक्षीवृंत व अंडाशय असते. 2. एक चांगले ब्लेड घ्या आणि फुलाच्या कुक्षीपासून (Stigma) देठापर्यंत उभा छेद घ्या. या दोन भागांपैकी प्रत्येक भागामध्ये सारखीच रचना तुम्हांला दिसेल. परागकोष पक्व झाल्यावर फुटतो आणि त्यातील परागकण हे कुक्षीवर जाऊन पडतात. या क्रियेला परागीभवन (Pollination) असे म्हणतात. या परागीभवनापासून पुढे अंडाशयातील बीजांडांचे फलन होऊन त्याचे रूपांतर बीमध्ये होते, तर अंडाशयाचे रूपांतर फळात होते.
वनस्पतीची रचना व कार्ये: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_4.1
फुलाची रचना

वनस्पतीची रचना: फळ

आपण दैनंदिन जीवनात वेगवेगळी फळे वापरतो. प्रत्येक फळ हे वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्याचा आकार, रंग, चव यांमध्येविविधता आढळून येते. आंब्यात एकच कोय असते, तर फणसात असंख्य गरे व बिया असतात. काजूसारख्या काही फळांमध्ये बी थोडेसे बाहेरच्या बाजूस आलेले असते. शेंगदाणे, वाटाणा, गहू, ज्वारी या बिया तीन ते चार तास पाण्यात भिजवा. चिमटीने बी दाबा. कोणत्या बी चे दोन समान भाग होतात ते पहा. ज्याचे दोन समान भाग होतात त्यांना द्‌विदल बी (Dicotyledons) म्हणतात, तर ज्यांचे दोन समान भाग होत नाहीत त्यांना एकदल बी (Monocotyledons) म्हणतात.

नोट: अश्याच महत्वपूर्ण टॉपिक वर आधारित सर्वसमावेशक महाराष्ट्र तलाठी भरती 2023 साठी एक सर्वसमावेशक टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ही टेस्ट सिरीज सोडवून आपण आपल्या अभ्यासाला गती द्या.

महाराष्ट्र तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज

ग्रामसभा
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य

तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला किंवा App ला भेट देत रहा.

इतर अभ्यास साहित्य
लेखाचे नाव वेबलिंक अँप लिंक
भारतीय नागरिकांचे मूलभूत अधिकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संगणकाशी संबंधीत शब्दांचे शॉर्ट आणि लॉंग फॉर्म्स वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी व त्यांचा कार्यकाळ (1952-2023) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
जागतिक आरोग्य संघटना वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
शब्दसंपदा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे प्रशासकीय विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील राष्ट्रीय जलमार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
पृथ्वीवरील महासागर वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राचे हवामान वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताची क्षेपणास्त्रे वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील महारत्न कंपन्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील प्रथम व्यक्तींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकसभा वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
आपली सौरप्रणाली वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ब्रिटिश भारतातील प्रारंभीच्या काळातील गव्हर्नर जनरल (1857 च्या आधीचे) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
ढग व ढगांचे प्रकार वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
नदीकाठच्या भारतीय शहरांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील वने व वनांचे प्रकार, राष्ट्रीय उद्याने आणि अभयारण्ये वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गांधी युग – सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
गती व गतीचे प्रकार – संज्ञा, वर्गीकरण, आलेख आणि वर्गीकरण वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्राच्या राज्यपालांची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान (NUHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
संयुक्त महाराष्ट्र चळवळ वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
लोकपाल आणि लोकायुक्त वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील 1947 ते 2023 पर्यंतच्या सर्व राष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
मे 2023 मधील महत्त्वाचे दिवस वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील सर्वात लांब पूल 2023 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारताच्या उपराष्ट्रपतींची यादी वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
भारतातील जलविद्युत प्रकल्प वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
माहितीचा अधिकार 2005 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्र समृद्धी महामार्ग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
महाराष्ट्रातील प्रशासकीय आणि प्रादेशिक विभाग वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा
 51A मूलभूत कर्तव्ये: कलम 51A वेबसाईट वर पाहण्यासही येथे क्लिक करा अँप वर पाहण्यासही येथे क्लिक करा

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र टेस्ट मेट
महाराष्ट्र टेस्ट मेट

Sharing is caring!

वनस्पतीची रचना व कार्ये: तलाठी भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_7.1

FAQs

झाडांना आधार देणाऱ्या मुळांना काय म्हणतात?

जे मुळे झाडाला आधार देतात. अशा प्रकारच्या मुळांना सोटमूळ असे म्हणतात.

संयुक्त पान कशास म्हणतात?

काही पानांमध्ये मुख्य शिरेभोवती पर्णपत्र अनेक लहान लहान पर्णिकांमध्ये विभागलेले असते, अशा पानांना संयुक्त पान म्हणतात.

दलपुंज कशाने बनलेला असतो?

दलपुंज पाकळ्यांनी बनलेला असतो.

वनस्पतीची रचना व कार्ये याबद्दल माहिती मला कोठे मिळेल?

वनस्पतीची रचना व कार्ये याबद्दल सर्व माहिती या लेखात दिली आहे.