Table of Contents
पुरवठा निरीक्षक भरती 2023
महाराष्ट्र अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग लवकरच सुमारे 400 पुरवठा निरीक्षक आणि उच्च श्रेणी लिपिक पदे भरण्यासाठी पुरवठा निरीक्षक भरती 2023 जाहीर करणार आहे. प्राप्त माहितीनुसार पुरवठा निरीक्षक भरती 2023 ची अधिसूचना येत्या काही दिवसात जाहीर होणार आहे. 17 मे 2023 रोजी एक शासन परिपत्रक जाहीर झाले त्यात पुरवठा निरीक्षक भरती 2023 ची परीक्षा IBPS मार्फत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले. आज या लेखात आपण याच पुरवठा निरीक्षक भरती 2023 च्या अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे.
पुरवठा निरीक्षक भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाचे एक परिपत्रक 17 मे 2023 रोजी जाहीर करण्यात आले. पुरवठा निरीक्षक भरती 2023 संदर्भात संक्षिप्त माहिती खालील तक्त्यात मिळावा
पुरवठा निरीक्षक भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महाराष्ट्र अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग |
लेखाचे नाव | पुरवठा निरीक्षक भरती 2023 |
पदांची नावे |
|
अदांजे रिक्त पदे | 400 |
अधिकृत संकेतस्थळ | www.mahafood.gov.in |
पुरवठा निरीक्षक भरती अपडेट 2023
सामान्य प्रशासन विभागाच्या दि.04 मे 2022 रोजीच्या शासन निर्णयान्वये दिलेल्या निर्देशानुसार अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाच्या अधिपत्याखालील पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षकांची आणि वित्तीय सल्लागार व उप सचिव यांच्या कार्यालयातील उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्यात येणार असून, सदर भरती प्रक्रिया राबविण्यासाठी आय.बी.पी.एस. कंपनीची निवड करण्यास शासन मान्यता देण्यात आली आहे. विभागीय आयुक्त यांच्या अधिनस्त पुरवठा शाखेतील पुरवठा निरीक्षक हे पद विभागीय सवर्ग पद आहे. पदभरतीमध्ये एकसुत्रता राहणे आवश्यक असल्याने सदर पदाची भरती प्रक्रिया केंद्रीय पध्दतीने करण्यात यावी.
तसेच, पुरवठा निरीक्षक आणि उच्चस्तर लिपिकांची सरळसेवेची रिक्त पदे स्पर्धा परिक्षेच्या माध्यमातून भरण्याच्या अनुषंगाने भरती प्रक्रिया राबविण्यासाठी, समन्वय व अनुषंगीक आवश्यक कार्यवाही करण्यासाठी खालील समन्वय अधिकारी यांची नेमणूक करण्यात येत आहे. पुरवठा निरीक्षक भरती 2023 चे शासन परिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पुरवठा निरीक्षक भरती अपडेट 2023
पुरवठा निरीक्षक भरती 2023 संबंधित महत्वाच्या तारखा
पुरवठा निरीक्षक भरती 2023 ची अधिसूचना जून 2023 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. खालील तक्त्यात पुरवठा निरीक्षक भरती संदर्भात संभाव्य तारखा प्रदान करण्यात आल्या आहे.
पुरवठा निरीक्षक भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | दिनांक |
पुरवठा निरीक्षक भरती 2023 ची अधिसूचना | जून 2023 |
पुरवठा निरीक्षक परीक्षा 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
पुरवठा निरीक्षक निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
पुरवठा निरीक्षक भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
पुरवठा निरीक्षक भरती 2023 अंतर्गत सुमारे 400 पुरवठा निरीक्षक पदांची भरती होणार आहे. संवर्गानुसार रिक्त पदाचा तपशील जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
पुरवठा निरीक्षक भरती 2023 अर्ज शुल्क
पुरवठा निरीक्षक भरती 2023 साठी लागणारे अर्ज शुल्क अधिसूचना जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू. त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
पुरवठा निरीक्षक भरती 2023 पात्रता निकष
पुरवठा निरीक्षक भरती 2023अंतर्गत होणाऱ्या पुरवठा निरीक्षक पदास आवश्यक असणारी पात्रता निकष खालीलप्रमाणे आहे.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवार मान्यता प्राप्त (संविधीक विद्यापीठ) विद्यापीठाचा पदवीधर असणे आवश्यक आहे. परंतु “अन्न तंत्रज्ञान किंवा अन्न विज्ञान विषयामध्ये पदवी धारण करणा-या उमेदवारांना परिक्षेत समान गुण असल्यास प्राधान्य देण्यात येईल.
- उमेदवारास मराठी भाषेचे ज्ञान असणे आवश्यक आहे.
- संगणक अर्हता पात्र प्रमाणपत्र: D.O.E.A.C.C सोसायटीच्या अधिकृत C.C.C’ किंवा ‘O’ स्तर ‘A’ स्तर किंवा ‘B’ किंवा ‘C’ स्तर पैकी कोणतीही एक परीक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र किंवा महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण मंडळ मुंबई यांचेकडील अधिकृत MSCIT ची परिक्षा उत्तीर्ण झाल्याचे प्रमाणपत्र नियुक्तीनंतर विहीत मुदतीत सादर करणे आवश्यक राहील. नसल्यास महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभाग यांचेकडील शासन निर्णय क्रमांक प्रशिक्षण-2000/ प्र. क्र. 61/2001/39 दिनांक 19 मार्च 2003 संगणक अर्हता नियुक्तीच्या दिनांकापासून दोन वर्षाच्या आत प्राप्त करणे आवश्यक राहील.
वयोमर्यादा
शासन नियमाप्रमाणे पुरवठा निरीक्षक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- खुला प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत एकूण प्रश्नांची संख्या, विषयानुसार प्रश्नांची संख्या आणि परीक्षेची काठीण्यपटली यासंबधीची माहिती आपणास पुरवठा निरीक्षक भरती परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम याद्वारे मिळते. प्राप्त माहितीनुसार पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
अ क्र | विषय | दर्जा | प्रश्नांची संख्या | गुण |
1 | मराठी भाषा | बारावी | 25 | 50 |
2 | इंग्रजी भाषा | बारावी | 25 | 50 |
3 | सामान्य ज्ञान | पदवी | 25 | 50 |
4 | बौद्धिक चाचणी | पदवी | 25 | 50 |
एकूण | 100 | 200 |
- पुरवठा निरीक्षक पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जातील
- परीक्षेचा कालावधी 02 तास आहे.
- परीक्षेचा दर्जा हा मराठी व इंग्रजी विषयासाठी बारावी आहे तर इतर विषयासाठी पदवी आहे.
- परीक्षेत नकारात्मक (Negative Marking) नाही.
पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम` बद्दल अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
पुरवठा निरीक्षक भरती 2023 परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप