Table of Contents
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023: भूमी अभिलेख विभागाने 06 डिसेंबर 2023 रोजी तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. उमेदवार त्यांच्या खात्यात लॉग इन करून आपली तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. या आधी 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका व त्यासोबतच उमेदवारांना आक्षेप घेण्यासाठी काही कालावधी देण्यात आला होता. सोबतच या लेखात 2023 मध्ये तलाठी पदाचे काही पेपर देण्यात आले आहे. याचा उपयोग आपणास आगामी काळातील जिल्हा परिषद, नगर परिषद, आरोग्य विभाग आणि MIDC यासारख्या परीक्षांमध्ये होईल. तलाठी परीक्षा परीक्षा 2023 ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. उमेदवार तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 ची आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या फेज व शिफ्टनुसार तलाठी उत्तरतालिका 2023 अपलोड करण्यात येत आहेत त्यामुळे ज्या उमेदवारांना लॉग इन केल्यावर रिस्पॉन्स शीट दिसत नसेल त्यांना लवकरच त्यांच्या खात्यात तलाठी उत्तरतालिका 2023 उपलब्ध होईल. या लेखात तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक, तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या स्टेप्स याबद्दल माहिती पाहणार आहोत.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली. तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | निकाल |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | |
लेखाचे नाव | तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण रिक्त पदे | |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 लिंक | सक्रिय |
तलाठी उत्तरतालिका 2023 | 28 सप्टेंबर 2023 |
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 | 06 डिसेंबर 2023 |
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
तलाठी अंतिम उत्तरतालीकेचा दिनांक आणि इतर महत्वाच्या तारखा
महसूल विभागामार्फत तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 दिनांक 06 डिसेंबर 2023 रोजी जाहीर करण्यात आली आहे. तलाठी भरती 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
तलाठी भरती 2023 अधिसूचना | 23 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 26 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जुलै 2023 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 | 14 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 | 28 सप्टेंबर 2023 |
तलाठी उत्तरतालिका 2023 आक्षेप घेण्याची तारीख | 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 |
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 | 06 डिसेंबर 2023 |
तलाठी निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
तलाठी अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करायची लिंक
महाराष्ट्र महसूल विभागाने 06 डिसेंबर 2023 रोजी अंतिम तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. 06 डिसेंबर 2023 रोजी उमेदवार त्यांच्या खात्यात लॉगिन करून आपली अंतिम उत्तरतालिका डाउनलोड करू शकतात. तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक (लिंक सक्रीय)
नोट: सध्या काही उमेदवारांची तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 त्यांच्या लॉग इन केल्यावर दिसणार नाही तर त्यांनी थोड्या वेळाने चेक करावे. फेजनुसार तलाठी उत्तरतालिका 2023 अपलोड केल्या जात आहे त्यामुळे लवकरच आपणास आपली रिस्पॉन्स शीट डाउनलोड करायला मिळेल.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 कशी डाउनलोड करावी?
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आल्या आहेत.
- सर्वप्रथम ईमहाभूमीच्या अधिकृत संकेतस्थळ @mahabhumi.gov.in ला भेट द्या.
- तिथे तलाठी सरळसेवा भरती 2023 या टॅब वर क्लीक करा.
- आता ऑनलाईन लिंक वर क्लिक करा
- नवीन पेज ओपन होईल तिथे तलाठी भरती 2023 फॉर्म भरतांना मिळालेला आपला लॉगिन आयडी व पासवर्ड टाका.
- तेथे रिस्पॉन्स शीट वर क्लीक करा.
- आता तुम्ही तलाठी उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकता.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक
तलाठी उत्तरतालिका 2023 वर आक्षेप घेण्याची तारीख दिनांक 28 सप्टेंबर 2023 ते 08 ऑक्टोबर 2023 होती. त्यानुसार TCS कंपनीने महसूल विभागाला आक्षेपांबाबत माहिती दिली असून एकूण 2831 प्रश्नांसाठी 16205 आक्षेप घेण्यात आले होते त्या पैकी 146 प्रश्नांसाठी घेतलेले 9072 आक्षेप कंपनीने वैध ठरवले आहेत. तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक डाऊनलोड करण्यासाठी उमेदवार खालील लिंकचा वापर करू शकतात.
तलाठी अंतिम उत्तरतालिका 2023 प्राप्त आक्षेपांबद्दल प्रसिद्धीपत्रक PDF
तलाठी पेपर 2023 PDF
तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 04 सप्टेंबर 2023 या कालावधीत घेण्यात आली. TCS ने दिनांक 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 जाहीर केली. सर्व उमेदवारांच्या रिस्पॉन्स शीट जाहीर करण्यात आल्या आहेत. तलाठी परीक्षा 2023 अंतर्गत झालेले काही पेपर खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.