Table of Contents
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाने एकूण 4657 तलाठी पदांच्या भरती करण्यासाठी तलाठी भरती 2023 जाहीर केली आहे. ही महाराष्ट्रातील एक लोकप्रिय परीक्षा आहे. आत्तापर्यंतची ही मोठी तलाठी भरती आहे. यासाठी खूप उमेदवार अभ्यासाची तयारी करत आहे. परीक्षेत चांगले यश मिळवायचे असेल तर आपल्याला तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन करणे फार आवश्यक आहे. तलाठी भरती मध्ये एकूण चार विषय आहे. ते म्हणजे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी. तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात (फेज) मध्ये घेण्यात येणार आहे. आज या लेखात आपण कमीत कमी वेळेत चागला अभ्यास करण्यासाठी तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
तलाठी परीक्षा 2023 साठी लास्ट मिनिट टिप्स
तलाठी प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी परीक्षा विश्लेषण अँप वर पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा | |
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (18 ऑगस्ट 2023, शिफ्ट 1) | तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (17 ऑगस्ट 2023, शिफ्ट 3) |
तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (17 ऑगस्ट 2023, शिफ्ट 1) | तलाठी परीक्षा विश्लेषण 2023 (17 ऑगस्ट 2023, शिफ्ट 2) |
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन: विहंगावलोकन
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती आपण या लेखात पाहणार आहोत. खालील तक्त्यात तलाठी भरती अभ्यासाचे नियोजनाबद्दल थोडक्यात माहिती दिली आहे.
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन: विहंगावलोकन | |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | तलाठी भरती 2023 |
पदाचे नाव | तलाठी |
एकूण रिक्त पदे | 4657 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
लेखाचे नाव | तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन |
एकूण गुण | 200 |
परीक्षा कालावधी | 02 तास |
विषय |
|
परीक्षा घेणारी कंपनी | TCS |
परीक्षेचा कालावधी | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती अभ्यासाचे नियोजन कसे करावे?
तलाठी भरतीसाठी अभ्यासाचे नियोजन करण्यासाठी खालील सर्व मुद्यांचा विचार केला पाहिजे. सोबतच अड्डा247 मराठीने आपणासाठी परिपूर्ण स्टडी प्लॅन जाहीर केला आहे. ज्याचा आधार घेऊन आपण आपल्या अभ्यासाला गती देऊ शकता. तलाठी भरती स्टडी प्लॅन खाली देण्यात आला आहे. 10 जुलै 2023 पासून आम्ही खाली तक्त्यात प्रत्येक दिवशी विषयानुसार स्टडी प्लॅन नुसार अभ्यास साहित्य उपलब्ध करून देणार आहोत. त्या संबंधी सर्व लिंक या लेखात अपडेट केल्या जातील त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
1. परीक्षेच्या स्वरूप व अभ्यासक्रमबद्दल सखोल माहिती मिळावा: तलाठी भरतीसाठी आपल्याला अद्ययावत परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रमाबद्दल माहिती मिळवणे आवश्यक आहे. अभ्यासासाठी प्राथमिकता असलेल्या विषयांची झाल्यावरच आपल्याला काय वाचावे याबद्दल माहिती मिळते. आपल्याला जो विषय कठीण वाटतो त्याचा सुरवातीला जास्त अभ्यास करा.
2. विषयाचा सखोल अभ्यास: एकदा अभ्यासक्रम माहिती झाल्यावर आपल्याला प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करावा लागतो. त्याने आपल्या पाया मजबूत होतो. यासाठी विषयानुसार कोणत्या दिवशी काय वाचावे यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी 45 दिवसांचा स्टडी प्लॅन उपलब्ध करून दिला आहे. या स्टडी प्लॅन नुसार आपणास दिनांक 10 जुलै 2023 पासून रोज माहिती अभ्यास साहित्य उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्याचा अभ्यास करून आपण आपल्या अभ्यासाला गती मिळवून देवू शकता.
3. मागील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास: अभ्यासासोबत तलाठी भरतीच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका प्राप्त करा आणि त्याचे प्रश्नांचा अभ्यास करा. प्रश्नपत्रिकांचे अभ्यास करून आपल्याला प्रश्नपत्रिकेतील विषयांची प्राथमिकता आणि प्रश्न प्रकार याबद्दल आपल्याला माहिती मिळेल. 2019 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिका आम्ही आपणासाठी तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका या लेखात उपलब्ध करून दिल्या आहेत. या सर्व प्रश्नपत्रिका डाउनलोड करून आपण आपला अभ्यासाला गती देवू शकता.
4. मॉक टेस्ट सोडवा: तलाठी भरतीसाठी योग्य मॉक टेस्ट सोडवणे खूप महत्वाचे आहे. मॉक टेस्टच्या माध्यमातून आपण वेळेचे नियोजन कसे करावे याबद्दल माहिती मिळते. तलाठी भरतीसाठी ऑनलाईन प्रश्नपत्रिका सोडवणे फार आवश्यक आहे. तरच आपला वेळेवर गोंधळ होणार नाही. यासाठी अड्डा247 मराठीने आपणासाठी तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज लाँच केली आहे. ज्याचा फायदा आपणास नक्कीच होईल.
तलाठी भरती फुल लेन्थ टेस्ट सिरीज बद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
5. अभ्यास प्रश्नसंच: तलाठी भरतीसाठी सरावासाठी आपल्याला नवीन पॅटर्न नुसार प्रश्नसंच सोडवणे आवश्यक आहे. त्यामुळे आपण सर्व प्रकारच्या प्रश्नाची तयारी व केलेल्या अभ्यासाचे पुनर्विलोकन (रिव्हिजन) करू शकता. त्यासाठी अड्डा247 TCS पॅटर्न वर आधारित महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तक आणले आहे. या पुस्तकातील सर्व प्रश्नांचा सराव करून आपण आपल्या अभ्यासाला गती देवू शकता.
महाराष्ट्र तलाठी भरती संभाव्य सराव प्रश्नसंच पुस्तकाबद्दल अधिक माहिती मिळवण्यासाठी येथे क्लिक करा
6. अभ्यासाचे व्यवस्थापन करा: तलाठी भरतीसाठी अभ्यास करण्यासाठी आपल्याला नियमित वेळेत संबंधित विषय वाचणे गरजेचे आहे. तरच आपण अभ्यासाचे योग्य नियोजन करू शकतो.
तलाठी भरती 2023 साठी अभ्यासक्रम, कट ऑफ, पुस्तके आणि मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका याबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी भरती अभ्यासाचे 45 दिवसांचे नियोजन
तलाठी भरती 2023 मध्ये चांगले यश मिळवण्यासाठी आपल्याला अभ्यासाचे योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. खालील तक्त्यात आम्ही तलाठी भरती अभ्यासाचे 45 दिवसांचे नियोजन उपलब्ध करू देत आहोत. सदर अभ्यासाचे नियोजन हे अड्डा 247 च्या तलाठी भरती 45 फायनल पंच बॅच नुसार देण्यात आला आहे. या टेबलमध्ये नियमितपणे सर्व टॉपिक (घटक) नुसार सर्व लेखाच्या लिंक उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आपणास टॉपिकनुसार सर्व लेख मिळणार आहे. ज्याचा आपल्याला नक्कीच फायदा होईल. त्यामुळे या लेखास बुकमार्क करून ठेवा ज्यामुळे आपणास दैनंदिन महत्वाचे टॉपिकनुसार काय वाचावे याबद्दल माहिती मिळणार आहे.
तलाठी भरती परीक्षेचा अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 च्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्लिश, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या चार विषयांचा समावेश होतो. सदर परीक्षा 02 तासांची असून विषयानुसार महत्वाचे घटक परीक्षेचा पॅटर्न याबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |