Table of Contents
तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी परीक्षेची तारीख 2023 जाहीर केली आहे. तलाठी भरती 2023 अंतर्गत एकूण 4624 तलाठी पदासाठी 17 ऑगस्ट 2023 पासून परीक्षेचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. सदर परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत तीन सत्रात (फेज) मध्ये घेण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. आज आपण या लेखात तलाठी परीक्षेची तारीख 2023 याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत. ज्यात पेजनुसार परीक्षेच्या तारखा आणि परीक्षेचे वेळापत्रक दिले आहे.
तलाठी परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन
तलाठी परीक्षेची तारीख 2023 जाहीर झाली असून आपण खालील तक्त्यात तलाठी परीक्षेची तारीख 2023 चे विहंगावलोकन तपासू शकता.
तलाठी परीक्षेची तारीख 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | तलाठी भरती 2023 |
पदाचे नाव |
तलाठी |
एकूण रिक्त पदे | 4657 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
लेखाचे नाव | तलाठी परीक्षेची तारीख 2023 |
परीक्षेची तारीख | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
परीक्षेच्या शिफ्ट |
|
अधिकृत संकेतस्थळ | https://mahabhumi.gov.in/mahabhumilink |
तलाठी भरती 2023
तलाठी भरती 2023: महाराष्ट्र शासनाने दिनांक 23 जून 2023 रोजी तलाठी भरती 2023 ची अधिसूचना जाहीर केली होती. एकूण 4657 तलाठी संवर्गातील रिक्त पदांसाठी तलाठी भरती 2023 अधिसूचना जाहीर झाली आहे. तलाठी भरती 2023 बद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी परीक्षेचे वेळापत्रक PDF
भूमी अभिलेख विभागाच्यावतीने तलाठी (गट-क) या पदासाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेचे वेळापत्रक आणि तारखा जाहीर झाल्या. ही परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सष्टेंबर 2023 या कालावधीत होणार आहेत. परीक्षा घेण्याची तयारी पूर्ण झाली असून पात्र उमेदवारांना परीक्षा केंद्राचे नाव किमान दहा दिवस आधी कळविण्यात येणार आहे. ही परीक्षा तीन सत्रांत होणार आहे. त्यामध्ये सकाळी 9 ते 11, दुपारी 12.30 ते 2.30 आणि सायंकाळी 4.30 ते 6.30 अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. उमेदवारांना ऑनलाइन परीक्षेचे गाव अगोदर समजणार असून परीक्षा केंद्र, मात्र तीन दिवस अगोदर प्रवेशिकेबरोबरच दिसणार आहेत. तलाठी परीक्षेच्या तारखेबद्दल अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
तलाठी परीक्षेच्या तारखेबद्दल अधिकृत PDF डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
तलाठी परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा
तलाठी परीक्षेची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
तलाठी परीक्षेच्या तारखा व इतर महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
तलाठी भरती 2023 अधिसूचना | 23 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 26 जून 2023 |
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 25 जुलै 2023 |
तलाठी प्रवेशपत्र 2023 | 10 ऑगस्ट 2023 (अपेक्षित) |
तलाठी परीक्षेची तारीख 2023 | 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
तलाठी परीक्षेची तारीख 2023: शिफ्ट ची वेळ
तलाठी पदाची परीक्षा ही 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत 03 शिफ्ट मध्ये घेतल्या जाणार आहे. परीक्षेची शिफ्ट नुसार वेळ खालीलप्रमाणे आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 09 ते 11 |
शिफ्ट 2 | दुपारी 12.30 ते 02.30 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 04.30. ते 06.30 |
सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023
महसूल विभ्गाने जाहीर केल्याप्रमाणे तलाठी भरती 2023 अंतर्गत तलाठी पदाची परीक्षा 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 या कालावधीत केल्या जाणार आहेत. सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी पदाच्या परीक्षेच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आली आहे.
सत्रानुसार (फेजनुसार) तलाठी परीक्षेची तारीख 2023 | |
सत्र (फेज) क्रमांक | परीक्षेचा कालावधी |
सत्र (फेज) 1 | 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023 |
सत्र (फेज) 2 | 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023 |
सत्र (फेज) 3 | 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023 |
टीप: तलाठी पदाची परीक्षा ही 03 सत्रात होत असली तरी मध्ये काही दिवस पेपर होणार नाही आहे. ज्या तारखांना पेपर होणार नाही त्या तारखा खालीलप्रमाणे आहे.
महिना | पेपर न होणाऱ्या तारखा |
ऑगस्ट 2023 | 23, 24 आणि 25 ऑगस्ट 2023 |
सप्टेंबर 2023 | 2, 3, 7, 9, 11, आणि 12 सप्टेंबर 2023 |
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती अभ्यासक्रम 2023: तलाठी परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला तलाठी भरती अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. तलाठी परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |