Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी निकाल 2023
Top Performing

तलाठी निकाल 2023 अपडेट, तलाठी भरतीच्या निकालाची अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यन्त जाहीर होणार

तलाठी निकाल 2023

प्राप्त माहितीनुसार महाराष्ट्र महसूल विभाग नोव्हेंबर 2023 च्या पहिल्या आठवड्यात तलाठी भरती 2023 गुणांची यादी जाहीर करणार आहे आणि त्या नंतर तलाठी निकाल 2023 अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यन्त जाहीर होण्याची अपेक्षा आहे. महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 शिफ्ट मध्ये 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. या आधी भूमी अभिलेख विभागाने 28 सप्टेंबर 2023 रोजी तलाठी उत्तरतालिका 2023 (Response Sheets) जाहीर केली होती. प्राप्त माहितीनुसार प्रजासत्ताकदिनी म्हणजेच 26 जानेवारी 2024 रोजी भावी तलाठ्यांना नियुक्तीपत्रे मिळणार आहेत. या लेखात आपण तलाठी निकाल 2023 (सर्व Latest Updates) बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी उत्तरतालिका 2023 आणि रिस्पॉन्स सीड्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी निकाल 2023: विहंगावलोकन 

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 च्या 1ल्या आठवड्यात मध्ये लागण्याची शक्यता आहे. या लेखात तलाठी निकाल 2023 बद्दल तपशीलवार माहिती प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी निकाल 2023: विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे 4657
लेखाचे नाव तलाठी निकाल 2023
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या 8,64,960
तलाठी परीक्षेची तारीख 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती निकाल 2023 नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात (अपेक्षित)
तलाठी भरती अंतिम गुणांची यादी 15 डिसेंबर पर्यन्त (अपेक्षित)
तलाठी नियुक्तीपत्रे 26 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती

राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका 28 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आली असून, येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर, पुढील आठवड्याभरात हरकतींचे संकलन करून, 31 उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे, अशी माहिती तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. उमेदवार खाली दिलेल्या लोकसत्ता वृत्तपत्र कट आऊट पाहू शकतात.

तलाठी निकाल 2023 अपडेट
तलाठी निकाल 2023 अपडेट

तलाठी निकाल 2023 अपडेट (8 ऑक्टोबर 2023)

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर 14 सप्टेंबर 2023 संपली. 10 लाख 41 हजार उमेदवारापैकी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट 2023 (पहिला टप्पा), 26 ऑगस्ट 2023 ते 02 सप्टेंबर 2023 (दुसरा टप्पा) आणि 4 ते 14 सप्टेंबर 2023 (तिसरा टप्पा) असे एकूण 57 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली.

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती (16 सप्टेंबर 2023)

तलाठी निकाल 2023
तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती

तलाठी निकालाची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तलाठी भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 (Response Sheets) 28 सप्टेंबर 2023
तलाठी निकाल 2023 नोव्हेंबरच्या पहिला आठवड्यात (अपेक्षित)
तलाठी भरती अंतिम गुणांची यादी 15 डिसेंबर पर्यन्त (अपेक्षित)
तलाठी नियुक्तीपत्रे 26 जानेवारी 2024

तलाठी निकाल 2023 पाहण्याची लिंक

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये लागण्याची शक्यता आहे. जसा तलाठी भरती 2023 चा निकाल जाहीर होईल तसे आम्ही या लेखात तलाठी निकाल 2023 पाहण्याची लिंक उपलब्ध करून देऊ. तलाठी निकाल 2023 बाबत अद्ययावत माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.

तलाठी निकाल 2023 लिंक (लिंक निष्क्रिय)

तलाठी निकाल 2023 कसा डाउनलोड करावा?

तलाठी निकाल 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या स्टेप्सचे अनुसरण करावे.

  • सर्वप्रथम ई-महाभूमी च्या संकेतस्थळास भेट द्या
  • तेथे तलाठी भरतीवर क्लिक करा.
  • नवीन टॅब ओपन होईल.
  • आता जिल्हानुसार तलाठी निकाल 2023 ची PDF डाउनलोड करा.
तलाठी निकाल 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

तलाठी निकाल 2023 अपडेट, तलाठी भरतीच्या निकालाची अंतिम यादी 15 डिसेंबर पर्यन्त जाहीर होणार_7.1

FAQs

तलाठी निकाल 2023 जाहीर झाला आहे का?

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे.

तलाठी निकाल 2023 बद्दल कोणता अपडेट जाहीर झाला आहे?

तलाठी निकाल 2023 दिवाळीपर्यंत लावण्याचा महसूल विभागाचा प्रयत्न आहे.

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्यायवत माहिती मला कोठे मिळेल?

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती आपणास या लेखात पाहायला मिळेल.