Marathi govt jobs   »   Talathi Bharti 2023   »   तलाठी भरती 2023 अपडेट

तलाठी भरती 2023 अपडेट, तलाठी पदाच्या जागा वाढवल्या

तलाठी भरती 2023 अपडेट 

तलाठी भरती 2023 अपडेट: दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी महाराष्ट्र महसूल विभागाने तलाठी भरती 2023 बद्दल एक प्रसिद्धीपत्रक जारी केले आहे. ज्यानुसार तलाठी पदांमध्ये एकूण 149 जागांची वाढ करण्यात आली आहे.  महाराष्ट्र महसूल विभागाने दिनांक 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023 पर्यंत एकूण 57 शिफ्ट मध्ये 8,64,960 उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. या लेखात आपण तलाठी भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

तलाठी उत्तरतालिका 2023 आणि रिस्पॉन्स शीट्स पाहण्यासाठी येथे क्लिक करा

तलाठी भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन 

तलाठी भरती 2023 अपडेट 06 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. या लेखात तलाठी भरती 2023 अपडेट  बद्दल तपशीलवार माहिती प्रदान करण्यात आली आहे.

तलाठी भरती 2023 अपडेट : विहंगावलोकन
श्रेणी निकाल
विभाग महसूल विभाग, महाराष्ट्र राज्य
भरतीचे नाव तलाठी भरती 2023
पदाचे नाव तलाठी
एकूण रिक्त पदे
  • 4657
  • 4793
लेखाचे नाव तलाठी भरती 2023 अपडेट
परीक्षा दिलेल्या उमेदवारांची संख्या 8,64,960
तलाठी परीक्षेची तारीख 17 ऑगस्ट 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी भरती निकाल 2023 लवकरच अपेक्षित 
तलाठी भरती अंतिम गुणांची यादी 15 डिसेंबर पर्यन्त (अपेक्षित)
तलाठी नियुक्तीपत्रे 26 जानेवारी 2024
अधिकृत संकेतस्थळ https://mahabhumi.gov.in/mahabhumilink

तलाठी भरती 2023 अपडेट अधिकृत सूचना

दिनांक 06 नोव्हेंबर 2023 रोजी जारी झालेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार तलाठी पदांमध्ये एकूण 149 जागांची वाढ करण्यात आली असून सद्यस्थितीत एकूण 4793 पदे भरण्यात येणार आहेत. अनुसूचित क्षेत्रातील (पेसा) पद भरती बाबत म. सर्वोच्च न्यायालय, दिल्ली येथे दाखल रीत याचिका क्र. SLP(C) No. 022109/2023 च्या आदेशास अधीन राहून सदरची वाढ करण्यात आली आहे. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिकृत सूचना पाहू शकतात.

तलाठी भरती 2023 अपडेट अधिकृत सूचना 

तलाठी पदाच्या जागा वाढविलेल्या जिल्ह्यांची यादी 

खालील तक्त्यात तलाठी पदाच्या जागा वाढविलेल्या जिल्ह्यांची यादी व इतर तपशील दिलेला आहे.

अ.क्र. जिल्हा  आधीच्या जागा  नवीन जागा  फरक 
1 जळगाव 208 241 + 33
2 रत्नागिरी 185 210 + 25
3 अमरावती 56 78 + 22
4 यवतमाळ 123 142 + 19
5 गोंदिया 60 77 + 17
6 ठाणे 65 81 + 16
7 नांदेड 119 135 + 16
8 सांगली 98 110 + 12
9 नागपूर 177 186 +9
10 अकोला 41 48 +7
11 वाशीम 19 26 +7
12 नाशिक 268 274 +6
13 वर्धा 78 84 +6
14 बीड 187 193 +6
15 अहमदनगर 250 255 +5
16 बुलढाणा 49 53 +4
17 जालना 118 122 + 4
18 सोलापूर 197 200 +3
19 सातारा 153 156 +3
20 सिंधुदुर्ग 143 145 +2
21 पुणे 383 385 +2
22 पालघर 142 143 +1

तलाठी पदाच्या जागा कमी केलेल्या जिल्ह्यांची यादी 

खालील तक्त्यात तलाठी पदाच्या जागा कमी केलेल्या जिल्ह्यांची यादी व इतर तपशील दिलेला आहे.

अ.क्र. जिल्हा  आधीच्या जागा  नवीन जागा  फरक 
1 रायगड 241 220 -21
2 गडचिरोली 158 140 -18
3 परभणी 105 95 -10
4 चंद्रपूर 167 159 -8
5 लातूर 63 55 -8
6 छत्रपती संभाजीनगर 161 154 -7
7 मुंबई शहर 19 17 -2
8 मुंबई उपनगर 43 41 -2

तलाठी पदाच्या जागेत बदल न झालेल्या जिल्ह्यांची यादी 

खालील तलाठी पदाच्या जागेत बदल न झालेल्या जिल्ह्यांची यादी व इतर तपशील दिलेला आहे.

अ.क्र. जिल्हा  आधीच्या जागा  नवीन जागा  फरक 
1 नंदुरबार 54 54 0
2 धुळे 205 205 0
3 कोल्हापूर 56 56 0
4 भंडारा 67 67 0
5 उस्मानाबाद 110 110 0
6 हिंगोली 76 76 0

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती

राज्यात नुकत्याच झालेल्या तलाठी पदाच्या परीक्षेसाठी नमुना उत्तरपत्रिका 28 सप्टेंबर 2023 रोजी जारी करण्यात आली असून, येत्या रविवारपर्यंत त्यावर हरकती मागविण्यात आल्या आहेत. त्यानंतर, पुढील आठवड्याभरात हरकतींचे संकलन करून, 31 उत्तरपत्रिका पुन्हा अंतिम करण्यात येऊन, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात उमेदवारांना त्याआधारे आपले गुण कळू शकणार आहेत. मात्र अंतिम गुणवत्ता यादी 15 डिसेंबरपर्यंत जिल्हाधिकारी कार्यालयात लावण्यात येणार आहे, अशी माहिती तलाठी परीक्षेचे राज्य समन्वयक व अतिरिक्त जमाबंदी आयुक्त आनंद रायते यांनी दिली आहे 26 जानेवारीला राज्यपालांच्या हस्ते या उमेदवारांना नियुक्तीपत्रे देण्याचे नियोजन असल्याचेही त्यांनी सांगितले. उमेदवार खाली दिलेल्या लोकसत्ता वृत्तपत्र कट आऊट पाहू शकतात.

तलाठी निकाल 2023 अपडेट
तलाठी निकाल 2023 अपडेट

तलाठी निकाल 2023 अपडेट (8 ऑक्टोबर 2023)

बहुचर्चित तलाठी भरती परीक्षा अखेर 14 सप्टेंबर 2023 संपली. 10 लाख 41 हजार उमेदवारापैकी 8 लाख 64 हजार उमेदवारांनी प्रत्यक्षात ही परीक्षा दिली. या परीक्षेचा निकाल दिवाळीपूर्वी लावण्यासाठी भूमी अभिलेख विभागाकडून प्रयत्न करण्यात येणार आहेत. तलाठी भरती परीक्षेसाठी साडेअकरा लाखांपेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज भरले होते. छाननीअंती 10 लाख 41 हजार 713 असे विक्रमी अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी प्रत्यक्षात 8 लाख 64 हजार 960 उमेदवारांनी परीक्षा दिली. मोठ्या प्रमाणात अर्ज आल्याने ही परीक्षा तीन टप्प्यांत आणि दिवसातील तीन सत्रांत घेण्याचे निश्चित केले होते. त्यानुसार 17 ते 22 ऑगस्ट 2023 (पहिला टप्पा), 26 ऑगस्ट 2023 ते 02 सप्टेंबर 2023 (दुसरा टप्पा) आणि 4 ते 14 सप्टेंबर 2023 (तिसरा टप्पा) असे एकूण 57 शिफ्टमध्ये परीक्षा घेण्यात आली.

तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती (16 सप्टेंबर 2023)

तलाठी निकाल 2023
तलाठी निकाल 2023 बद्दल अद्ययावत माहिती

तलाठी निकालाची तारीख आणि इतर महत्वाच्या तारखा

तलाठी निकाल 2023 नोव्हेंबर 2023 मध्ये जाहीर होण्याची शक्यता आहे. तलाठी भरती 2023 संदर्भातील सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.

तलाठी निकालाची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
कार्यक्रम तारीख
तलाठी भरती 2023 अधिसूचना 23 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख 26 जून 2023
तलाठी भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 जुलै 2023
तलाठी प्रवेशपत्र 2023 14 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 1) 17 ऑगस्ट 2023 ते 22 ऑगस्ट 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 2) 26 ऑगस्ट 2023 ते 01 सप्टेंबर 2023
तलाठी परीक्षेची तारीख 2023 (फेज 3) 04 सप्टेंबर 2023 ते 14 सप्टेंबर 2023
तलाठी उत्तरतालिका 2023 (Response Sheets) 28 सप्टेंबर 2023
तलाठी निकाल 2023 लवकरच अपेक्षित
तलाठी भरती अंतिम गुणांची यादी 15 डिसेंबर पर्यन्त (अपेक्षित)
तलाठी नियुक्तीपत्रे 26 जानेवारी 2024
तलाठी निकाल 2023
अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

तलाठी भरती 2023 संबंधित इतर लेख
तलाठी रिक्त पदे 2023 (अपडेटेड) तलाठी परीक्षेची तारीख 2023
तलाठी भरती 2023 अधिसूचना तलाठी भरती अभ्यासक्रम 2023
तलाठी भरती 2023 परीक्षेसाठी आवश्यक पुस्तके तलाठी भरती मागील वर्षाचे कट ऑफ 2023
तलाठी वेतन आणि जॉब प्रोफाईल तलाठी भरती 2023 च्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका (उत्तरांसाहित)

 

ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी माझी नोकरी 2023
होम पेज अड्डा 247 मराठी
मराठीत चालू घडामोडी चालु घडामोडी

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

तलाठी भरती 2023 अपडेट कधी जाहीर झाली?

तलाठी भरती 2023 अपडेट 06 नोव्हेंबर 2023 रोजी जाहीर झाली.

तलाठी पदाच्या किती जागा वाढवण्यात आल्या आहेत?

तलाठी पदाच्या 149 जागा वाढवण्यात आल्या आहेत