Table of Contents
शिक्षक भरती 2024
शिक्षक भरती 2024 अपडेट: दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषदांनी, महानगरपालीकांनी व तसेच खाजगी अनुदानित शाळांनी पवित्र पोर्टलवर शिक्षक भरती 2024 साठी अधिसुचना जाहीर केली आहे. बऱ्याच वर्षांपासून सरकारी शाळांमध्ये शिक्षक भरती झाली नसल्यामुळे व बरेचशे शिक्षक निवृत्त झाल्यामुळे शिक्षकांची भरपूर पदे रिक्त आहेत. त्यामुळे शिक्षक भरती 2024 ही या भरती साठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी एक सुवर्ण संधी आहे. त्यामुळे आज या लेखात आपण शिक्षक भरती 2024 बद्दल सविस्तर माहिती पाहू.
शिक्षक भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन
दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी शिक्षक भरती अधिसुचना जाहीर झाली असून शिक्षक भरती 2024 अपडेट चे विहंगावलोकन आपण खालील तक्त्यात पाहू शकता.
शिक्षक भरती 2024 अपडेट: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | शिक्षण विभाग |
भरतीचे नाव | शिक्षक भरती 2024 |
एकूण रिक्त पदे | 21678 |
निकारीचे ठिकाण | महाराष्ट्र |
शिक्षक भरती 2024: अधिसुचना
पवित्र पोर्टल वर दिनांक 05 फेब्रुवारी 2024 रोजी राज्यातील सर्व जिल्हा परिषद, महानगरपालिका व खाजगी अनुदानित शाळा यांनी शिक्षक भरती साठी जाहिराती प्रसिद्ध केल्या आहेत. उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसुचना डाउनलोड करू शकतात.
शिक्षक भरती 2024: अधिसुचना PDF
शिक्षक भरती 2024: रिक्त पदांचा तपशील
पवित्र पोर्टलवर जाहिरातीतील रिक्त पदांचा तपशील पुढील प्रमाणे:
1) आरक्षण निहाय रिक्त पदे- अनुसूचित जाती-3147, अनुसूचित जमाती-3542, विमुक्त जाती (अ)- 862, भटक्या जमाती (व)-404, भटक्या जमाती (क)-582, भटक्या जमाती (ड)-493, विशेष मागास प्रवर्ग-290, इतर मागास प्रवर्ग-4024, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक -2324, खुला-6170 याप्रमाणे आहेत. तथापि, काही व्यवस्थापनांनी जाहिरातीमध्ये आरक्षणापेक्षा विषयाची पदे कमी नोंद केली आहेत त्यामुळे आरक्षणनिहाय रिक्त पदे जास्त दिसून येतात.
2) गट निहाय रिक्त पदे- इ. 1 ते 5 वी -10240, इ. 6 ते 8 वी 8127, इ. 9 ते 10 वी -2176, इ. 11 ते 12 वी – 1135 याप्रमाणे आहेत.
3) माध्यमनिहाय रिक्त पदे- मराठी-18373, इंग्रजी-931, उर्दू-1850, हिन्दी-410, गुजराथी-12, कन्नड-88, तामिळ-8, वंगाली-4, तेलुगू-2 याप्रमाणे आहेत.
4) पदभरती प्रकारनिहाय रिक्त पदे- मुलाखतीशिवाय-16799, मुलाखतीसह-4879 याप्रमाणे आहेत.
शिक्षक भरती 2024 मधील रिक्त जागांचा तपशील | |
प्रवर्ग | पद संख्या |
अजा | 3147 |
अज | 3542 |
विजा | 862 |
भज(ब) | 404 |
भज(क) | 582 |
भज(ड) | 493 |
विमाप्र | 290 |
इमाव | 4024 |
इडब्ल्यूएस | 2324 |
अराखीव | 6170 |
21678 |
शिक्षक भरती 2024: पात्रता निकष
1. अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) प्रविष्ट झालेल्या उमेदवारांपैकी ज्या उमेदवारांनी पवित्र प्रणाली (https://tait2022.mahateacherrecruitment.org.in) या संकेतस्थळावर वैयक्तिक माहिती नोंदवून स्वप्रमाणित केलेली आहे. असेच उमेदवार जाहिरातीनुसार ऑनलाईन अर्ज करू शकतील.
2. इच्छुक व अर्हता धारण करणारे उमेदवार ऑनलाईन जाहिरातीच्या अनुषंगाने पात्र असलेल्या पदांसाठी पसंतीक्रम नमूद करून पोर्टलवर ऑनलाईन अर्ज करतील.
3. इ. 1 ली ते इ 5 वी व इ 6 वी ते इ 8 वी या गटातील पदांसाठी अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी -2022 (TAIT) परीक्षेपूर्वी शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) उत्तीर्ण असणारे उमेदवारच अर्ज करू शकतील. डिसेंबर 2022 मध्ये CTET करिता प्रविष्ट उमेदवारांचा निकाल मात्र TAIT परीक्षेनंतर लागलेला असला तरी असे उमेदवार अर्ज करण्यास पात्र ठरतील.
4. इ.6 वी ते इ.8 वी या गटातील इतिहास/भूगोल/सामाजिक शास्त्र या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) सामाजिकशास्त्र विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
5. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील विज्ञान/गणित/गणित-विज्ञान या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान विषय घेऊन TET-Paper-2 /CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
6. इ.6 वी ते इ 8 वी या गटातील भाषा या विषयांसाठी उमेदवार शिक्षक पात्रता परीक्षा (TET/CTET) गणित-विज्ञान किंवा सामाजिक शास्त्र यांपैकी कोणताही विषय घेऊन TET-Paper-2/CTET-Paper-2 उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
7. इ. 9 वी ते इ 10 वी /इ 11 वी ते इ 12 वी या गटातील पदांसाठी अर्ज करणारा उमेदवार अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी-2022 (TAIT) या चाचणीम प्रविष्ट असणे आवश्यक आहे.
8. शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता व अध्यापनाचे विषय, वयोमर्यादा, आरक्षण, अन्य पात्रता व आवश्यक कागदपत्रे इत्यादी साठी मर्वसाधारण सूचना सविस्तर तपशिलासह https://tait2022. mahateacherrecruitment.org.in या संकेतस्थळावर पवित्र प्रणालीमध्ये उमेदवारांसाठी सर्वसाधारण सूचना” या शीर्षाखाली उपलब्ध आहेत. मदर सूचना व सूचनांमध्ये नमूद आवश्यक शामन निर्णय यांचे अवलोकन करून स्वतःची खात्री करूनच ऑनलाईन अर्ज करावेत.
शिक्षक भरती 2024: अर्ज लिंक
उमेदवार खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून शिक्षक भरती 2024साठी ऑनलाईन पद्तीने अर्ज करू शकतात.
शिक्षक भरती 2024 शी संबंधित महत्वाच्या तारखा
शिक्षक भरती 2024 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.
शिक्षक भरती 2024: महत्वाच्या तारखा | |
शिक्षक भरती 2024 अधिसूचना | 05 फेब्रुवारी 2024 |
पदनिहाय पसंतीक्रम नमूद करण्याची तारीख | 08 फेब्रुवारी 2024 |
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
नवीनतम भरती सूचना | |
RRB ALP भरती 2024 | महावितरण विद्युत सहाय्यक भरती 2024 |
सिडको भरती 2024 | पुणे महानगरपालिका भरती 2024 |