Marathi govt jobs   »   Study Materials   »   भारतरत्न पुरस्कार

भारतरत्न पुरस्कार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

भारतरत्न पुरस्कार: आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य 

भारतरत्न पुरस्कार– महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये भारतरत्न पुरस्कारावर हमखास प्रश्न विचारल्या जातात. आगामी आदिवासी विकास विभाग भरती परीक्षा 2023  व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अतिशय महत्वाचा Topic आहे. आज आपण या लेखात  भारतरत्न पुरस्काराविषयी माहिती पाहणार आहोत. जी चालू घडामोडी बरोबरच सामान्य ज्ञानातही अतिशय उपयुक्त ठरते. 

भारतरत्न पुरस्कार: विहंगावलोकन

भारतरत्न पुरस्कार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय सामान्य ज्ञान
उपयोगिता आदिवासी विकास विभाग भरती 2023 आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
लेखाचे नाव भारतरत्न पुरस्कार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • भारतरत्न पुरस्काराविषयी सविस्तर माहिती 

भारतरत्न पुरस्कार

भारतरत्‍न हा भारतातील सर्वोच्च नागरी सन्मान आहे. देशासाठी सर्वोच्च प्रतीचे काम करणाऱ्या व भारताची कीर्ती जगभरात वृद्धीगंत करणाऱ्या व्यक्तीस हा सर्वोच्च नागरी सन्मान देऊन गौरविले जाते. याची सुरुवात 1954 साली झाली. 

‘भारतरत्‍न’ पुरस्काराच्या चिन्हाचे स्वरूप म्हणजे पदकावर एका सोनेरी पिंपळपानावर एका बाजूला मधोमध सूर्याची प्रतिमा व तिच्याखाली ‘भारतरत्‍न’ असे शब्द, आणि पाठीमागच्या बाजूला देशाचे राष्ट्रीय चिन्ह (“चौमुखी सिंहाची प्रतिमा’) अशा प्रकारचे आहे. हा पुरस्कार मिळवणाऱ्यांना इतर कुठलीही विशेष पदवी किंवा मानधन वगैरे मिळत नाही. पण त्यांना Indian order of precedence मध्ये 7 वे स्थान स्थान मिळते.

‘हा पुरस्कार ज्या व्यक्तींना मिळाला आहे, त्यांच्या नावाआधी भारतरत्‍न हा शब्द उपाधीसारखा वापरायची मुभा नाही.

खालील टेबल मध्ये आपण आजपर्यंतचे सर्व भारतरत्न पुरस्कार पाहणार आहोत :

विजेते पुरस्कार  वर्ष क्षेत्र
डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन 1954 
  • भारताचे माजी राष्ट्रपती व नामांकित शिक्षणतज्ञ.
  • 5 सप्टेंबर हा त्यांचा जन्मदिवस भारतात “शिक्षक दिन” म्हणून साजरा केला जातो.
चक्रवर्ती राजगोपालचारी 1954 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते व शेवटचे गव्हर्नर जनरल. 
  • नेहरूंच्या पहिल्या मंत्रिमंडळात ते गृहमंत्री होते. 
  • राजाजी हे पश्चिम बंगालचे पहिले राज्यपाल होते. 
डॉ. चंद्रशेखर वेंकट रमण 1954 
  • प्रसिद्ध भारतीय भौतिकशास्त्रज्ञ.
  • प्रकाशाचे विखुरणे आणि प्रभावाचा शोध यासाठी मोठ्या प्रमाणावर ओळखले जातात.   
  • त्यांना 1930 मध्ये भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक देण्यात आले.
डॉ. भगवान दास 1955 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
डॉ. मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या 1955 
  • पहिले अभियंता ‘बँक ऑफ म्हैसूर’चे संस्थापक
जवाहरलाल नेहरू 1955 
  • भारताचे पहिले पंतप्रधान 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीत अग्रणी असलेले काँग्रेसचे लोकप्रिय नेते
गोविंद वल्लभ पंत 1957 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • उत्तर प्रदेशचे प्रथम मुख्यमंत्री 
  • भारताचे दुसरे गृहमंत्री
धोंडो केशव कर्वे 1958 
  • प्रसिद्ध समाजसुधारक
  • शिक्षणप्रसारक
डॉ. बिधान चंद्र रॉय 1961 
  • पश्चिम बंगालचे पहिले मुख्यमंत्री 
  • वैद्यक
10  पुरूषोत्तम दास टंडन 1961
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते  
11  डॉ. राजेंद्र प्रसाद 1962 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे पहिले राष्ट्रपती
12  डॉ. झाकिर हुसेन 1963
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे राष्ट्रपती
13  महामहोपाध्याय पांडुरंग वामन काणे 1963 
  • शिक्षणप्रसारक
14  लाल बहादूर शास्त्री (मरणोत्तर) 1966 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे दुसरे पंतप्रधान
15  इंदिरा गांधी 1971
  • भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान
16  वराहगिरी वेंकट गिरी 1975 
  • कामगार युनियन पुढारी 
  • भारताचे चौथे राष्ट्रपती
17  के. कामराज (मरणोत्तर) 1976
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
  •  मद्रास राज्याचे मुख्यमंत्री
18  मदर तेरेसा 1980 
  • ख्रिश्चन मिशनरीची नन
  • समाजसेवक
  • मिशनरीज ऑफ चॅरिटीच्या संस्थापक
19  आचार्य विनोबा भावे (मरणोत्तर) 1983 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते  समाजसुधारक
20  खान अब्दुल गफार खान 1987 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील पहिले बिगर भारतीय नेते
21  एम. जी. रामचंद्रन (मरणोत्तर) 1988 
  • चित्रपट अभिनेते 
  • तमिळनाडू राज्याचे मुख्यमंत्री
22  डॉ. बाबासाहेब आंबेडकर (मरणोत्तर) 1990 
  • भारतीय संविधानाचे जनक
  • अर्थशास्त्रज्ञ 
  • भारताचे पहिले कायदामंत्री
23  नेल्सन मंडेला 1990 
  • वर्णभेद विरोधी चळवळीचे प्रणेते
  • द. आफ्रिकेचे पहिले कृष्णवर्णीय राष्ट्राध्यक्ष
24  राजीव गांधी (मरणोत्तर) 1991 
  • भारताचे सातवे पंतप्रधान
25  सरदार वल्लभभाई पटेल ( मरणोत्तर) 1991 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे पहिले गृहमंत्री
26  मोरारजी देसाई 1991 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे पाचवे पंतप्रधान
27  मौलाना अबुल कलाम आझाद (मरणोत्तर) 1992 
  • भारताचे पहिले शिक्षणमंत्री
28  जे.आर.डी. टाटा 1992 
  • उद्योजक
29  सत्यजित रे 1992 
  • बंगाली चित्रपट निर्माते
30  डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम 1997 
  • शास्त्रज्ञ 
  • भारताचे 11 वे राष्ट्रपती
31  गुलझारीलाल नंदा 1997 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे पंतप्रधान
32  अरुणा असफ अली‎ (मरणोत्तर) 1997 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेत्या
33  एम.एस. सुब्बलक्ष्मी 1998 
  • कर्नाटक शैलीतील गायिका
34  चिदंबरम्‌ सुब्रमण्यम् 1998 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • भारताचे कृषीमंत्री
35  जयप्रकाश नारायण (मरणोत्तर) 1999 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
36  रवी शंकर 1999 
  • प्रसिद्ध सितारवादक
37  अमर्त्य सेन 1999 
  • प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ
38  गोपीनाथ बोरदोलोई‎ (मरणोत्तर) 1999 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते 
  • आसामचे मुख्यमंत्री
39  लता मंगेशकर 2001 
  • गायिका
40  बिसमिल्ला खान 2001 
  • शहनाईवादक
41  भीमसेन जोशी 2008 
  • शास्त्रीय गायक
42  सी.एन.आर.राव 2014 
  • शास्त्रज्ञ
43  सचिन तेंडुलकर 2014 
  • क्रिकेटपटू 
44  मदनमोहन मालवीय (मरणोत्तर) 2015 
  • भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील नेते
  • बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्थापक
45  अटलबिहारी वाजपेयी 2015 
  • भारताचे पंतप्रधान
46  नानाजी देशमुख 2019 
  • सामाजिक कार्यकर्ता
47  भूपेन हजारिका 2019 
  • गायक
48  प्रणव मुखर्जी 2019 
  • भारताचे 13 वे राष्ट्रपती

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

भारतरत्न पुरस्कार : आदिवासी विकास विभाग भरती 2023 साठी अभ्यास साहित्य_4.1

FAQs

आदिवासी विकास विभाग भरतीसाठी भारतरत्न पुरस्कार या घटकावरील माहिती अभ्यासात उपयुक्त आहे का ?

होय, आदिवासी विकास विभाग भरतीसाठी तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी भारतरत्न पुरस्कार या घटकावरील माहिती अभ्यासात अतिशय उपयुक्त आहे.

या लेखात आपण भारतरत्न पुरस्कार या घटकावरील माहिती पाहणार आहोत का ?

होय,या लेखात आपण भारतरत्न पुरस्कार या घटकाविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत.