Table of Contents
TMC ठाणे भरती 2023
ठाणे महानगरपालिका भरती 2023: ठाणे महानगरपालिकाने एकूण 72 परिचारिका (नर्स) पदाच्या भरतीसाठी TMC ठाणे भरती 2023 जाहीर केली आहे. ठाणे महानगरपालिका भरती 2023 साठी थेट मुलाखत 29 ऑगस्ट 2023 रोजी होणार आहे. आज या लेखात आपण ठाणे महानगरपालिका भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात अधिसूचना PDF, महत्वाच्या तारखा, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, ऑनलाईन अर्ज लिंक व इतर महत्वाच्या बाबींचा समावेश आहे.
ठाणे महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन
ठाणे महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय व राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाच्या आस्थापनेवरील ” परिचारीका ” संवर्गातील रिक्त पदे कंत्राटी पध्दतीने सहा महिन्याच्या (179 दिवस) कालावधीसाठी भरणेसाठी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली आहे. खालील तक्त्यामध्ये दिलेली ठाणे महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्त्वाची माहिती तपासा.
ठाणे महानगरपालिका भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
प्राधिकरणाचे नाव | ठाणे महानगरपालिका |
भरतीचे नाव | TMC ठाणे भरती 2023 |
पदांची नावे |
परिचारिका (नर्स) |
एकूण रिक्त पदे | 72 |
मुलाखत तारीख | 29 ऑगस्ट 2023 |
निवड प्रक्रिया | मुलाखत |
अधिकृत संकेतस्थळ | https://thanecity.gov.in/tmc/ |
ठाणे TMC भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा
ठाणे महानगरपालिका भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 ऑगस्ट 2023 असून ठाणे महानगरपालिका भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
TMC ठाणे भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
TMC ठाणे भरती 2023 अधिसूचना | 21 ऑगस्ट 2023 |
ठाणे महानगरपालिका भरती 2023 मुलाखत तारीख | 29 ऑगस्ट 2023, सकाळी 11 वाजता |
TMC ठाणे भरती 2023 ची अधिसूचना
ठाणे महानगरपालिका भरती 2023 अंतर्गत परिचारिका (नर्स) पदासाठी भरती जाहीर आली असून उमेदवार ठाणे महानगरपालिका भरती 2023 ची अधिसूचना खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करून करू शकतात.
TMC ठाणे भरती 2023 अधिसूचना PDF
TMC ठाणे भरती 2023 मधील रिक्त पदाचा तपशील
TMC ठाणे भरती 2023 ही एकूण 72 परिचारिका (नर्स) पदांसाठी होणार असून श्रेणी निहाय राख जागा वर दिलेल्या अधिसूचनेत तपासू शकता.
पदाचे नाव | रिक्त पदे |
परिचारिका (नर्स) | 72 |
एकूण | 72 |
ठाणे महानगरपालिका भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
- महाराष्ट्र राज्य शासनाने मान्यता दिलेल्या शिक्षण मंडळाची, उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण (H.S.C)
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची जनरल नर्सिंग व मिडवाइफरी पदविका (जी.एन.एम.)
- बी.एस्सी. (नर्सिंग) असल्यास प्राधान्य.
- महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलची नोंदणी आवश्यक.
- शासकीय / निमशासकीय / स्थानिक स्वराज्य संस्था/ खाजगी संस्थेकडील नर्स मिडवाईफ/ परिचारिका / स्टाफ नर्स या कामाचा किमान 30 वर्षांचा अनुभव.
- ठाणे महानगरपालिकेच्या अधिनस्त परिचर्या प्रशिक्षण संस्थेकडील सुधारित जनरल नर्सिंग व मिडवाईफ किंवा बी. एस्सी (नर्सिंग) पूर्ण केलेल्या उमेदवारांस प्राधान्य.
- मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक.
वयोमर्यादा:
शासन निर्णय क्र. सनिव 2023/प्र.क्र.१४/कार्या 12 दि. 03 मार्च 2023 अन्वये कमाल वयोमर्यादा खुल्या प्रवर्गासाठी 40 वर्षे व मागास प्रवर्गासाठी 45 वर्षे.
TMC ठाणे भरती 2023 निवड प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी कै. अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह, स्थायी समिती सभागृह, तिसरा मजला, प्रशासकीय भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे येथे दि. 29/08/2023 रोजी सकाळी 11:00 वाजता थेट मुलाखतीस (WALK IN INTERVIEW) उपस्थित रहावे.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.