Marathi govt jobs   »   Study Materials   »   संगणक मेमरीचे प्रकार

संगणक मेमरीचे प्रकार | जिल्हा न्यायालय भरतीसाठी अभ्यास साहित्य

संगणक मेमरीचे प्रकार

संगणक मेमरीचे प्रकार: आपले करण्यासाठी संगणक विविध प्रकारच्या मेमरीजचा वापर करत असतो. प्रत्येक मेमरीचे संगणक प्रणाली मध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. आगामी काळातील जिल्हा न्यायालय भरती परीक्षेत संगणकावरील ज्ञान या विषयावर प्रश्न विचारले जाणार आहेत. त्यामुळे आज या लेखात आपण संगणक मेमरीचे प्रकार या बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

संगणक मेमरीचे प्रकार: विहंगावलोकन

संगणक मेमरीचे प्रकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय संगणक
उपयोगिता जिल्हा न्यायालय भरती परीक्षा
लेखाचे नाव संगणक मेमरीचे प्रकार
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • इंटर्नल मेमरी
  • एक्सटर्नल मेमरी
  • RAM
  • ROM

संगणक मेमरीचे प्रकार

संगणक मेमरीचे प्रकारबद्दल सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.

इंटर्नल मेमरी आणि एक्सटर्नल मेमरी असे संगणकाच्या मेमरीचे दोन मुख्य प्रकार पडतात. त्याबद्दल सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

इंटर्नल मेमरी (Internal Memory)

इंटर्नल मेमरी :- ही संगणकाची प्राथमिक मेमरी असते. इंटर्नल मेमरी ही संगणकाच्या मदरबोर्डवर बसविलेली असते. तिच्या शिवाय संगणक कोणतेही कार्य करू शकत नाही. इंटर्नल मेमरीचे तीन उप-प्रकार पडतात.

  • RAM
  • ROM
  • Cache

1) RAM (रॅन्डम ॲक्सेस मेमरी)- RAM ला तात्पुरती मेमरी असेही म्हणले जाते कारण या मेमरी मध्ये साठवलेली माहिती संगणकाचा वीज पुरवठा चालू असे पर्यंतच वापरता येते. वीज पुरवठा बंद झाल्यास ती माहिती पुसली जाऊ शकते. परंतु आताच्या काळात फ्लॅश रॅम चा वापर केला जातो त्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला तरी माहिती तशीच राहू शकते.

RAM
RAM

2) ROM (रीड ओन्ली मेमरी)- या मेमरी मधील माहिती आपण बदलू शकत नाही फक्त वाचू शकतो त्यामुळे तिला रीड ओन्ली मेमरी असे म्हणतात. संगणक सुरु होताना लागणाऱ्या आवश्यक उपकरणांची माहिती या मेमरीमध्ये साठवली जाते.

3) Cache Memory (कॅशे मेमरी): ही एक तात्पुरत्या स्वरुपाची मेमरी असते. या मेमरीचा उपयोग प्रोसेसर ला गरज असेपर्यंत माहिती साठविण्यासाठी होतो. कॅशे मेमरी मुळे सेन्ट्रल प्रोसेसिंग युनिटचा चा वेग वाढण्यास मदत होते.

एक्सटर्नल मेमरी (External Memory)

एक्सटर्नल मेमरी म्हणजे कॉम्प्युटरच्या इंटर्नल मेमरी बरोबरच पुरवलेली आणखी मेमरी असते. या मेमरीमध्ये खालीलप्रमाणे काही मेमरी डिव्हाईस असतात.

1.Floppy Disk (फ्लॉपी डिस्क): – संगणकाच्या संदर्भात सेकंडरी (स्थायी) मेमरी म्हणून प्रामुख्याने फ्लॉपी डिस्क चा वापर केला जातो. फ्लॉपी डिस्कमध्ये साठवलेल्या माहितीमध्ये केव्हाही बदल करू शकतो किंवा ती परत केव्हाही वापरू शकतो. या मेमरीची एक ठराविक क्षमता असते.

2.Hard disk(हार्डडिस्क): – या मेमरीचा वापर मोठ्या प्रमाणात माहिती साठविण्यासाठी होतो. हार्डडिस्कची क्षमता सामान्यपणे GB आणि TB मध्ये असते. आधीच्या संगणकांमध्ये हार्डडिस्क ड्राईव्ह चा वापर होत असे परंतु आताच्या वेगवान संगणकांमध्ये सॉलिड स्टेट ड्राईव्ह चा वापर केला जातो.

हार्ड डिस्क
हार्ड डिस्क

3.Optical Disk (ऑप्टिकल डिस्क): – या प्रकारच्या डिस्कमध्ये चुंबकीय प्रभावाच्या (Magnetic Effect) सहाय्याने माहिती साठविण्याऐवजी लेसर किरणांच्या सहाय्याने प्लॅस्टिकच्या डिस्कवर माहिती साठविली जाते. आजकाल फ्लॉपीज पेक्षाही या प्रकारच्या डिस्क्स् जास्त प्रमाणात माहितीच्या देवाण-घेवाणीसाठी वापरल्या जातात.

Note: महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा-महापॅक
महाराष्ट्राचा-महापॅक

Sharing is caring!

FAQs

संगणक मेमरीचे मुख्य प्रकार किती आहेत?

संगणक मेमरीचे मुख्य प्रकार 2 आहेत.

संगणक मेमरीचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

संगणक मेमरीचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.