Table of Contents
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना जाहीर
केंद्रीय लोकसेवा आयोग भारत सरकारच्या विविध विभाग आणि मंत्रालयांमधील उच्च श्रेणीच्या पदांवर अभियांत्रिकी पदवीधरांची भरती करण्यासाठी दरवर्षी UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा आयोजित करते. दिनांक 14 सप्टेंबर 2022 रोजी UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना जाहीर झाली आहे. या लेखात आपण UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) 2023 परीक्षेसंबंधी सर्व तपशील तपासू शकता ज्यात अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, ऑनलाईन अर्ज लिंक, परीक्षेचे स्वरूप इत्यादीं गोष्टींचा समावेश आहे.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: विहंगावलोकन
UPSC मार्फत UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. UPSC मार्फत ही परीक्षा दरवर्षी घेतली जाते. उमेदवार खालील तक्त्यामध्ये UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 चे तपशीलवार विहंगावलोकन पाहू शकतात.
श्रेणी | सरकारी नोकरी |
परीक्षेचे नाव | UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 |
संचलन करणारी संस्था | संघ लोकसेवा आयोग (UPSC) |
परीक्षेची पातळी | राष्ट्रीय |
निवड प्रक्रिया | पूर्व परीक्षा, मुख्य परीक्षा आणि मुलाखत |
प्राथमिक परीक्षा | वस्तुनिष्ठ प्रश्न |
परीक्षा मोड (Exam Mode) | ऑफलाइन |
एकूण पदे | 327 (अपेक्षित) |
अधिकृत संकेतस्थळ | @www.upsc.gov.in |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: अधिसूचना
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षेमार्फत सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III) आणि इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग (श्रेणी IV) या संवर्गातील इंजिनिअर पेदांची भरती केल्या जाते. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना 14 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर करण्यात आली. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना वाचणे आवश्यक आहे. आपण खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना डाउनलोड करू शकता.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: महत्वाच्या तारखा
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 असून UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 संदर्भात सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहेत.
Events | Dates |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना | 14 सप्टेंबर 2022 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख | 14 सप्टेंबर 2022 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख | 04 ऑक्टोबर 2022 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची तारीख | 19 फेब्रुवारी 2023 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 चा निकाल | मार्च 2023 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) मुख्य परीक्षा 2023 ची तारीख | 25 जून 2023 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) मुख्य परीक्षा 2023 चा अंतिम निकाल | ऑगस्ट 2023 |
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: रिक्त जागांचा तपशील
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत रिक्त पदांची संख्या अंदाजे 327 आहे. ज्यात बेंचमार्क अपंग व्यक्ती (PwBD) साठी 11 रिक्त पदांचा समावेश आहे. UPSC ने अधिकृत संवार्गानुसार रिक्त पदांचा तपशील जाहीर केल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू त्यासाठी या लेखास बुकमार्क करून ठेवा.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: पात्रता निकष
ज्या उमेदवारांना UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 द्वारे IES अधिकारी बनायचे आहे त्यांनी अधिकृत अधिसूचनेत नमूद केलेल्या सर्व पात्रता तपशीलांची पूर्तता करणे आवश्यक आहे. परीक्षेत बसण्यासाठी ही किमान आवश्यक पात्रता आहे. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: पात्रता तपशील खाली दिलेला आहे.
शैक्षणिक पात्रता
उमेदवाराने मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा इतर शैक्षणिक संस्थांमधून सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स आणि दूरसंचार अभियांत्रिकीमध्ये अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली आहे. तसेच, अंतिम वर्षाचे विद्यार्थी UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी पात्र आहेत.
वयोमर्यादा
अधिकृत अधिसूचनेमध्ये दिलेल्या महत्त्वपूर्ण तारखेला उमेदवाराचे वय 1 जानेवारी 202 रोजी 21 ते 30 वर्षे दरम्यान असणे आवश्यक आहे.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: अर्ज शुल्क
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी आवश्यक असणारे अर्ज शुल्क संवार्गानुसार खालीलप्रमाणे आहे.
- General / OBC: रु. 200
- SC/ST/PWD/महिला: फी नाही
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: ऑनलाईन अर्ज लिंक
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2022 अंतर्गत ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 14 सप्टेंबर 2022 पासून सुरु झाली आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 आहे. खाली दिलेल्या डायरेक्ट लिंक वर क्लिक करून आपण UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करू शकता.
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023: परीक्षेचे स्वरूप
UPSC IES परीक्षा 2023 ची तयारी करणाऱ्या उमेदवारांनी परीक्षेशी परिचित होण्यासाठी तपशीलवार परीक्षा पॅटर्न समजून घेणे आवश्यक आहे. UPSC ESE 2023 साठी परीक्षेचे स्वरूप खाली दिले आहे.
Stage I: Preliminary Exam (Objective Type Papers)
Papers | Subject | Marks | Duration |
Paper-I | General Studies & Engineering Aptitude Paper | 200 Marks | 2 Hours |
Paper-II | Engineering Discipline – Specific Paper | 300 Marks | 3 Hours |
Total | 500 Marks | 5 Hours |
Stage II: Mains Examination (Conventional Type)
Papers | Subjects | Marks | Duration |
Paper-I | Engineering Discipline – Specific Paper – I | 300 Marks | 3 Hours |
Paper-II | Engineering Discipline – Specific Paper – II | 300 Marks | 3 Hours |
Total | 600 Marks | 6 Hours |
Latest Job Alerts
FAQs UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023
Q1. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना कधी जाहीर झाली?
Ans. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 ची अधिसूचना 14 सप्टेंबर 2022 रोजी जाहीर झाली.
Q2. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे.?
Ans. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 ऑक्टोबर 2022 आहे.
Q3. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत रिक्त पदांची संख्या किती आहे?
Ans. UPSC इंजिनिअरिंग सेवा (ESE) पूर्व परीक्षा 2023 अंतर्गत रिक्त पदांची संख्या अंदाजे 327 आहे.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |
Official Website of UPSC | www.upsc.gov.in |