Table of Contents
वनरक्षक भरती 2023
वनरक्षक भरती 2023: वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 रोजी सक्रीय करण्यात आली आहे. महाराष्ट्र वन विभागाने वनरक्षक संवर्गातील एकूण 2138 पदाच्या भरतीसाठी वनरक्षक भरती 2023 जाहीर केली आहे. वनरक्षक भरती 2023 भरती साठी उमेदवार दिनांक 10 ते 30 जून 2023 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकतात. या लेखात वनरक्षक भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती प्रदान करण्यात आली आहे. ज्यात अधिसूचना, रिक्त पदे, महत्वाच्या तारखा, पात्रता निकष आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती देण्यात आली आहे.
वनरक्षक भरती 2023: विहंगावलोकन
वनरक्षक भरती 2023 अंतर्गत एकूण 2138 वनरक्षक या संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार आहे. वनरक्षक भरती 2023 बद्दल थोडक्यात माहिती या लेखात प्रदान करण्यात आली आहे.
वन विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वनरक्षक भरती 2023 |
पदाचे नाव |
वनरक्षक |
एकूण रिक्त पदे | 2138 |
निवड प्रक्रिया |
|
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वनरक्षक भरती 2023: महत्वाच्या तारखा
महाराष्ट्र वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 रोजी सक्रीय होणार असून वनरक्षक भरती 2023 सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
वनरक्षक भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
वनरक्षक भरती 2023 ची अधिसूचना | 08 जून 2023 |
वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 10 जून 2023 |
वनरक्षक भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 30 जून 2023 |
वन विभाग परीक्षा 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वन विभाग निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वनरक्षक भरती 2023 अधिसूचना PDF
दिनांक 08 जून 2023 रोजी वन विभागामार्फत वनरक्षक भरती 2023 ची अधिसूचना PDF जाहीर करण्यात आली आहे. वनरक्षक पदासोबत लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल आणि सर्वेक्षक यादेखील पदांची भरती होणार आहे. वनरक्षक भरती 2023 ची अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभागातील इतर पदांच्या भरतीबद्दल तपशीलवार माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वनरक्षक भरती 2023 मधील रिक्त पदांची संख्या
महाराष्ट्रात वन विभागाने एकूण 2138 रिक्त पदांच्या भरतीसाठी वनरक्षक भरती 2023 जाहीर केली आहे. वनरक्षक संवर्गातील रिक्त पदांचा तपशील वनवृत्तानुसार खालीलप्रमाणे आहे.
वनवृत्त | रिक्त पदे |
नागपूर | 277 |
चंद्रपूर | 122 |
गडचिरोली | 200 |
अमरावती | 250 |
यवतमाळ | 79 |
औरंगाबाद | 73 |
नांदेड | 10 |
नंदुरबार | 82 |
धुळे | 96 |
जळगाव | 68 |
अहमदनगर | 11 |
नाशिक | 88 |
पुणे | 73 |
ठाणे | 310 |
पालघर | 150 |
कोल्हापूर | 249 |
एकूण | 2138 |
वनरक्षक भरती 2023: अर्ज शुल्क
वनरक्षक भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
वनरक्षक भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
वनरक्षक भरती 2023 मधील वनरक्षक पदास आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि शारीरिक निकष खालीलप्रमाणे आहेत.
शैक्षणिक पात्रता
- उमेदवाराने उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (12 वी) ही विज्ञान किंवा गणित किंवा भूगोल किंवा अर्थशास्त्र यापैकी किमान एका विषयासह उत्तीर्ण केलेली असावी.
- अनुसूचित जमाती प्रवर्गातील उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- माजी सैनिक असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
- नक्षलवाद्यांच्या हल्ल्यात मरण पावलेले किंवा गंभीर जखमी झालेले वनखबरे व वन कर्मचा- यांचे पाल्य असलेल्या उमेदवाराने माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा (10 वी) उत्तीर्ण केली असल्यास अशा उमेदवार अर्ज करण्यास पात्र राहील.
वयोमर्यादा
वनरक्षक भरती 2023 साठी प्रवर्गानुसार आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे
शारीरक निकष
वन विभाग भरती 2023 मध्ये वनरक्षक पदास आवश्यक असणारे शारीरिक निकष खालीलप्रमाणे आहे.
मापदंड | पुरुष | महिला |
उंची | 163 सेमी | 150 सेमी |
छाती | 79 सेमी (84 सेमी फुगवून) | लागू नाही |
वजन | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
वनरक्षक पदासाठी उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.
वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक 10 जून 2023 रोजी सक्रीय झाली असून ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 30 जून 2023 आहे. वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक खाली प्रदान करण्यात आली आहे.
वनरक्षक भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक सक्रीय)
वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आला आहे.
- सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या.
- तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल. तेथील ऑनलाईन लिंक वर क्लीक करा
- To Register समोरील क्लिक हिअर वर क्लीक करा.
- आता ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
- सर्व माहिती योग्यरित्या भरा.
- अर्ज शुल्क भरा व अर्जाची प्रिंट काढून घ्या.
वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023
वनरक्षक भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वनरक्षक परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वनरक्षक भरती 2023 ची निवड प्रक्रिया
वनरक्षक भरती 2023 अंतर्गत होणाऱ्या वनरक्षक पदाची ऑनलाईन परीक्षा घेण्यात येईल त्यानंतर त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. वनरक्षक भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी
- कागदपत्र तपासणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख | |
वन विभाग भरती 2023 अधिसूचना | वन विभाग भरती रिक्त पदे 2023 |
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 | वन विभाग वेतन 2023 |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |