Table of Contents
1857 नंतरचे भारतातील व्हॉईसरॉय : 1857 च्या उठावानंतर ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता संपुष्टात आली आणि भारत थेट ब्रिटिशांच्या अधिपत्याखाली आला. भारत सरकार कायदा 1858 पारित करण्यात आला ज्याने भारताचे गव्हर्नर जनरल यांना भारताचे व्हाईसरॉय म्हणून नाव दिले. 1857 च्या उठावाच्या वेळी गव्हर्नर जनरल असलेले लॉर्ड कॅनिंग हे भारताचे पहिले व्हाईसरॉय बनले. या लेखात, आम्ही भारताच्या व्हाईसरॉयची संपूर्ण यादी दिली आहे.
1857 नंतरचे भारतातील व्हॉईसरॉय : विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
साठी उपयुक्त | आदिवासी विकास विभाग भरती 2023 |
विषय | आधुनिक भारताचा इतिहास |
लेखाचे नाव | 1857 नंतरचे भारतातील व्हॉईसरॉय |
Viceroys of India after 1857 | 1857 नंतरचे भारतातातील व्हॉईसरॉय
Viceroys of India after 1857: नोव्हेंबर 1858 च्या राणीच्या जाहिरनाम्यानुसार भारतातील कंपनीची राजवट संपुष्टात येऊन राज्यकारभाची सुत्रे ब्रिटिश पार्लमेंटकडे आली. भारताचा गव्हर्नर जनरल हा भारताचा व्हाईसरॉय बनला. ब्रिटिश शासनाने तूर्तास राज्यविस्ताराचे धोरण थांबवून सत्ता बळकट करण्यास प्राधान्य दिले. 1857 च्या उठावावेळी गव्हर्नर जनरलपदी असलेला लॉर्ड कॅनिंग हा भारताचा पहिला व्हाईसरॉय बनला.
List of Viceroys of India after 1857, 1857 नंतरच्या भारतातील व्हाइसरॉय्सची यादी
List of Viceroys of India after 1857: 1856 ते 1947 या काळात भारताच्या व्हाईसरॉयची संपूर्ण यादी येथे आहे:
Sr. No. | Viceroy of India | Tenure |
1 | Lord Canning | 1858 – 1862 |
2 | Lord Elgin | 1862 – 1863 |
3 | Lord Lawrence | 1864 – 1869 |
4 | Lord Mayo | 1869 – 1872 |
5 | Lord Northbrook | 1872 – 1876 |
6 | Lord Lytton | 1876 – 1880 |
7 | Lord Ripon | 1880 – 1884 |
8 | Lord Dufferin | 1884 – 1888 |
9 | Lord Lansdowne | 1888 – 1894 |
10 | Lord Elgin II | 1894 – 1899 |
11 | Lord Curzon | 1899 – 1905 |
12 | Lord Minto II | 1905 – 1910 |
13 | Lord Hardinge II | 1910 – 1916 |
14 | Lord Chelmsford | 1916 – 1921 |
15 | Lord Reading | 1921 – 1926 |
16 | Lord Irwin | 1926 – 1931 |
17 | Lord Willingdon | 1931 – 1936 |
18 | Lord Linlithgow | 1936 – 1944 |
19 | Lord Wavell | 1944 – 1947 |
20 | Lord Mountbatten | 1947-48 |
Viceroys of India after 1857- 1st Viceroy of India, Lord Canning (1858 – 1862) | भारताचे पहिले व्हाईसरॉय, लॉर्ड कॅनिंग
1st Viceroy of India: लॉर्ड कॅनिंग (1856-1858 या काळात गव्हर्नर जनरल, 1858-62 या काळात व्हाईसरॉय) याच्या कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे आहेत:
- भारताचा पहिला व्हाईसरॉय (1858-1862)
- 1857 चे बंड मोडून काढले.
- 1856-1857 मध्ये आय. सी. एस्. परीक्षेची भारतात सुरूवात केली.
- 1857 मध्ये मुंबई, मद्रास, कोलकाता येथे विद्यापीठांची स्थापना केली.
- खालसा धोरण रद्द केले.
- 1860 मध्ये आग्रा व लाहोर येथे दरबार भरवून संस्थानिकांना त्यांच्या सनदा परत करण्याची घोषणा केली.
- 1836 मध्ये लॉर्ड मेकॉलेने तयार केलेल्या ‘इंडियन पीनल कोड’ ला 1860 मध्ये कॅनिंगने मान्यता दिली.
- 1861 च्या “Indian High-court Act’ नुसार मुंबई, मद्रास व कोलकाता येथे उच्च न्यायालयांची स्थापना केली
- भारतमंत्री चार्ल्स वूडच्या सल्ल्यानुसार 1859 मध्ये भारतातील प्रत्येक प्रांतात शिक्षण खाते सुरू केले.
- 1861 मध्ये कोलकाता अहमदाबाद लोहमार्ग सुरू केला.
- 1861 चा कौन्सिल ॲक्ट संमत केला.
- 1959 मध्ये शेतकऱ्यांसाठी हितकारक असा ‘बंगाल रेंट ॲक्ट ‘ संमत केला.
Viceroys in India: Sir John Lawrence | सर जॉन लॉरेन्स
Viceroys of India after 1857: सर जॉन लॉरेन्सच्या (1864-69) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- शेतकऱ्यांच्या हितासाठी पंजाब, अवध येथे ‘टेनन्सी ॲक्ट’ पास केले.
- 1868 मध्ये दुष्काळ आयोगाची (फॅमिन कमिशन) स्थापना केली.
- जलसिंचन खाते निर्माण करून त्यावर रिचर्ड स्ट्रेंची या तज्ज्ञाची नियुक्ती केली.
- पाटबंधारे खाते सुरू केले. सिमला हे उपराजधानीचे ठिकाण निर्माण केले.
- अफगाणिस्तानबरोबर उत्कृष्ट निष्क्रीयता धोरण राबविले.
Viceroys of India: Lord Mayo | लॉर्ड मेयो
Viceroys of India after 1857: लॉर्ड मेयोच्या (1869-1872) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- आर्थिक विकेंद्रीकरणाचा जनक
- 14 डिसेंबर 1870 चे आर्थिक विकेंद्रीकरणाचे विधेयक पास केले. (प्रांतिक स्वायत्ततेची सनद)
- 1872 मध्ये मेयोने पहिली जनगणना केली. याच्या काळात वहाबी चळवळ, कुका चळवळ क्रियाशील झाल्या.
- 1872 मध्ये अंदमान येथे शेरअलीने लॉर्ड मेयोचा खून केला
Viceroys of India: Lord Northbrook | लॉड नॉर्थबुक
Viceroys of India after 1857: लॉड नॉर्थबुकच्या (1872-1876) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- बिहारमधील दुष्काळ, अफगाणिस्तानसंबंधी धोरण यावरून विवादास्पद
- 1875 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सची भारतभेट
Viceroys of India: Lord Litton | लार्ड लिटन
Viceroys of India after 1857: लार्ड लिटनच्या (1876-1880) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1876-78 च्या दुष्काळावर उपाय सुचविण्यासाठी रिचर्ड स्ट्रेंची आयोग नेमला.
- 1 जानेवारी 1877- दिल्ली दरबारात राणी व्हिक्टोरियास ‘भारताची सम्राज्ञी’ (कैसर-ए-हिंद) पदवी दिली.
- मार्च 1878- देशी वृत्तपत्र कायदा (व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट) संमत करून वृत्तपत्रांची मुस्कटदाबी केली.
- 1878 चा शस्त्रबंदी कायदा. (विनापरवाना शस्त्रे बाळगण्यास भारतीयांवर बंदी)
- 1879 चा ‘स्टॅट्यूटरी सिव्हिल सर्व्हिसेस ॲक्ट’ संमत करून परीक्षेची कमाल वयोमर्यादा २१ वरून १९ वर्षे केली.
- 1883 ची दुष्काळ संहिता (Famine Code)
- मीठाच्या व्यापारावर जाचक कर लादले.
Viceroys of India: Lord Ripon | लॉर्ड रिपन
Viceroys of India after 1857: लॉर्ड रिपनच्या (1880-1884) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- म्हैसूर, बडोदा या राज्यांची पुनर्स्थापना (1881).
- 1881- फॅक्टरी ॲक्ट संमत के ला (7 वर्षापेक्षा कमी वयाच्या मुलांना कामावर ठेवण्यास बंदी)
- 19 जानेवारी 1882 व्हर्नाक्यूलर प्रेस ॲक्ट रद्द केला.
- 1882- प्राथमिक शिक्षणासंबंधी विचारार्थ विल्यम हंटर कमिशन नेमले. हाच भारतीय शिक्षण आयोग होय.
- 18 मे 1882- स्थानिक स्वराज्य संस्थांचा कायदा केला.
- 2 फेब्रुवारी 1883- इलबर्ट विधेयक मंजूर केले. त्यानुसार भारतीय न्यायाधीशांना युरोपियन आरोपींचे खटले चालवण्याचा अधिकार मिळाला.
- रमेशचंद्र मित्तर यांची कोलकाता उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशपदी नियुक्ती केली.(पहिले भारतीय)
- नागरी सेवा परीक्षेची कमाल वयोमर्यादा 19 वरून पुन्हा 21 वर्षे केली.
- मानवतावादी दृष्टीकोन व भारताबद्दलची आस्था यामुळे रिपनला भारतात कमालीची लोकप्रियता लाभली.
Viceroys in India: Lord Dufferin | लॉर्ड डफरिन
Viceroys of India after 1857: लॉर्ड डफरिनच्या (1884-1888) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 28 डिसेंबर 1885 रोजी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाची स्थापना.
- जानेवारी 1886- उत्तर ब्रम्हदेश भारतात विलिन करून घेतला. (3 रे बर्मा युध्द)
- 1886- चार्लस् अचिसनच्या अध्यक्षतेखाली लोकसेवा आयोगाची स्थापना.
- 1887- पंजाब कुळकायदा संमत.
- 36 फेब्रुवारी 1887- व्हिक्टोरिया राणीच्या राज्यरोहणाच्या 50 व्या वर्धापनदिनाचे आयोजन. डफरिन यांच्या पत्नीने भारतीय स्त्रियांच्या आरोग्यासाठी लेडी डफरिन फंड स्थापन केला.
- इंपिरिअल सर्व्हिस टुप्स योजनेंतर्गत संस्थानिकांना स्वतःचे सैन्य ठेवण्यास परवानगी. (पंजदेह प्रकरण)
Viceroys in India: Lord Curzon | लॉर्ड कर्झन
Viceroys of India after 1857: लॉर्ड कर्झनच्या (1899-1905) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1899- भारतीय चलन कायदा संमत, भारतासाठी सुवर्ण परिमाणाचा स्वीकार
- 1900- कोलकाता महापालिका विधेयक मंजूर करून स्थानिक स्वराज्य संस्थांवर नियंत्रणे लादली.
- 1900- लॉर्ड मॅक्डोनलच्या अध्यक्षतेखाली दुष्काळ आयोग नेमला.
- 1901- शेतकऱ्यांची पिळवणूक रोखण्यासाठी ‘पंजाब लँड एलीनेशन’ कायदा संमत.
- सर्वाधिक रेल्वेमार्गांची निर्मिती.
- 1901- सिमला येथे शिक्षणपरिषद,
- 1901- वायव्य सरहद्द प्रांताची निर्मिती.
- 1901- रॉयल नेव्हीची स्थापना.
- 1901- संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षणासाठी ‘इंपिरिअल कॅडेट कोअर ची स्थापना.
- 1901- राणी व्हिक्टोरियाच्या स्मृतिप्रित्यर्थ कोलकाता येथे ‘व्हिक्टोरिया मेमोरिअल हॉल’ स्मारक
- 1901- ब्रिटिश वैभवाचे प्रदर्शन करण्यासाठी दिल्ली दरबार भरवला.
- 1901 -भारतीय रेल्वेची स्थिती अभ्यासण्यासाठी कर्झन याने ‘थॉमस रॉबर्टसन’ आयोगाची नियुक्ती केली. या आयोगाच्या शिफारशींनुसार 1905 मध्ये भारतात रेल्वे बोर्डाची’ स्थापना.
- 1902- अँड्रू फ्रेझर याच्या अध्यक्षतेखाली पोलिस सेवेतील दोष शोधण्यासाठी समिती नेमली.
- 1904- विद्यापीठ कायदा संमत करून उच्च शिक्षणपध्दतीवर निर्बंध आणले.
- 1904- भारतातील पहिला सहकारी पतपेढी विषयक कायदा संमत केला.
- 1904- भारतातील प्राचीन स्मारकांचा संरक्षण कायदा संमत केला.
- 19 जूलै 1905- बंगालच्या अन्याय्य फाळणीची अधिसूचना. फाळणीची मूळ कल्पना- सर विल्यम वॉर्ड (1896) फाळणीस विरोध- सर हेन्री कॉटन
- स्वदेशी चळवळीस प्रारंभ : 17 ऑगस्ट 1905
- 16 ऑक्टोबर 1905- बंगालच्या फाळणीची अधिकृत घोषणा.
- लष्करी अधिकाऱ्यांसाठी क्वेट्टा येथे प्रशिक्षण केंद्र उभारले.
- लोकमान्य टिळकांनी कर्झनची तुलना औरंजेबाशी केली.
Viceroys in India: Lord Minto 2 | लॉर्ड मिंटो दुसरा
Viceroys of India after 1857: लॉर्ड मिंटो दुसरा च्या (1905-1910) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- बंगाल विभाजनचा विरोध व स्वदेशी आंदोलन.
- काँग्रेसचे विभाजन (1907) सुरत.
- 1906- ढाका येथे मुस्लीम लीगची स्थापना झाली.
- 1909- मोर्ले – मिंटो सुधारणा
- 1908- वृत्तपत्र अधिनियम
- 1911- बंगालची फाळणी रद्द केली, याबाबतची घोषणा इंग्लंडचा राजा पंचम जॉर्ज याने केली.
- 1911- किंग जॉर्ज पाचवा व क्वीन मेरीचा राज्याभिषेक दरबार दिल्ली येथे भरविण्यात आला
- 1911- राजधानी कलकत्याहून दिल्लीला.
- 1915- हिंदू महासभेची स्थापना.
- 1915- गदर पार्टी सॅनफ्रेंन्सिस्को
Viceroys of India: Lord Chelmsford | लॉर्ड चेम्सफोर्ड
Viceroys of India after 1857: लॉर्ड चेम्सफोर्डच्या (1916-1921) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1916-होमरूल लीग
- 1916- काँग्रेसचे लखनौ अधिवेशन – काँग्रेस व लीग समझौता.
- 1919- माँटफोर्ड सुधारणा.
- मार्च 1919 – जालियनवाला बाग.
- असहकार व खिलाफत चळवळ.
- 1916- पुणे येथे महिला विद्यापीठ- कर्वे.
- बिहारचे गर्व्हनर म्हणून एस. पी. सिन्हा (गव्हर्नरपदी जाणारे पहिले भारतीय ).
- 1917- शिक्षण सुधारणा आयोग – सैडलर
- 1918- इंडियन लिबरल फेडरेशनची स्थापना.
Viceroys in India: Lord Riding | लॉर्ड रिडिंग
Viceroys of India after 1857: लॉर्ड रिडिंगच्या (1921-1925) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- सर्व व्हॉईसरॉयपैकी एकमेव यहूदी
- 1921- मोपलांचे बंड
- 1922- चौरीचौरा
- 1922- काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष व ज्येष्ठ नेते. – दास
- 1923-आयसीएसची परीक्षा एकाचवेळी- दिल्ली व लंडन येथे घेण्याचा निर्णय
- 1925- नागपूर – राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना
- 1925- काकोरी ट्रेन
- 1926- स्वामी श्रद्धानंदाची हत्या.
- क्रिमिनल लॉ दुरुस्ती विधेयक
Viceroys of India: Lord Irwin | लॉर्ड आयर्विन
Viceroys of India after 1857: लॉर्ड आयर्विनच्या (1926-1931) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1928- सायमन कमिशन
- 1927- हरकोर्ट बटलोर भारतीय राज्य आयोग (Indian states commission)
- 1929- लाहोर अधिवेशन – पूर्ण स्वराज्याची मागणी
- 1930- मिठाचा सत्याग्रह.
- साँडर्सची हत्या – असेंब्ली हॉल (दिल्लीत) – बॉम्य स्फोट,
- लाहोर कट खटला व जतीनदासचा तुरुंगात उपोषणाने मृत्यू
- ट्रेन- दिल्लीत बॉम्ब अपघात.
- 1930- सविनय कायदेभंग चळवळ,
- 1930- प्रथम गोलमेज परिषद
Viceroys of India: Lord Willingdon | लॉर्ड विलिंग्डन
Viceroys of India after 1857: लॉर्ड विलिंग्डनच्या (1931-1936) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1931-दुसरी गोलमेज परिषद
- पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ 1934 ला आंदोलन मागे.
- 1932- पुणे करार
- 1935 चा भारत सरकार अधिनियम.
- 1935- आरबीआयची स्थापना (RBI)
- 1935- भारतापासून बर्मा वेगळा.
- काँग्रेस समाजवादी पक्ष (1934) आचार्य नरेंद्र देव – जयप्रकाश नारायण.
- 1936- अखिल भारतीय किसान सभा
Viceroys of India: Lord Linlithgow | लॉर्ड लिनलिथगो
Viceroys of India after 1857: लॉर्ड लिनलिथगोच्या (1936-1943) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 1937 ला अनेक प्रांतात काँग्रेसची मंत्रिमंडळे आली, नंतर 1939 ला युद्धाच्यावेळी राजीनामे दिले.
- सुभाषचंद्र बोस यांनी काँग्रेस सोडली व फॉरवर्ड ब्लॉकची स्थापना.
- मुस्लीम लीगचा लाहोर जाहीरनामा, येथेच जीनांच द्विराष्ट्र सिद्धांत.
- ऑगस्ट घोषणा (१९४०) लीगने स्वीकारली. काँग्रेसने नाकारली.
- चर्चिल इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून नियुक्त.
- सुभाषचंद्र बोस – भारताबाहेर (1941)- आयएनएची स्थापना.
- 1942- क्रिप्स मिशन- ‘डोमिनियन स्टेटस’ – गांधीनुसार- Post dated check.
- चलेजाव चळवळीची घोषणा.
- लीगचे कराची अधिवेशन-‘फोडा आणि राज्य करा’- घोषणा
Viceroys of India: Lord Wavell | लॉर्ड वेव्हेल
Viceroys of India after 1857: लॉर्ड वेव्हेलच्या (1943-1947) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- सी राजगोपालाचारी द्वारा सीआर फॉर्म्युला -बोलणी अयशस्वी (गांधी-जीना).
- वेव्हेल योजना – सिमला संमेलन
- आयएनए – खटला व नौसैनिक विद्रोह.
- कॅबिनेट मिशन योजना काँग्रेस व लीगकडून योजनेची स्वीकृती.
- मुस्लीम लीगचा प्रत्यक्ष कृती दिन 17 ऑगस्ट 1946 (Direct Action Day).
- संविधान सभेसाठी निवडणूक – अंतरिम सरकार.
- 20 फेब्रु. 1947- भारत सोडण्याची ब्रिटिश पंतप्रधान ॲटलींची घोषणा
Viceroys of India: Lord Mountbatten | लॉर्ड माऊंटबॅटन
Viceroys of India after 1857: लॉर्ड माऊंटबॅटनच्या (1947-1948) कारकिर्दीतील प्रमुख घटना पुढीलप्रमाणे:
- 3 जून 1947- माऊंटबॅटन योजनेची घोषणा – भारताचे विभाजन.
- 15 ऑगस्ट 1947 ला भारत स्वतंत्र झाला.आणि 5 मार्च 1948 ला सी. राजगोपालचारी यांची भारताचे पहिले आणि शेवटचे गर्व्हनर जनरल म्हणून नेमणूक झाली.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.