Marathi govt jobs   »   Latest Post   »   विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण, अशी कामगिरी करणारा जगातील एकमेव फलंदाज

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण: सध्या चालू असलेल्या एकदिवसीय विश्वचषकामध्ये, आज दिनांक 15 नोव्हेंबर 2023 रोजी भारत वि. न्यूझीलंड हा उपांत्यफेरीचा सामना सुरु आहे. या सामन्यात जागतिक क्रिकेट मध्ये सर्वश्रेष्ठ मानल्या जाण्याऱ्या विराट कोहलीने आपल्या एकदिवसीय करीयर मधील 50वे शतक झळकावले आहे. असा पराक्रम करणारा तो जगातील एकमेव खेळाडू ठरला आहे. या लेखात आपण विराट कोहलीच्या आजवरच्या कारकिर्दीतील शतकांचा आढावा घेणार आहोत.

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण: विहंगावलोकन 

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण: विहंगावलोकन 
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
लेखाचे नाव विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण
लेख तुम्हाला काय प्रदान करतो?
  • विराट कोहलीच्या 50व्या शतकाबद्दल माहिती
  • आजवरच्या कारकिर्दीतील शतकांचा आढावा

विराट कोहलीच्या 50व्या शतकाबद्दल माहिती

विराट कोहलीने नुकतेच आपल्या एकदिवसीय कारकिर्दीतील 50वे शतक पूर्ण केले आहे. भारतात सध्या चालू असलेल्या क्रिकेट विश्वचषका दरम्यान त्याने ही कामगिरी केली आहे. आज भारताचा न्यूझीलंड विरुद्ध उपांत्य फेरीतील सामना मुंबईतील वानखेडे स्टेडीयम वर होणार आहे. या सामन्यात जो संघ जिंकेल तो अंतिम सामना खेळणार आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सलामी जोडीने चांगली सुरुवात केली परंतु रोहित शर्मा 47 धावांवर बाद झाला व त्यानंतर विराट कोहली मैदानावर आला. त्याने नेहमी प्रमाणे सावध सुरुवात करून नंतर न्युझीलंडच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला व अवघ्या 105 चेंडूमध्ये आपले 50वे शतक पूर्ण केले. त्याने आपला आदर्श सचिन तेंडुलकरला या बाबतीत मागे सोडून एक नवा विश्वविक्रम प्रस्थापित केला.

 

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण
विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक पूर्ण

विराट कोहलीच्या आजवरच्या एकदिवसीय कारकिर्दीतील शतकांचा आढावा 

आजचे शतक मिळून विराट कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकीर्दीमध्ये एकूण 80 शतक पूर्ण केले आहेत. एकदिवसीय सामन्यांमध्ये 50 शतक, कसोटी मध्ये 29 तर T20 मध्ये 1 शतक पूर्ण करणारा विराट हा जगात दुसऱ्या क्रमांकावर येतो. एकदिवसीय सामन्यांमधील 50 शतकांची यादी खाली दिली आहे.

अ.क्र तारीख  विरुद्ध  धावा  मैदान 
1 24 डिसेंबर 2009 श्रीलंका 107 ईडन गार्डन्स, कोलकाता
2 11 जानेवारी 2010 बांगलादेश 102* शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
3 20 ऑक्टोबर  2010 ऑस्ट्रेलिया 118 एपीसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
4 28 नोव्हेंबर 2010 न्युझीलँड 105 नेहरू स्टेडियम, गुवाहाटी
5 19 फेब्रुवारी 2011 बांगलादेश 100* शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
6 16 सप्टेंबर 2011 इंग्लंड 107 सोफिया गार्डन्स, कार्डिफ
7 17 ऑक्टोबर 2011 इंग्लंड 112* फिरोजशाह कोटला मैदान, दिल्ली
8 2 डिसेंबर 2011 वेस्ट इंडीज 117 एपीसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
9 28 फेब्रुवारी 2012 श्रीलंका 133* बेलेरिव्ह ओव्हल, होबार्ट
10 13 मार्च 2012 श्रीलंका 108 शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
11 18 मार्च 2012 पाकिस्तान 183 शेरे बांगला नॅशनल स्टेडियम, ढाका
12 21 जुलै 2012 श्रीलंका 106 एमआरआयसी स्टेडियम, हंबनटोटा
13 31 जुलै 2012 श्रीलंका 128 आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
14 5 जुलै 2013 वेस्ट इंडीज 102 क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
15 24 जुलै 2013 झिंबाब्वे 115 हरारे स्पोर्ट्स क्लब, हरारे
16 16 ऑक्टोबर 2013 ऑस्ट्रेलिया 100* सवाई मानसिंग स्टेडियम, जयपूर
17 30 ऑक्टोबर 2013 ऑस्ट्रेलिया 115* व्हीसीए स्टेडियम, नागपूर
18 19 जानेवारी 2014 न्युझीलँड 123 मॅक्लीन पार्क, नेपियर
19 26 फेब्रुवारी 2014 बांगलादेश 136 खान साहेब उस्मान अली स्टेडियम, फतुल्ला
20 17 ऑक्टोबर 2014 वेस्ट इंडीज 127 एचपीसीए स्टेडियम, धर्मशाला
21 16 नोव्हेंबर 2014 श्रीलंका 139* जेएससीए आंतरराष्ट्रीय स्टेडियम, रांची
22 15 फेब्रुवारी 2015 पाकिस्तान 107 एडलेड ओव्हल, एडलेड
23 22 ऑक्टोबर 2015 दक्षिण आफ्रिका 138 एम.ए. चिदंबरम स्टेडियम, चेन्नई
24 17 जानेवारी 2016 ऑस्ट्रेलिया 117 मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न
25 20 जानेवारी 2016 ऑस्ट्रेलिया 106 मनुका ओव्हल, कॅनबेरा
26 23 ऑक्टोबर 2016 न्युझीलँड 154* पंजाब क्रिकेट असोसिएशन IS बिंद्रा स्टेडियम, मोहाली
27 15 जानेवारी 2017 इंग्लंड 122 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
28 6 जुलै 2017 वेस्ट इंडीज 111* सबिना पार्क, किंग्स्टन
29 31 ऑगस्ट 2017 श्रीलंका 131 आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
30 3 सप्टेंबर 2017 श्रीलंका 110* आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
31 22 ऑक्टोबर 2017 न्युझीलँड 121 वानखेडे स्टेडियम, मुंबई
32 29 ऑक्टोबर 2017 न्युझीलँड 113 ग्रीन पार्क स्टेडियम, कानपूर
33 1 फेब्रुवारी 2018 दक्षिण आफ्रिका 112 किंग्समीड क्रिकेट ग्राउंड, डर्बन
34 7 फेब्रुवारी 2018 दक्षिण आफ्रिका 160* न्यूलँड्स क्रिकेट ग्राउंड, केप टाऊन
35 16 फेब्रुवारी 2018 दक्षिण आफ्रिका 129* सुपरस्पोर्ट पार्क, सेंचुरियन
36 21 ऑक्टोबर 2018 वेस्ट इंडीज 140 बारसापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी
37 24 ऑक्टोबर 2018 वेस्ट इंडीज 157* एपीसीए-व्हीडीसीए स्टेडियम, विशाखापट्टणम
38 27 ऑक्टोबर 2018 वेस्ट इंडीज 107 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
39 15 जानेवारी 2019 ऑस्ट्रेलिया 104 एडलेड ओव्हल, एडलेड
40 05 मार्च 2019 ऑस्ट्रेलिया 116 व्हीसीए स्टेडियम, नागपूर
41 08 मार्च 2019 ऑस्ट्रेलिया 123 जेएससीए इंटरनॅशनल स्टेडियम कॉम्प्लेक्स, रांची
42 11 ऑगस्ट 2019 वेस्ट इंडीज 120 क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
43 14 ऑगस्ट 2019 वेस्ट इंडीज 114* क्वीन्स पार्क ओव्हल, पोर्ट ऑफ स्पेन
44 10 डिसेंबर 2022 बांगलादेश 113 झहूर अहमद चौधरी स्टेडियम, चितगाव
45 10 जानेवारी 2023 श्रीलंका 113 बारसापारा क्रिकेट मैदान, गुवाहाटी
46 15 जानेवारी 2023 श्रीलंका 166* ग्रीनफिल्ड इंटरनॅशनल स्टेडियम, तिरुवनंतपुरम
47. 11 सप्टेंबर 2023 पाकिस्तान 122* आर. प्रेमदासा स्टेडियम, कोलंबो
48 19 ऑक्टोबर 2023 बांगलादेश 103 महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, पुणे
49 5  नोव्हेंबर 2023 दक्षिण आफ्रिका 101 ईडन गार्डन्स, कोलकाता
50 15 नोव्हेंबर 2023 न्युझीलँड 117 वानखेडे स्टेडियम, मुंबई

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक कधी पूर्ण झाले?

विराट कोहलीचे 50वे एकदिवसीय शतक 15 नोव्हेंबर 2023 रोजी पूर्ण झाले.

विराट कोहलीने 50वे एकदिवसीय शतक कोणाविरुद्ध पूर्ण केले?

विराट कोहलीने 50वे एकदिवसीय शतक न्यूझीलंडविरुद्ध पूर्ण केले.