Table of Contents
वर्धा पोलीस पाटील भरती 2023
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत पदासाठी अर्ज करण्यासाठी आज शेवटचा दिवस आहे. उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट उपविभाग वर्धाने वर्धा पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. वर्धा पोलीस पाटील भरती 2023 ही पोलीस पाटील पदासाठी जाहीर झाली आहे. वर्धा पोलीस पाटील भरती 2023 मध्ये पात्र उमदेवारांची लेखी परीक्षा आणि त्यानंतर तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे. या लेखात, तुम्हाला वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना, महत्त्वाच्या तारखा, रिक्त जागा तपशील, अर्ज कसा करावा आणि इतर तपशीलवार माहिती मिळेल.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023: विहंगावलोकन
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 मध्ये विविध पदांची होणार असून पात्र उमेदवार ऑनलाईन पद्धीतीने अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची शेवटची तारीख ही 07 जुलै 2023 आहे. वर्धा पोलीस पाटील भरती 2023 वर एक झटपट नजर टाकण्यासाठी विहंगावलोकन सारणी पहा.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
संस्थेचे नाव | उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट उपविभाग वर्धा |
भरतीचे नाव | वर्धा पोलीस पाटील भरती 2023 |
पदाचे नाव |
पोलीस पाटील |
एकूण रिक्त पदे | NA |
आवेदन करण्याची पद्धत | ऑनलाईन |
निवड प्रक्रिया | लेखी परीक्षा आणि तोंडी परीक्षा (मुलाखत) |
अधिकृत संकेतस्थळ | https://wardha.gov.in/ |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023: महत्वाच्या तारखा
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 महत्वाच्या तारखा: वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत पोलीस पाटील पदाची भरती होणार असून या संबधी सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आले आहेत.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023: महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना प्रकाशन तारीख |
26 जून 2023 |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 26 जून 2023 |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 07 जुलै 2023 |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 लेखी परीक्षा तारीख | 22 जुलै 2023 |
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना PDF
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना PDF: उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट उपविभाग वर्धाने 26 जून 2023 रोजी विविध तालुक्यातील वेगवेगळ्या गावात पोलीस पाटील पदाच्या भरतीसाठी वर्धा पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना पाहू शकता.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अधिसूचना PDF
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 रिक्त पदाचा तपशील
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 रिक्त पदाचा तपशील: उपविभागीय दंडाधिकारी हिंगणघाट उपविभाग, वर्धा ने वर्धा पोलीस पाटील भरती 2023 जाहीर केली आहे. या भरती अंतर्गत एकूण रिक्त जागा भरण्यात येणार आहेत याचा तपशील अद्याप जाहीर करण्यात आलेला नाही आहे. पात्र आणि इच्छुक उमदेवार पोलीस स्टेशनचे नाव, गावाचे नाव इत्यादी माहिती वर दिलेल्या अधिकृत अधिसूचनेमध्ये तपासू शकतात.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 पात्रता निकष
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अंतर्गत भरण्यात येणाऱ्या पोलीस पाटील पदासाठी आवश्यक असणारे शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, आणि इतर अहर्ता खाली देण्यात आले आहेत.
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 पात्रता निकष | ||
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता | वयोमर्यादा |
पोलीस पाटील | दहावी उत्तीर्ण | 25 ते 45 वर्ष |
- अर्जदार हा स्थानिक व कायम रहिवाशी असावा. अर्जदाराने राशन कार्ड, निवडणूक ओळखपत्र, आधार कार्ड, ज्या पुराव्याने स्थानिक व कायम रहिवासी असल्याचे सिध्द होते असा कोणताही एक पुरावा मुलाखतीचे वेळी सादर करावा.
- अर्जदाराने अर्जामध्ये स्वत:चे इ-मेल व WhatsApp नंबर नमूद करावे.
- अर्जदार शारीरिकदृष्टया सक्षम असावा व अर्जदाराचे चरित्र्य निष्कलंक असणे आवश्यक आहे.
- महाराष्ट्र राज्य सेवा (लहान कुटूंबातील प्रतिज्ञापत्र) नियम 2005 मधील लहान कुटुंबाची अर्हता धारण करणे आवश्यक (अर्जदार याची अर्हता दिनांकास दोन पेक्षा जास्त अपत्य नसावेत.)
- प्रवर्ग निहाय आरक्षित पदाकरीता त्या प्रवर्गाचे सक्षम अधिकारी याने निर्गमित केलेले जातीचे प्रमाणपत्र आवश्यक
वर्धा पोलीस पाटील भरती 2023 अर्ज प्रक्रिया
अर्जदाराने संपुर्ण प्रक्रीया काळजीपुर्वक समजून ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करावेत. पोलीस पाटील पदाचे परिक्षेचे अर्ज फक्त ऑनलाईन पध्दतीनेच स्विकारले जातील. ऑनलाईन भरलेल्या अर्जाची स्थळप्रत कागदपत्राच्या साक्षांकीत प्रतीसह परिक्षा फिच्या उपविभागीय अधिकारी कार्यालय, हिंगणघाट यांचे खात्यामध्ये यशस्वीरित्या जमा झाल्याबाबतची पावती व विहित परिक्षा शुल्क असलेले अर्ज दिनांक 07/07/2023 पर्यंत सायंकाळी 05.00 पर्यंत सादर करावा. इतर कोणत्याही प्रकारे परिक्षा शुल्क स्विकारण्यात येणार नाही. प्रस्तुत पदाकरीता केवळ उक्त संकेतस्थळावर विहीत ऑनलाईन पध्दतीने भरलेले अर्ज ग्राहय धरण्यात येतील, सदर संकेतस्थळावर भरती प्रक्रिया दरम्यान वेळोवेळी भेट देवून भरती प्रक्रीयेच्या माहितीबाबत अद्यावत व जागृत राहण्याची जबाबदारी अर्जदाराची राहील. भरणा केलेले परीक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत करण्यात येणार नाही.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप