Marathi govt jobs   »   Job Notification   »   SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती...
Top Performing

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, 670 पदांसाठी तपशीलवार अधिसुचना जाहीर

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: मृद व जलसंधारण विभागाने दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) संवर्गातील एकूण 670 रिक्त पदे भरण्यासाठी SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. त्यासाठी इच्छुक व पात्र उमेदवार दिनांक 21 डिसेंबर 2023 ते 10 जानेवारी 2024 या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकतात. या लेखात आपण SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: विहंगावलोकन 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात दिले आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: विहंगावलोकन
श्रेणी सरकारी नोकरी 
विभाग  मृद व जलसंधारण विभाग
भरतीचे नाव

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023

पदांची नावे जलसंधारण अधिकारी (स्थापत्य)
एकूण पदे 670
नोकरीचे ठिकाण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ https://swcd.maharashtra.gov.in/

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अधिसुचना 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अंतर्गत पुरवठा जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) या पदांसाठी भरती करण्यात येणार आहे. या बाबतची अधिसुचना दिनांक 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली आहे. उमेदवार सदर अधिसुचना खाली दिलेल्या लिंक वर जाऊन डाऊनलोड करू शकतात.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसुचना PDF

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: रिक्त पदांचा तपशील 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांचा तपशील पदानुसार खालील तक्त्यात पहा.

अ.क्र. संवर्ग प्रवर्ग पदसंख्या
1. जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) अनुसूचित जाती 85
अनुसूचित जमाती 56
विमुक्त जाती (अ) 17
भटक्या जाती (ब) 15
भटक्या जाती (क) 19
भटक्या जाती (ड) 13
विशेष मागास प्रवर्ग 16
इतर मागास प्रवर्ग 129
ईडब्ल्यूएस 67
अराखीव 253
एकूण 670

वरील तक्त्यामध्ये नमूद केलेल्या 670 पदांपैकी (1 टक्के) एकूण 7 पदे अनाथ प्रवर्गासाठी आहेत. तसेच (4 टक्के) एकूण 27 पदे दिव्यांग प्रवर्गाची आहेत. मृद व जलसंधारण विभाग, शासन निर्णय दि. 26/02/2021 अन्वये दिव्यांगांसाठी पदांचे सुनिश्चिती करण्यात आली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: पात्रता निकष

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी पात्रता निकष खाली तपशीलवार पणे दिला आहे.

  • भारतीय नागरिकत्व
  • वयोमर्यादा गणण्याचा दिनांक हा प्रस्तुत जाहिरात प्रसिध्दीचा दिनांकास असेल.
  • जाहिरातीत नमुद केलेल्या जलसंधारण अधीकारी गट ब (अराजपत्रीत) पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 वर्ष असावे व खुल्या प्रवर्गासाठी कमाल 38 वर्षापेक्षा (मागासवर्गीयांसाठी 43 वर्षापेक्षा) जास्त नसावे.
  • दिव्यांग उमेदवारांच्या बाबतीत 45 वर्षा पर्यंत
  • पात्र खेळाडूंच्या बाबतीत 43 वर्षा पर्यंत
  • अनाथ उमेदवारांच्या बाबतीत 43 वर्षा पर्यंत
  • तथापी, महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय स.न. वि. 2023/प्र.क्र. /14/ कार्य-92/दिनांक 03/03/2023 अन्वये दि.31/12/2023 पुर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या 2 वर्ष शिथीलता दिलेली असल्याने वर नमुद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्ष इतकी शिथीलता असेल.
  • शैक्षणिक अर्हता
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव शैक्षणिक अर्हता
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) उमेदवाराने शासनाने मान्यता दिलेली तीन वर्षे कालावधीची स्थापत्य अभियात्रीकी मधील पदविका (Diploma in Civil Engineering) किंवा पदवी (Degree in Civil Engineering) किंवा शासनाने त्यास समकक्ष म्हणुन घोषीत केलेली अर्हता (शासन मृद व जलसंधारण विभाग राजपत्र जलसंधारण अधिकारी, (स्थापत्य) गट-ब, (राजपत्रीत) सेवाप्रवेश नियम दिनांक 21 सप्टेंबर, 2021)

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 शी संबंधित महत्वाच्या तारखा 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 च्या संदर्भातील महत्वाच्या तारखा आपण खाली दिलेल्या तक्त्यात तपासू शकता.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: महत्वाच्या तारखा
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अधिसूचना 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची सुरवात 21 डिसेंबर 2023
SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख

10 जानेवारी 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेची तारीख 20 व 21 फेब्रुवारी 2024

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

  • सर्व पदांसाठी मराठी / इंग्रजी माध्यमातुन संगणक प्रणालीव्दारे ऑनलाईन परीक्षा वस्तुनिष्ठ बहुपर्यायी स्वरुपात घेण्यात येईल. परीक्षा राज्यातील निश्चीत केलेल्या मुख्यालयाच्या ठिकाणी घेण्यात येईल.
  • संगणक आधारीत परीक्षेव्दारे (Computer Based Online Examination) घेण्यात येणाऱ्या ऑनलाईन परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारे गुणवत्ते नुसार उमेदवारांची निवड केली जाईल. गुणवत्ता यादीत अंतर्भाव होण्यासाठी उमेदवाराने किमान 45 टक्के गुण प्राप्त करणे आवश्यक राहील.
  • बहुपर्यायी वस्तुनिष्ठ स्वरुपाच्या उत्तरपत्रीकेचे मुल्यांकन करतांना (नकारात्मक गुणपध्दत) अवलंबण्यात येईल. प्रत्येक चुकीच्या उत्तरा करिता 25 टक्के किंवा 1/4 एवढे गुण एकुण गुणांमधुन वजा / कमी करण्यात येतील.
अ. क्र. विषय प्रश्नांची संख्या गुण माध्यम  कालावधी
1 मराठी भाषा 10 20 मराठी 2 तास
2 इंग्रजी भाषा 10 20 इंग्रजी
3 सामान्य ज्ञान 10 20 मराठी व इंग्रजी
4 बुद्धीमापन चाचणी 10 20
5 तांत्रिक प्रश्न 60 120 इंग्रजी
एकूण 100 200    

सदर परिक्षा हि संगणक आधारीत (Computer Based Online Examination) घेण्यात येणार असुन प्रत्येक सत्राच्या प्रश्न पत्रीका स्वतंत्रपणे उपलब्ध केल्या जाणार असुन एकापेक्षा जास्त सत्रात परिक्षा आयोजीत करण्यात येणार आहे. पहिले सत्र ते अंतिम सत्र या मधील प्रश्नपत्रीकेचे स्वरुप व त्याचीकाठीण्यता यांचे समाणीकरण करण्याचे (Normalisation) पध्दतीने गुणांक निश्चीत करुन निकाल जाहीर करण्यात येईल. सदर समाणीकरण (Normalisation) सर्व परिक्षार्थी यांना बंधनकारक राहिल. याची सर्व परिक्षार्थीनी नोंद घ्यावी. सदर समाणीकरण (Normalisation) सुत्र माहितीसाठी विभागाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 अभ्यासक्रम

अ.क्र विषयाचे नाव अभ्यासक्रम
1. स्थापत्य अभियांत्रिकी डिप्लोमा स्तर
  • Engineering Mechanics & Strength of materials
  • Theory of structures
  • Steel Structures.
  • Design of Reinforced concrete Structures (Limit State method).
  • Concrete Technology.
  • Geotechnical Engineering.
  • Construction Materials.
  • Surveying.
  • Building Planning and Construction.
  • Fluid mechanics.
  • Water Resources Engineering
  • Highway Engineering.
  • Bridge Engineering.
  • Estimating, costing and valuation
  • Environmental Engineering, Soil & Water conservation structures and techniques.
  • Public health engineering.
  • Construction Planning and management.
2. मराठी मराठी समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यांचा अर्थ आणि वापर तसेच सामान्य शब्दसंग्रह, वाक्यरचना, व्याकरण, म्हणी आणि वाक्प्रचार आणि उताऱ्यावरील प्रश्नांची उत्तरे.
3. इंग्रजी Similar Word, Opposite Word, Common Vocabulary, Sentence Structure Grammar, Use of Idioms and phrases & their meaning and comprehension of passage.
4. सामान्य ज्ञान चालू घडामोडी (जागतिक तसेच भारतीय) इतिहास विशेषतः महाराष्ट्र, महाराष्ट्राचा भूगोल, भारतीय अर्थव्यवस्था, भारतीय सरकार आणि पर्यावरण.
5. बुद्धीमापक चाचणी किती लवकर आणि अचूकपणे उमेदवार विचार करू शकतो

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक 

WCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी लिंक खाली दिलेली आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक(सक्रीय) 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: वेतनश्रेणी 

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 वेतनश्रेणी खालील तक्त्यात दिली आहे.

पदाचे नाव वेतनश्रेणी
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) गट ब (अराजपत्रित) S-15 :41800-132300

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 साठी अर्ज शुल्क खाली देण्यात आला आहे.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023: अर्ज शुल्क
प्रवर्ग   अर्ज शुल्क  
खुला प्रवर्ग रु. 1000
इतर सर्व प्रवर्ग रु. 900

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

नवीनतम भरती सूचना 
सोलापूर महानगरपालिका भरती 2023 अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग भरती 2023
SSC GD भरती 2023  SBI क्लर्क भरती 2023

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023, 670 पदांसाठी तपशीलवार अधिसुचना जाहीर_4.1

FAQs

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 कोणत्या पदासाठी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 जलसंधारण अधिकारी (स्थापत्य) पदासाठी जाहीर झाली.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 किती पदांसाठी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 670 पदांसाठी जाहीर झाली.

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 कधी जाहीर झाली?

SWCD मृद व जलसंधारण विभाग भरती 2023 21 डिसेंबर 2023 रोजी जाहीर झाली.