Table of Contents
What is the language of Maharashtra: Marathi is the state language of Maharashtra, by population (as of now 112,400,000) the second-biggest state in India. Around 84,000,000 individuals use Marathi as their primary language. This makes Marathi, regarding quantities of local speakers, the third-biggest language inside India after Hindi and Telugu.
What is the language of Maharashtra | |
Category | Study Material |
Useful for | All Competitive Exams |
Subject | Static General Awareness |
Name | What is the language of Maharashtra |
What is the language of Maharashtra
What is the language of Maharashtra: मराठी भाषेचा उगम उत्तरेकडे झाला. मराठी भाषा मूळ आर्यांची भाषा आहे. जवळजवळ 1500 वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे. उत्तरेकडील सातपुडा पर्वत रांगापासून ते कावेरीच्या पश्चिमेकडील प्रांतापर्यंत, उत्तरेस दमणपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला. प्रामुख्याने भारताच्या दक्षिण भागात मराठी भाषा विकसित झाली. आज या लेखात आपण What is the language of Maharashtra याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहे. सोबतच मराठी भाषेचा इतिहास (What is the language of Maharashtra) व त्याची प्रगती अशी होत गेली याबद्दल माहिती लेखात दिली आहे.
What is the language of Maharashtra | महाराष्ट्राची राजभाषा काय आहे
What is the language of Maharashtra: मराठी भाषा ही महाराष्ट्र राज्याची अधिकृत भाषा (What is the language of Maharashtra) आहे. कोकणीशिवाय गोवा राज्यातहि मराठीला अधिकृत भाषा म्हणून ओळखले जाते. भारतीय राज्यघटनेत मराठीला (What is the language of Maharashtra) भारताच्या बावीस अधिकृत भाषांपैकी एक म्हणून मान्यता आहे. मराठी ही भारतातील 22 अधिकृत भाषापैकी एक आहे. मराठा हा भारतात सगळ्यात जास्त बोलली जाणारी चौथी भाषा आहे. मराठीच्या (What is the language of Maharashtra) मुख्य पोटभाषा आहेत. त्या म्हणणे व-हाडी, कोळी, मालवणी आणि कोंकणी मराठी भाषा 2000 वर्षापासून अस्तित्वात आहे म्हणूनच मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न चालू आहे. आपण 27 फेब्रुवारीला मराठी दिन साजरा करतो. त्यादिवशी साहित्यकार कुसुमाग्रजांचा वाढदिवस असतो.
List of National Highways in India (Updated)
Journey of Marathi language | मराठी भाषेचा प्रवास
Journey of Marathi language: 700 वर्षांपासून पूर्ववैदिक, वैदिक, संस्कृत, पाली, प्राकृत, अपभ्रंश या टप्प्यातून उत्क्रांत होत होत मराठी (Marathi Language) भाषेतील पहिले वाक्य श्रवणबेळगोळ येथील शिलालेखावर सापडले. हे वाक्य शके 905 मधील असून ‘श्री चामुण्डेराये करविले’ असे आहे. त्यानंतर मुकुंदराज व ज्ञानेश्र्वर हे सर्वमान्य आद्य मराठी कवी मराठीची वैशिष्ट्ये तिच्या सामर्थ्यासह मांडताना दिसतात.
शके 1110 मधील मुकुंदराजांनी रचलेला विवेकसिंधु हा ग्रंथ मराठी भाषेतील पहिला ग्रंथ आहे. ज्ञानेश्र्वरांनी ‘परि अमृतातेही पैजा जिंके। ऐसी अक्षरेचि रसिके मेळविन।’ अशा शब्दात मराठी भाषेचा गोडवा अमृतापेक्षाही जास्त आहे असे म्हटले आहे. भगवद्गीता सर्वसामान्यांना समजावी, यासाठी ज्ञानेश्र्वरी वा भावार्थ दीपिका या ग्रंथाचे लेखन मराठीत केले. त्याचप्रमाणे श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेले लीळाचरित्र म्हणजे मराठीतील पहिला मराठी (What is the language of Maharashtra) पद्य चरित्रग्रंथ होय. तेव्हापासून पद्यलेखनाची परंपरा सुरू झाली.
महानुभावपंथाचे संस्थापक श्री चक्रधर स्वामींनी लिहिलेल्या ग्रंथातील दृष्टांतावरून मराठीची गतिमानता, सहजसौंदर्य, नादमाधुर्य, गोडवा दिसून येतो. संत एकनाथांनी ‘भागवत’ ग्रंथाची रचना करून मराठीत भर घातली. यातील बोलीभाषेशी जवळीक साधणारा शब्दसंग्रह, छोटी छोटी लयबद्ध वाक्ये यामुळे 13 व्या शतकातील मराठी भाषा आजच्या वाचकालाही तितकीच आपलीशी वाटते.
कालानुक्रमे मराठीच्या (What is the language of Maharashtra) उगमापासून ते सध्याच्या मराठीच्या स्वरूपात अनेक बदल झालेले दिसतात. या बदलाचे एक कारण म्हणजे मराठी मातीत राज्य केलेल निरनिराळ्या सत्ता होय. त्यापैकी 1250 ते 1350 या काळातील यादवी सत्ता, 1600 ते 1700 या काळातील शिवरायांचीसत्ता, 1700 ते 1818 पेशवाई सत्ता यामुळे प्रत्येक काळात मराठी भाषेवर याचे परिणाम दिसून येतात. काळाप्रमाणेच स्थलानुसार मराठी भाषा बदलत गेली. त्यातूनच मुख्य मराठी, अहिराणी मराठी, मालवणी मराठी, वर्हाडी मराठी, कोल्हापुरी मराठी असे पोटप्रकार पडत गेले.
The Dialect of Marathi Language | मराठी भाषेच्या बोलीभाषा
Dialect of Marathi Language: जगातील बहुतेक प्रमुख भाषांप्रमाणेच, मराठी भाषाही एकाहून अधिक पद्धतींनी बोलली जाते. मुख्य भाषेशी नाते कायम ठेवलेली, तिची पोटभाषा दर 12 कोसांगणिक उच्चारांत, शब्दसंग्रहांत, आघातांत व वाक्प्रचारांत बदलत रहाते. असे असले तरी लिखित भाषेत फारसा फरक नसतो. पाहायला गेल्यास मराठीच्या खूप बोलीभाषा आहेत. पण, त्यातील काहीच बोलीभाषा आपल्याला माहित आहेत. अशाच काही निवडक बोलीभाषांविषयी माहिती पुढीलप्रमाणे:
Ahirani | अहिराणी
अहिराणी पश्चिम खानदेश, उत्तर महाराष्ट्रात बोलली जाते. अहिराणी ही भाषा आजच्या जळगाव, नंदुरबार, धुळे आणि नाशिक (बागलाण, मालेगाव व कळवण तहसील) या महाराष्ट्रातील जिल्ह्यांत बोलली जाते. अहिराणी हि एक बोलीभाषेचा प्रकार आहे आणि तिच्या लिखाणासाठी देवनगरी लिपी वापरली आहे. हे देवनागरीचे लेखी रूप असले तरी बोलण्यापेक्षा लिहिणे अधिक कठीण आहे.
Khandeshi | खान्देशी
खान्देशी पूर्व खान्देशात विशेषतः यावल आणि रावेर तालुक्यात बोलली जाते. खान्देशी याला तावडी असेही म्हणतात जे पूर्वी खानदेशातील प्रमुख लेवा पाटलांद्वारे बोलली जायची. बहिणाबाई चौधरी या खानदेशातील प्रख्यात कवयित्री आहेत, त्यांचे साहित्य आणि मराठी भाषेचा अभ्यास यामध्ये समाविष्ट आहे. बहिणाबाई या अहिराणी कवी आहेत असा काहींचा गैरसमज होतो.
Samvedi | सामवेदी
सामवेदी ही महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातील वसई तालुक्यात मुंबईच्या उत्तरेस, नाला सोपारा आणि विरार प्रदेशांच्या अंतर्गत भागात बोलली जाते. या भाषेची उत्पत्ती या प्रदेशातील मूळ रहिवासी सामवेदी ब्राह्मणांकडून झाली आहे. काही प्रमाणात रोमन कॅथलिक लोकांमध्येही या भाषेचे भाषिक आढळतात जे मूळचे पूर्व भारतीय म्हणून ओळखल्या जाणार्या प्रदेशातील रहिवाशी आहेत. ही भाषा महाराष्ट्राच्या इतर प्रदेशात बोलल्या जाणार्या मराठी भाषेपेक्षा खूप वेगळी आहे. 1739 पर्यंत पोर्तुगीजांच्या थेट प्रभावामुळे वडावली आणि सामवेदी या दोन्ही भाषांमध्ये सामान्य मराठीपेक्षा पोर्तुगीज भाषेतील शब्दांचे प्रमाण जास्त आहे.
Konkani | कोंकणी
कोंकणी लोकांची भाषा म्हणजे कोंकणी होय. ही कोंकणांत राहणाऱ्या लोकांद्वारे बोलली जाते आणि मराठी भाषेसारखीच असल्यामुळे महाराष्ट्रात कोकणीला मराठीची बोली मानले जाते. ब्रिटानिका इनसाइक्लोपीडिया 1911 ने कोंकणी ला मराठीतील एक वास्तविक बोली म्हणून स्थान दिले होते.
Vharadi | वऱ्हाडी
विदर्भात वऱ्हाडी भाषा बोलल्या जाते. ‘विदर्भ विषय: सरस्वती जन्मभू:’ अशी वऱ्हाडी भाषेची वाङ्मयीन व भाषिक महतीही गायिली जाते. वऱ्हाडीत सांस्कृतिक संचित आणि लोकपरंपरांचं धन विपुल आहे. दंढार, अवधुर्ती कीर्तन, तुकडोजी महाराजांचं भजन, नागपंचमीची नागगाणी, सोपीनाथ- गुलालशेष, नागमंदिरापुढच्या बाऱ्या-ठावा, नागदेवतेच्या आरबळ्याचे व्रतस्थ जीवन, पोळ्याची वृषभगीते यांची विपुलता या बोलीत भरून राहिलेली आहे.
First Anglo-Maratha War- Background, Causes, Treaty and Outcomes
Study Material for All MPSC Exams | MPSC च्या सर्व परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
Study Material for All MPSC Exams: तुमच्या अभ्यासाच्या तयारीला गती देण्यासाठी Adda247 मराठी सर्व विषयातील महत्वाचे टॉपिक कव्हर करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला MPSC राज्यसेवा पुर्व परीक्षा 2022 व तसेच आगामी MPSC च्या सर्व स्पर्धा परीक्षेत जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs What is the language of Maharashtra
Q1. What is the language of Maharashtra?
Ans. Marathi is the language of Maharashtra.
Q2. What is the official language of Maharashtra?
Ans. The official language of Maharashtra is Marathi.
Q3. When do we celebrate Marathi Bhasha Gaurav Din?
Ans. Every Year, we celebrate Marathi Bhasha Gaurav Din On the 27th of February.
Latest Maharashtra Govt. Jobs | Majhi Naukri 2022 |
Home Page | Adda 247 Marathi |
Current Affairs in Marathi | Chalu Ghadamodi |