Marathi govt jobs   »   Study Materials   »   सहसंबंध

सहसंबंध: युक्त्या आणि प्रश्न, WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

सहसंबंध (Analogy)

बुद्धिमत्ता चाचणी हा सर्व सरळसेवा भरती परीक्षांसाठी महत्वाचा घटक आहे. यातील तार्किक बुद्धीमत्तेमध्ये सहसंबंध हा महत्वाचा टॉपिक आहे. सहसंबंध या घटकरील प्रश्न विद्यार्थ्यांची तार्किक क्षमता तपासण्यासाठी आणि दोन घटकातील संबंध ओळखण्यासाठी केल्या जातो. यासाठी आपले सामान्य ज्ञान चांगले असणे आवश्यक आहे. आगामी काळातील WRD जलसंपदा विभाग परीक्षा व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा घटक आहे. या लेखात सहसंबंध (Analogy) या घटकावरील प्रश्न कसे सोडवायचे याबद्दल माहिती देण्यात आली आहे.

सहसंबंध: विहंगावलोकन

एकाद्या घटकाचा दुसऱ्या घटकाशी कोणता संबंध आहे हे उमेदवाराकडून जाणून घेण्यासाठी सहसंबंध या घटकावर प्रश्न विचारल्या जातात.

सहसंबंध: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय बुद्धिमत्ता चाचणी
टॉपिकचे नाव सहसंबंध (Analogy)
महत्वाचे मुद्दे
  • सहसंबंध या घटकाची संकल्पना
  • सहसंबंध या घटकावरील उदाहरणे

सहसंबंध या घटकाची संकल्पना

सहसंबंध या घटकावर सामान्यतः जर A : B तर C : ? यासारखे प्रश्न विचारलेले असतात. यात आपल्याला जा A चा B शी संबंध आहे त्याचप्रमाणे C चा संबंध प्रश्नात दिलेल्या कोणत्या पर्यायाशी तोच संबंध प्रस्तापित केल्या जाऊ शकतो. तो पर्याय आपल्याला निवडावा लागणार आहे. सहसंबंध या घटकाचे प्रश्न सोडवण्यासाठी आपले सामान्य ज्ञान, अक्षरमाला आणि गणित याबद्दल ज्ञान असणे आवश्यक आहे.

सहसंबंध या घटकावरील उदाहरणे

Directions (1-9): :: च्या एका बाजूला दिलेल्या दोन शब्दांमध्ये एक विशिष्ट संबंध आहे आणि एक शब्द :: च्या दुसर्‍या बाजूला दिलेला आहे, तर दिलेल्या पर्यायांमधून दुसरा शब्द शोधायचा आहे, ज्याचा समान संबंध आहे. दिलेल्या जोडीला हा शब्द आहे. सर्वोत्तम पर्याय निवडा. 
 
Q1. संत्रा : नागपूर  :: केळी : ? 
(a) पुणे
(b) जळगाव
(c) सांगली
(d) सातारा
उत्तर. (b)
स्पष्टीकरण: नागपूरचे संत्रे प्रसिद्ध आहेत. त्याचप्रमाणे जळगावची केली प्रसिद्ध आहे.

Q2. राजा : राजवाडा :: कैदी : ?   
(a) महाल
(b) बंगला
(c) तुरुंग
(d) झोपडी
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: जसा राजा राजवाड्यात राहतो तसा कैदी तुरुंगात राहतो.
Q3. आकाश : योम  :: पक्षी : ?  
(a) नभ
(b) किरीट
(c) वारू
(d) द्विज
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: आकाशचा समानार्थी शब्द योम पक्षीचा समानार्थी शब्द द्विज.

Q4. आगंतुक : आमंत्रित :: उदार : ?  
(a) चंद्रशेखर
(b) दानशूर
(c) कृपण
(d) यापैकी नाही
उत्तर.(c)
स्पष्टीकरण: जसे आगंतुकच्या विरुद्धार्थी आमंत्रित तसे उदार च्या विरुद्धार्थी कृपण.

Q5. लंडन : पाउंड : : बांगलादेश : ___
(a) डॉलर
(b) रुपया
(c) रियाल
(d) टका
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: लंडनचे चलन पाउंड आहे त्याचप्रमाणे बांगलादेशचे चलन टका आहे.

Q6. तामिळनाडू : चेन्नई :: हिमाचल प्रदेश : ?  
(a) शिमला
(b) उटी
(c) मानली
(d) डेहराडून
उत्तर. (a)
स्पष्टीकरण: तामिळनाडूची राजधानी चेन्नई आहे तसे हिमाचल प्रदेशची राजधानी शिमला आहे. 

Q7. सचिन तेंडूलकर : क्रिकेट :: मेरी कोम : ?  
(a) टेनिस
(b) हॉकी
(c) रनिंग
(d) बॉक्सिंग
उत्तर. (d)
स्पष्टीकरण: सचिन तेंडूलकर क्रिकेटशी निगडीत आहे तशी मेरी कोम बॉक्सिंगशी निगडीत आहे.

Q8. SFLN : VIOQ : : PKDL : ?
(a) SNGO
(b) SGNO
(c) SNOG
(d) MHAG
उत्तर. (a)
स्पष्टीकरण: प्रत्येक अक्षरानंतरचे तिसरे अक्षर
Q9. 10 : 100 : : 11 : ?
(a) 131
(b) 121
(c) 141
(d) 151
उत्तर. (b)
स्पष्टीकरण: ज्याप्रमाणे 10 चा वर्ग 100 आहे त्याचप्रमाणे 11 चा वर्ग 121 आहे.
 
Q10.  5 : 126 : : 8 : ?
(a) 546
(b) 203
(c) 201
(d) 421
उत्तर (b)
स्पष्टीकरण:
5 x 25 + 1 = 126
8x 25 + 1 = 201

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

जिल्हा परिषद परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यास साहित्य

सरळ सेवा जसे की, जिल्हा परिषद भरती 2023, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023, आरोग्य विभाग भरती 2023 व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

सहसंबंध हा घटक कोणत्या विषयात येतो?

सहसंबंध हा घटक तार्किक बुद्धिमत्ता या घटकात येतो.

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न कसे सोडवावे?

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवतांना प्रश्नात दिलेल्या जोडीचा काय संबंध येतो त्यानुसार विचारल्या घटकाचा संबंध ज्या पर्यायाशी येतो तो पर्याय निवडायचा

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी कोणत्या विषयाबद्दल माहिती असणे आवश्यक आहे?

सहसंबंध या टॉपिकवरील प्रश्न सोडवण्यासाठी सामान्य ज्ञान, अक्षरमाला आणि गणित विषयाचे ज्ञान असणे आवश्यक आहे.