Table of Contents
WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023
WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करताना त्यातील पदांसाठी आवश्यक असणारा पात्रता निकष माहित असणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. एकूण 14 संवर्गातील पदांसाठी ही भरती जाहीर झाली असून प्रत्येक पदासाठी पात्रता निकष वेगळा आहे. या लेखात आपण पदानुसार WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.
WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: विहंगावलोकन
जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.
जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | लेटेस्ट पोस्ट |
कार्यालय | महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग |
भरतीचे नाव | जलसंपदा विभाग भरती 2023 |
पदाचे नाव |
|
एकूण रिक्त पदे | 4497 |
लेखाचे नाव | WRD जलसंपदा विभाग पात्रता निकष 2023 |
निवड प्रक्रिया | ऑनलाईन परीक्षा |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
अधिकृत संकेतस्थळ | http://wrd.maharashtra.gov.in/ |
जलसंपदा विभाग भरती 2023 पात्रता निकष
नागरिकत्व
उमेदवार भारतीय नागरिक असावा.
वयोमर्यादा
जलसंपदा विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.
जलसंपदा विभाग भरती 2023 वयोमर्यादा | |
प्रवर्ग | वयोमर्यादा |
खुल्या उमेदवारांसाठी | किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे. |
मागासवर्गीय उमदेवारांसाठी | किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे. |
पदवीधारक अंशकालीन उमदेवारांसाठी | कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील |
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी यांचेसाठी | कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील |
खेळाडू उमेदवारांसाठी | कमाल वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील |
दिव्यांग उमेदवारांसाठी | कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील |
प्रकल्पग्रस्त आणि भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी | कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील |
माजी सैनिक उमेदवारांसाठी | कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील |
टीप:-तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव 2023/प्र.क्र /14/ कार्या 92 दि. 3 मार्च 2023 अन्वये दि. 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.
शैक्षणिक अर्हता
जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता: जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या प्रत्येक पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती खालील तक्त्यात दिली आहे.
जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता | |
पदाचे नाव | शैक्षणिक अर्हता |
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब |
|
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब |
|
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क |
|
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क |
|
आरेखक गट क |
|
सहाय्यक आरेखक गट क |
|
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क |
|
प्रयोगशाळा सहाय्यक गट क |
|
अनुरेखक गट क |
|
दफ्तर कारकून गट क |
|
मोजणीदार गट क |
|
कालवा निरीक्षक गट क |
|
सहाय्यक भांडारपाल गट क |
|
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क |
|
टंखलेखन अर्हता :
दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी टंकलेखन अर्हता लागू आहे. तरी उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अहंता अर्ज स्विकारण्यासाठी विहीत अंतिमदिनांक येईल त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे.
टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (दप्तर कारकुन मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक
भांडारपाल पदाकरीता):
दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग- 2016/प्र.क्र. 116/16-अ, दिनांक 16 नोव्हेंबर 2016 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणान्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-2018/प्र.क्र.180/28. दिनांक 13 जून 2019 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
अनाथ उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अनाथ- 2022/प्र.क्र.84/1का-03, दिनांक 07 जुलै 2022 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
प्रकल्पग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
भूकंपग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे भूकंपग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.
पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
WRD जलसंपदा भरती 2023 शी संबंधित अन्य लेख
- WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप
- WRD जलसंपदा विभाग भरती परीक्षेचा अद्ययावत अभ्यासक्रम 2023 जाहीर
- WRD जलसंपदा विभाग वेतन 2023
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप