Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता...

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023

WRD जलसंपदा विभाग तांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023: कोणत्याही परीक्षेसाठी अर्ज करताना त्यातील पदांसाठी आवश्यक असणारा पात्रता निकष माहित असणे खूप गरजेचे आहे. महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरतीतील एकूण 14 संवर्गांपैकी 5 संवर्गांतील एकूण 2534 अतांत्रिक पदे आहेत. या लेखात आपण पदानुसार WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023: विहंगावलोकन 

महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने विविध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी जलसंपदा विभाग भरती 2023 जाहीर केली आहे. सदर भरतीतील एकूण 14 संवर्गांपैकी 5 संवर्गांतील एकूण 2534 अतांत्रिक पदे आहेत. जलसंपदा विभाग तांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 चे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
लेखाचे नाव WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

जलसंपदा विभाग भरती 2023 अतांत्रिक पदांची यादी 

खाली उमेदवार जलसंपदा विभागाअंतर्गत येणाऱ्या तांत्रिक पदांची यादी तपासू शकतात.

  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क

जलसंपदा विभाग भरती 2023 अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष

नागरिकत्व

उमेदवार भारतीय नागरिक असावा.

वयोमर्यादा

जलसंपदा विभाग भरती 2023 साठी वयोमर्यादा खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 वयोमर्यादा 
प्रवर्ग  वयोमर्यादा 
खुल्या उमेदवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 38 वर्षापेक्षा जास्त नसावे.
मागासवर्गीय उमदेवारांसाठी किमान 18 वर्षापेक्षा कमी व 43 वर्षापेक्षा जास्त नसावे.
पदवीधारक अंशकालीन उमदेवारांसाठी कमाल वयोमर्यादा 55 वर्ष इतकी राहील
स्वातंत्र्य सैनिकांचे नामनिर्देशित पाल्य, सन 1991 चे जनगणना कर्मचारी व सन 1994 नंतर निवडणूक कर्मचारी  यांचेसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
खेळाडू उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 43 वर्ष इतकी राहील
दिव्यांग उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
प्रकल्पग्रस्त आणि भुकंपग्रस्त उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील
माजी सैनिक उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा 45 वर्ष इतकी राहील

टीप:-तथापि, महाराष्ट्र शासन, सामान्य प्रशासन विभागाकडील शासन निर्णय सनिव 2023/प्र.क्र /14/ कार्या 92 दि. 3 मार्च 2023 अन्वये दि. 31 डिसेंबर 2023 पूर्वी प्रसिध्द होणाऱ्या भरती जाहिराती करिता कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे शिथिलता दिलेली असल्याने वर नमूद सर्व प्रवर्गासाठी कमाल वयोमर्यादेच्या दोन वर्षे इतकी शिथिलता असेल.

शैक्षणिक अर्हता

जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता: जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये जाहीर झालेल्या प्रत्येक  पदासाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असून ती खालील तक्त्यात दिली आहे.

जलसंपदा विभाग भरती 2023 शैक्षणिक अर्हता
पदाचे नाव  शैक्षणिक अर्हता
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • ज्या व्यक्तीने माध्यमिक शालांत परीक्षा उत्तीर्ण केली आहे आणि
  • जी व्यक्ती लघुलेखनाचा वेग किमान 100 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी टंकलेखनाचा वेग किमान 40 शब्द प्रति मिनिट किंवा मराठी टंकलेखनाचा वेग किमान 30 शब्द प्रति मिनिट या अर्हतेचे शासकीय वाणिज्य प्रमाणपत्र धारण करीत असेल.
दफ्तर कारकून गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे तसेच
  • टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
मोजणीदार गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
कालवा निरीक्षक गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.
सहाय्यक भांडारपाल गट क
  • ज्यांनी कोणत्याही शाखेची पदवी प्राप्त केली आहे
  • तसेच टंखलेखनाची शासकीय व्यावसायिक प्रमाणपत्र परीक्षा 30 शब्द प्रति मिनिट मराठी किंवा 40 शब्द प्रति मिनिट इंग्रजी उत्तीर्ण केली आहे.

टंखलेखन अर्हता :

दप्तर कारकून, मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक भांडारपाल या पदांसाठी टंकलेखन अर्हता लागू आहे. तरी उमेदवाराने सदर शासकीय वाणिज्य परीक्षा मंडळाची विहित टंकलेखन अहंता अर्ज स्विकारण्यासाठी विहीत अंतिमदिनांक येईल त्यापूर्वी धारण करणे अनिवार्य आहे.

टंकलेखन अर्हता धारण करण्यातून तात्पुरती सूट (दप्तर कारकुन मोजणीदार, कालवा निरीक्षक व सहाय्यक

भांडारपाल पदाकरीता):

दिव्यांग उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अपंग- 2016/प्र.क्र. 116/16-अ, दिनांक 16 नोव्हेंबर 2016 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे दिव्यांग आरक्षणाचा दावा करणान्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

माजी सैनिक वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक: संकीर्ण-2018/प्र.क्र.180/28. दिनांक 13 जून 2019 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे माजी सैनिक आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

अनाथ उमेदवाराने विहित टंकलेखन अर्हतेचे प्रमाणपत्र धारण केलेले नसेल तर शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक अनाथ- 2022/प्र.क्र.84/1का-03, दिनांक 07 जुलै 2022 नुसार टंकलेखनाची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षाचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे अनाथ आरक्षणाचा दावा करणाच्या पात्र उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

प्रकल्पग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे प्रकल्पग्रस्त आरक्षणाचा दावा करणाच्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

भूकंपग्रस्त वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे भूकंपग्रस्त आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अर्हता अनिवार्य नाही.

पदवीधर अंशकालीन कर्मचारी वर्गातून अर्ज करण्यास पात्र असलेल्या उमेदवारांनी विहित टंकलेखन अर्हता धारण केली नसेल अशा उमेदवारास शासन निर्णय, सामान्य प्रशासन विभाग, संकीर्ण- 1114/प्र.क्र.200/16-अ, दिनांक 4 सप्टेंबर 2015 अन्वये त्याच्या नियुक्तीच्या दिनांकापासून 2 वर्षांचा कालावधी व 2 संधी अनुज्ञेय असल्यामुळे पदवीधर अंशकालीन कर्मचारी आरक्षणाचा दावा करणाऱ्या उमेदवारांना टंकलेखन अहंता अनिवार्य नाही.

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

WRD जलसंपदा भरती 2023 शी संबंधित अन्य लेख

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

FAQs

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 काय आहे?

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 प्रत्येक पदासाठी वेगवेगळा आहे.

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 मला कोठे बघायला मिळेल?

WRD जलसंपदा विभाग अतांत्रिक पदांसाठी पात्रता निकष 2023 या लेखात दिला आहे.