Marathi govt jobs   »   Study Materials   »   पहिले इंग्रज-मराठा युद्ध
Top Performing

पहिले इंग्रज-मराठा युद्ध, WRD भरतीसाठी अभ्यास साहित्य

पहिले इंग्रज-मराठा युद्ध

पहिले इंग्रज-मराठा युद्ध: दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली. इंग्रज व मराठे ह्यांच्यात झालेल्या तीन युद्धानंतर मराठी सत्तेचा शेवट होऊन जवळजवळ संपूर्ण भारत इंग्रजांच्या ताब्यात गेला, म्हणूनच भारतीय इतिहासात या युद्धांना महत्त्वाचे स्थान आहे. महाराष्ट्रातील सरळ सेवा जसे कि, WRD जलसंपदा विभाग भरती, आदिवासी विकास विभाग भरती 2023 व इतर सर्व स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने पहिले इंग्रज-मराठा युद्ध यावर बहुतेकवेळा प्रश्न विचारल्या जातात. आज आपण पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल संपूर्ण माहिती पाहणार आहे. ज्यात पहिले इंग्रज-मराठा युद्धाची पार्श्वभूमी, कारणे, संधी, पहिले इंग्रज-मराठा युद्ध चे परिणाम याबद्दल सविस्तर माहिती दिली आहे.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध: विहंगावलोकन

पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे भारतीय इतिहासातील एक निर्णायक संघर्ष होता. ही लढाई मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी यांच्यातील लढाई होती. याने भारतात ब्रिटीश साम्राज्यवाद सुरू होतो खालील तक्त्यामध्ये पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाचे विहंगावलोकन मिळवा.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
विषय इतिहास
लेखाचे नाव पहिले इंग्रज-मराठा युद्ध
युद्ध कोणामध्ये झाले मराठा साम्राज्य आणि ब्रिटीश इस्ट इंडिया कंपनी
कालावधी 1775 – 1782

पहिले इंग्रज-मराठा युद्ध

दक्षिण भारतात अठराव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठ्यांची सत्ता प्रबळ होती. इंग्रजांनी उत्तर भारतात आपले आसन स्थिर केल्यानंतर त्यांनी दक्षिण भारतातही प्रदेश मिळविण्यास सुरुवात केली. पहिले इंग्रज-मराठा युद्ध हे ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि भारतातील मराठा साम्राज्य यांच्यात झालेल्या तीन अँग्लो-मराठा युद्धांपैकी पहिले युद्ध होते. युद्धाची सुरुवात सुरतच्या तहाने झाली आणि सालबाईच्या तहाने संपली. हे युद्ध सुरत आणि पुणे राज्यामध्ये लढले गेले आणि युद्धापूर्वी ब्रिटीशांचा पराभव झाला आणि दोन्ही पक्षांचे स्थान पुनर्संचयित झाले. भारतातील ईस्ट इंडिया कंपनीच्या प्रांतांचे पहिले अध्यक्ष व गव्हर्नर-जनरल वॉरन हेस्टिंग्स यांनी पुणेवर थेट हल्ला न करण्याचा निर्णय घेतला. या लेखात पहिले इंग्रज-मराठा युद्ध बद्दल संपूर्ण माहिती दिली आहे.

First Anglo-Maratha War
पहिले इंग्रज मराठा युद्ध

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची पार्श्वभूमी

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाची पार्श्वभूमी समाजाबून सांगणारे मुद्दे खालीलप्रमाणे आहेत.

  • 1775-1782 दरम्यान ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि मराठा साम्राज्य यांच्यात पहिले अँग्लो-मराठा युद्ध झाले.
  • मराठ्यांची शक्ती कमकुवत होणे: पानिपतच्या तिसऱ्या लढाईनंतर भारतातील मराठा शक्ती कमी होऊ लागली.
  • पेशवा बाळाजी बाजीराव 1761 मध्ये मरण पावला आणि त्यांचा मुलगा माधवराव पहिला हा पानिपतच्या तिसऱ्या युद्धात गमावलेला प्रदेश परत मिळवू शकला.
  • मराठा सिंहासनासाठी लढा: 1770 च्या सुरुवातीस माधवराव पहिला मरण पावला, ज्यामुळे नारायण राव (माधवराव पहिलाचा मुलगा) आणि काका रघुनाथराव यांच्यात मराठ्यांच्या गादीसाठी लढा झाला.
  • रघुनाथराव आपली सत्ता सोडून देण्यास तयार नसल्याने त्यांनी मुंबई येथे इंग्रजांकडून मदत मागितली आणि 17 मार्च 1775 रोजी सूरतच्या करारावर स्वाक्षरी केली. या करारानुसार रघुनाथरावांनी ब्रिटीशांना सालसेट व वसई प्रांताचा काही भाग व सूरत आणि भरुच जिल्ह्यातील महसूलाचा अधिकार दिला. त्या बदल्यात ब्रिटीशांनी रघुनाथरावांना 2500 सैनिक देण्याचे आश्वासन दिले.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध का झाले?

नारायणराव पेशव्याच्या खुनानंतर रघुनाथरावाने पेशवाईचा अधिकार स्वतःकडे घेण्याचा प्रयत्न केला, त्यामुळे त्याच्याविरुद्ध बारभाई कारस्थान रचून तत्कालीन मुत्सद्यांनी सवाई माधवराव यास पेशवा म्हणून जाहीर केले. साहजिकच पेशवाईविषयी तंटा चालू झाला. पेशवेपद मिळविण्याच्या महत्त्वकांक्षेने रघुनाथराव ऊर्फ राघोबा इंग्रजांस मिळाला व 1775 मध्ये त्याने इंग्रजांबरोबर सुरत तेथे तह केला.

या तहानुसार मुंबईकर इंग्रजांनी रघुनाथरावाला पेशवेपद देण्याची हमी घेतली त्याबद्दल त्याने इंग्रजांना साष्टी, वसई, भडोच, सुरत असा एकोणीस लाखांचा मुलूख देण्याचे कबूल केले या तहानुसार रघुनाथरावाचे व इंग्रजांचे सैन्य पुण्यावर चालून गेले रघुनाथराव पेशव्याबरोबर सुरत येथे इंग्रजांनी केलेला तह कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला मान्य नव्हता, त्याने मुंबईकरांना दोषी ठरवून सदर कारवाईसाठी धाडलेले सैन्य माघारे बोलाविले. 1775 मधील सुरतचा तह हा पहिल्या अँग्लो-मराठा युद्धाची सुरुवात मानली जाते.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध 

सुरतच्या तहानुसार मुंबईकर इंग्रजांनी रघुनाथरावाला पेशवेपद देण्याची हमी घेतली त्याबद्दल त्याने इंग्रजांना साष्टी, वसई, भडोच, सुरत असा एकोणीस लाखांचा मुलूख देण्याचे कबूल केले या तहानुसार रघुनाथरावाचे व इंग्रजांचे सैन्य पुण्यावर चालून गेले रघुनाथराव पेशव्याबरोबर सुरत येथे इंग्रजांनी केलेला तह कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलला मान्य नव्हता, त्याने मुंबईकरांना दोषी ठरवून सदर कारवाईसाठी धाडलेले सैन्य माघारे बोलाविले.

थोड्याच दिवसांत कलकत्त्याच्या गव्हर्नर जनरलने बारभाईंचे पुढारी नाना फडणीस व सखारामबापू यांच्याशी 1776 मध्ये पुरंदर येथे तह केला या तहात साष्टी व वसई परत देऊन इंग्रजांनी रघुनाथरावाला मदत करु नये असे ठरले.

परंतु मुंबईच्या गव्हर्नरने इंग्लंडमधील कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मदतीच्या जोरावर पुरंदरचा तह अमान्य करुन रघुनाथरावाला आश्रय दिला यामुळे बारभाईंनाही पुरंदरचा तह पाळता आला नाही. नाना फडणीसाने फ्रेंच अधिकारी सेंट लूबिन याचे साहाय्य घेण्यासाठी फ्रेंचांना पश्चिम किनाऱ्यावर एक बंदर द्यावयाचे कबूल केले मराठ्यांच्या हालचालींचा संशय येऊन इंग्रजांनी मराठ्यांविरुद्ध युद्ध पुकारले 1778 मध्ये रघुनाथरावाला घेऊन कर्नल इगर्टन पुण्यावर चालून आला.

मुंबईकरांच्या मदतीसाठी वॉरन हेस्टिंग्जने बंगालमधून सहा पलटणी धाडल्या कर्नल इगर्टनची प्रकृती बिघडल्यामुळे कर्नल कॉकबर्नकडे 1779 मध्ये सैन्याचे नेतृत्व आले या फौजेवर भीमराव पानसे चालून गेला आणि महादजी शिंदे व हरिपंत फडके त्याला सैन्यासह मिळाले

उत्तर हिंदुस्थानात सेनापती पॉपमच्या फौजेने शिंद्यांच्या मुलखात शिरुन ग्वाल्हेर घेतले. माळव्यावर इंग्रजांचा हल्ला होताच महादजीने त्यांना मागे रेटले. सर्व बाजूंनी इंग्रजांवर हल्ला करण्याच्या योजनेत निजाम मात्र स्वस्थ बसला.

वॉरन हेस्टिंग्जने फत्तेसिंग भोसल्यास सोळा लाख रुपये देऊन आपल्याकडे वळवून घेतले यामुळे पूर्वी ठरल्याप्रमाणे फक्त हैदर अली व महादजी यांनी चढाई केलीमद्रासच्या बाजूस हैदरने इंग्रजांचा पराभव केला महादजीने सीप्री येथे कर्नल मूटचा पराभव केला शेवटी इंग्रजांनी मराठ्यांशी मिळते घेण्याचे ठरविले.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध कोणी जिंकले

पहिले इंग्रज-मराठा युद्ध मराठ्यांनी जिंकले. इंग्रजांचा मराठ्यांकडून पराभव झाला आणि त्यांनी 1779 मध्ये जानेवारीच्या मध्यावर शरणागती पत्करली.

सालबाई येथील तहाच्या अटी कोणत्या होत्या?

वॉरन हेस्टिंग्जने महादजीमार्फत पुणे दरबाराशी बोलणी सुरु केली याच सुमारास हैदर मरण पावल्यामुळे नाना फडणीसाने शिंद्यांच्या विचारास संमती दिली दि 17 मे 1782 रोजी इंग्रज मराठे यांत सालबाईचा तह झालात्यातील काही महत्त्वाच्या अटी अशा
  • साष्टीखेरीज इंग्रजांनी घेतलेला मुलूख मराठ्यांना परत करावा.
  • मराठ्यांनी इंग्रजांखेरीज इतर पाश्चात्त्यांना आश्रय देऊ नये.
  • रघुनाथरावाचा पक्ष इंग्रजांनी सोडावा.
  • रघुनाथरावाने दरसाल तीन लाखांची नेमणूक घेऊन कोपरगावी स्वस्थ रहावे.
  • शिंद्यांस त्यांच्या मध्यस्थीबद्दल भडोच द्यावे.

या युद्धात हिंदुस्थानच्या राजकारणाचे केंद्र पुण्याहून उत्तरेकडे स्थिर झाले. तह करण्यात महादजीला यश मिळाले महादजीशी वैर करुन चालणार नाही, हे इंग्रजांनी हेरले पुण्यात नाना व उत्तरेत महादजी असेपर्यंत त्यांच्या कारभारात ढवळाढवळ करु नये, हा धडा इंग्रजांनी घेतला. नानाने आपल्या मुत्सद्देगिरीने व महादजीने आपल्या शौर्याने मराठी राज्य सांभाळले इंग्रजांविरुद्ध नानाने निजाम, हैदर, सिद्दी, भोसले यांजबरोबर केलेला संघ त्याच्या मुत्सद्दीपणाचे द्योतक ठरते.

मराठ्यांची शक्ती पानिपताच्या पराभवानंतरही कमी झाली नव्हती, हे या नऊ वर्षांच्या लढाईत इंग्रजांना कळून चुकले. सालबाईच्या तहानंतर काही वर्षे मराठे व इंग्रज यांच्यात सख्य होते.

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धाचे परिणाम

  • ब्रिटीश ईस्ट इंडिया कंपनी: तिने मराठ्यांकडून हिसकावलेले सालसेट आणि ब्रोच राखून ठेवले.
    • ब्रिटीश EIC ने मराठ्यांकडून हमी देखील मिळवली की ते म्हैसूरच्या हैदर अलीला इंग्रजांविरुद्धच्या लढाईत साथ देणार नाहीत.
    • मराठ्यांनीही हैदर अलीकडून दख्खनमधील त्यांची मालमत्ता परत घेण्याचे मान्य केले.
    • मराठ्यांनीही फ्रेंचांना आणखी प्रदेश न देण्याचे मान्य केले.
  • मराठा साम्राज्याचे पेशवे: पुरंधरच्या तहानंतर इंग्रजांनी घेतलेले सर्व प्रदेश मराठ्यांना परत देण्यात आले.
    • इंग्रजांनी दुसरा माधवराव (नारायणरावांचा मुलगा) यांना पेशवा म्हणून स्वीकारले.
    • रघुनाथरावांना दरवर्षी तीन लाख रुपये पेन्शन मिळणार होती.

दुसरे इंग्रज-मराठा युद्ध कधी झाले

दुसरा बाजीराव पेशवा हा अधिकाराने जरी मराठ्यांच्या राज्याचा मुख्य कार्यकारी असला तरी पेशव्यांचे राज्यावरचे नियंत्रण संपुष्टात आल्यात जमा होते. मराठ्यांची सत्ताकेंद्र पुण्यावरून आता इंदूर व ग्वाल्हेर येथे गेले. महादजी शिंद्याच्या निधना नंतर मराठ्याच्या एकीमधील कच्चे दुवे बाहेर येउ लागले. पेशवे व शिंदेना होळकरांनी पुण्याच्या जवळ पराभूत केले. पराभवा नंतर होळकरांनी पुण्याचा ताबा घेतला व दुसरा बाजीराव पळून इंग्रजाकडे आश्रयासाठी गेला व संधी केली जी वसईचा तह या नावाने ओळखली जाते. या तहानुसार इंग्रजांनी बाजीरावला मराठ्यांच्या सत्ता स्थानी पुन्हा बसवण्यासाठी मदत करण्याचे मान्य केले. बाजीरावच्या या देशघातकी निर्णयाने मराठे संस्थनिकात संतापाची लाट उसळली व ब्रिटीशांविरुद्ध युद्ध पुकारले. मराठे संस्थानिकांनीही फ्रेंचांकडून सैन्य मदत घेतली होती. भारतातील फ्रेंच प्रभुत्व कमी करणे हेही ब्रिटीशांचे धोरण होते. अश्या प्रकारे बाजीराव-इंग्रज सरकार व ईस्ट इंडिया कंपनी विरुद्ध शिंदे व इतर काही मराठा संस्थानिक असे दुसरे इंग्रज मराठा युद्ध सुरू झाले. लष्करी दरारा व मुत्सदेगीरी यावर इंग्रजांना तह करण्यास भाग पाडले. मराठे संस्थानिकांचे सार्वभौमत्व कायम राहिले परंतु मराठ्यांना गुजरात व ओरिसाचा भूभाग गमवावा लागला

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध कधी झाले

तिसरे इंग्रज-मराठा युद्ध हे इ.स. 1817-18 मध्ये मराठे व इंग्रजांच्यात झालेले तिसरे व निर्णायक युद्ध होते. या युद्धात इंग्रजांनी मराठा साम्राज्याचा पराभव केला व जवळपास संपूर्ण भारतावर नियंत्रण मिळवले.व्दितीय इंग्रज मराठा युद्धाच्या नंतर मराठ्यांना आणि ब्रिटिशांना उसंत मिळाली,त्या दरम्यान ब्रिटिशांनी स्वतःची शक्ती वाढवली परंतु मराठ्यांनी एकोपा टिकवला नाही आणि ते ब्रिटीशांच्या तुलनेत मराठे राजनैतिक आणि लष्करीदृष्ट्या कमी पडत गेले.

पहिले इंग्रज-मराठा युद्ध: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. सुरतचा तह किती साली झाला?

(a) 1762

(b) 1767

(c) 1775

(d) 1773

उत्तर- (c)

प्रश्न 2. पहिल्या इंग्रज मराठा युद्धावेळी बंगालचा गव्हर्नर जनरल कोण होता?

(a) विल्यम बेन्टीक

(b) वॉरन हेस्टिंग्ज

(c) डलहौसी

(d) या पैकी नाही

उत्तर- (a)

प्रश्न 3. तिसरे मराठा इंग्रज युद्ध किती साली झाले?

(a) 1828-29

(b) 1817-18

(c) 1819-20

(d) 1821-22

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

Sharing is caring!

पहिले इंग्रज-मराठा युद्ध, WRD भरतीसाठी अभ्यास साहित्य_5.1

FAQs

पहिले इंग्रज-मराठा युद्ध केव्हा झाले?

1975 मध्ये पहिले इंग्रज-मराठा युद्ध झाले

पहिल्या अँग्लो-मराठा युद्धात मराठ्यांचे नेतृत्व कोणी केले?

पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात नाना फडणवीस यांनी मराठ्यांचे नेतृत्व केले.