Marathi govt jobs   »   Study Materials   »   नाम व नामाचे प्रकार

नाम व नामाचे प्रकार: WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

नाम व नामाचे प्रकार

नाम व नामाचे प्रकार: महाराष्ट्रातील बहुतेक स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी भाषा हा विषय असतोच. मराठी भाषेत सर्वात महत्वाचे म्हणजे मराठी व्याकरण. बऱ्याच स्पर्धा परीक्षेमध्ये मराठी विषयात मराठी व्याकरणावर प्रश्न विचारले जातात. आगामी काळातील WRD जलसंपदा विभाग भरती, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 व इतर स्पर्धा परीक्षांमध्ये मराठी व्याकरणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात नामाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

नाम व नामाचे प्रकार: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD जलसंपदा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव नाम व नामाचे प्रकार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • नाम
  • नामाचे प्रकार
  • नमुना प्रश्न

नाम

नाम: या जगातील कोणत्याही सजीव अथवा निर्जीव घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात. उदा. पुस्तक, रमेश, खुर्ची इ.

नामाचे प्रकार

नामाचे प्रमुख तीन प्रकार पडतात.

  • सामान्य नाम
  • विशेष नाम
  • भाववाचक नाम

सामान्य नाम:

एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे सर्वसामान्य नाव दिले जाते त्याला ‘सामान्य नाम’ असे म्हणतात. उदा. घर, मुलगी, पाणी, सोने

सामान्य नामाचे दोन प्रकार पडतात.

  • पदार्थवाचक नाम: तांबे, कापड, पीठ
  • समूहवाचक नाम: जुडी, ढिगारा

विशेष नाम:

ज्या नामाने जातीचा बोध होत नसून त्या जातीतील एका विशिष्ट व्यक्तीचा, वस्तूचा किंवा प्राण्याचा बोध होतो त्यास ‘विशेष नाम’ असे म्हणतात. उदा. राम, निखील, औरंगाबाद

भाववाचक नाम:

ज्या नामाने प्राणी किंवा वस्तु यांच्यामध्ये असलेल्या गुण, धर्म, किंवा भाव यांचा बोध होतो. त्याला ‘भाववाचक नाम’ असे म्हणतात. भाववाचक नामाचे घटक प्रत्यक्षात वस्तुरूपात दर्शविता येत नाहीत. उदा. सौंदर्य, धैर्य, गर्व, इ

भाववाचक नामाचे दोन प्रकार पडतात.

  • स्थितीदर्शक: श्रीमंती, गुलामी
  • गुणदर्शक : माधुर्य, चांगुलपणा
  • कृतीदर्शक: चोरी, चळवळ

नाम व नामाचे प्रकार: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. रमेश परीक्षेत नापास झाला या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा.

(a) सामान्य नाम

(b) धातूसाधित नाम

(c) विशेष नाम

(d) भाववाचक नाम

उत्तर- (c)

प्रश्न 2. खालील पैकी भाववाचक नाम ओळखा.

(a) शौर्य

(b) रसिका

(c) जमीन

(d) कुत्रा

उत्तर- (a)

प्रश्न 3. तुमचा मुलगा कुंभकरणच दिसतो  या वाक्यातील नामाचा प्रकार ओळखा.

(a) सामान्य नाम

(b) धातूसाधित नाम

(c) विशेष नाम

(d) भाववाचक नाम

उत्तर- (a)

प्रश्न 4. सामान्यनाम नसलेला शब्द ओळखा.

(a) जमीन

(b) ताजमहाल

(c) मांजर

(d) माणूस

उत्तर- (b)

प्रश्न 5. गोड या शब्दाचे भाववाचक नाम कोणते ? 

(a) गोडसर

(b) गोडवा

(c) गोडी

(d) यापैकी नाही

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

नामाचे किती प्रकार पडतात?

नामाचे 3 प्रकार पडतात.

नाम म्हणजे काय?

या जगातील कोणत्याही सजीव अथवा निर्जीव घटकाला ओळखण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला नाम असे म्हणतात.