Marathi govt jobs   »   Study Materials   »   काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार: WRD भरती 2023 साठी अभ्यास साहित्य

काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात काळ व काळाचे प्रकार या घटकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

काळ व काळाचे प्रकार: विहंगावलोकन 

प्रयोग: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD जलसंपदा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव काळ व काळाचे प्रकार
लेखातील प्रमुख मुद्दे
  • काळ
  • काळाचे प्रकार
  • नमुना प्रश्न

काळ व काळाचे प्रकार

काळ व काळाचे प्रकार: वाक्यात दिलेल्या क्रियापदावरून जसा क्रियेचा बोध होतो, तसेच ती क्रिया कोणत्या वेळी घडत आहे याचाही बोध होतो त्याला ‘काळ’ असे म्हणतात.

काळाचे प्रमुख 3 प्रकार पडतात.

  • वर्तमान काळ
  • भूतकाळ
  • भविष्यकाळ
  • वर्तमान काळ

वर्तमान काळ

वर्तमान काळ: क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते आहे असे जेव्हा समजते तेव्हा तो काळ ‘वर्तमानकाळ’ असतो. उदा. मी पत्र लिहितो.

वर्तमानकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  • साधा वर्तमानकाळ
  • अपूर्ण वर्तमानकाळ
  • पूर्ण वर्तमानकाळ
  • रीती वर्तमानकाळ

साधा वर्तमानकाळ: जेंव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया आता घडते असे समजते तेव्हा त्या वाक्याचा काळ साधा वर्तमानकाळ असतो. उदा. सुरेश गाणे गातो.

अपूर्ण वर्तमानकाळ: एखादी क्रिया चालू आहे हे दर्शविण्यासाठी अपूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. गोलू खेळत आहे.

पूर्ण वर्तमानकाळ: नुकतीच पूर्ण झालेली क्रिया दर्शविण्यासाठी पूर्ण वर्तमानकाळ वापरतात. उदा. श्यामने पेपर सोडवला आहे.

रीती वर्तमानकाळ: वर्तमानकाळात एखादी क्रिया सतत घडत असल्याची रीत दाखविली तर त्याला ‘रीती वर्तमानकाळ’ असे म्हणतात. उदा. माधुरी रोज डान्स क्लासला जाते.

भूतकाळ

भूतकाळ: जेव्हा क्रियापदाच्या रूपावरून क्रिया पूर्वी घडून गेलेली असते. असा बोध होतो तेव्हा त्या काळाला ‘भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी पत्र लिहिले.

भूतकाळचे 4 उपप्रकार आहेत.

  • साधा भूतकाळ
  • अपूर्ण भूतकाळ
  • पूर्ण भूतकाळ
  • रीती भूतकाळ

साधा भूतकाळ: एखादी क्रिया ही अगोदर घडून गेलेली असते व त्या संदर्भात जेव्हा बोलले जाते तेव्हा त्या काळास ‘साधा भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी गृहपाठ केला.

अपूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात चालू होती किंवा घडत होती म्हणजेच त्यावेळेस ती क्रिया अपूर्ण होती तेव्हा क्रियेच्या त्या अवस्थेला ‘अपूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा तो वाचत होता.

पूर्ण भूतकाळ: एखादी क्रिया मागील काळात पूर्ण झालेली असते किंवा ती क्रिया पुर्णपणे संपलेली असते, असा जेव्हा अंदाज येतो तेव्हा त्याला ‘पूर्ण भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. तो उठला होता.

रीती भूतकाळ: भूतकाळात एखादी क्रिया सातत्याने घडत आलेली असून ती क्रिया पूर्ण देखील झालेली असते. अशा काळाला ‘रीती भूतकाळ’ असे म्हणतात. उदा. मी दररोज शेतात जात असे.

भविष्यकाळ

भविष्यकाळ: क्रियापदाच्या रूपावरुन जेव्हा एखादी क्रिया ही पुढे घडणार आहे हे दर्शविण्यासाठी भविष्यकाळाचा उपयोग होतो.

भविष्यकाळाचे 4 उपप्रकार आहेत.

  • साधा भविष्यकाळ
  • अपूर्ण भविष्यकाळ
  • पूर्ण भविष्यकाळ
  • रीती भविष्यकाळ

साधा भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया पुढे घडणार असेल असा बोध होतो अशा वेळी ‘साधा भविष्यकाळ’ असतो. उदा. पुढीलवर्षी मी ट्रीप ला जाईन.

अपूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळामध्ये चालू असेल किंवा पूर्ण झाली नसेल तेव्हा त्याला ‘अपूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी उद्या नागपुरात असेन.

पूर्ण भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यकाळातील असून ती पूर्ण झाल्याची जाणीव झालेली असते तेव्हा त्याला ‘पूर्ण भविष्यकाळ’ असे म्हणतात. याने पुस्तक वाचले असेल.

रीती भविष्यकाळ: जेव्हा एखादी क्रिया ही भविष्यात नेहमी घडणारी असेल, तर त्याला ‘रीती भविष्यकाळ’ असे म्हणतात. उदा. मी रोज व्यायाम करत जाईल.

काळ: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. भविष्यात एखाद्या घटनेची पुनरावृत्ती होईल हे दर्शविण्यासाठी कोणता काळ वापरतात? 

(a) साधा भविष्यकाळ

(b) चालू भविष्यकाळ

(c) पूर्ण भविष्यकाळ

(d) रीती भविष्यकाळ 

उत्तर- (d)

प्रश्न 2. ईल – आख्याता वरून कोणता काळ ओळखला जातो ?

(a) वर्तमान

(b) भूत

(c) भविष्य 

(d) यापैकी नाही

उत्तर- (c)

प्रश्न 3. ‘अभंग गातांना संत मीराबाई नाचली होती.’ हे वाक्य कोणत्या काळातील आहे?

(a) पूर्ण वर्तमानकाळ

(b) पूर्ण भूतकाळ 

(c) पूर्ण भविष्यकाळ

(d) अपूर्ण वर्तमानकाळ

उत्तर- (b)

प्रश्न 4. ‘मी कादंबरी लिहिन’ काळ ओळखा.

(a) भूतकाळ

(b) भविष्यकाळ 

(c) वर्तमानकाळ

(d) साधा वर्तमानकाळ

उत्तर- (b)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

काळ व काळाचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

काळ व काळाचे प्रकार बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

मराठीत काळचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत काळचे 3 प्रमुख प्रकार पडतात