Marathi govt jobs   »   Study Materials   »   प्रयोग

प्रयोग, WRD भरतीसाठी अभ्यास साहित्य

प्रयोग

प्रयोग: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 साठी मराठी विषयाचे अभ्यास साहित्य WRD जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. आज आपण या लेखात प्रयोग या घटकाबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.

प्रयोग: विहंगावलोकन 

प्रयोग: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD जलसंपदा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त
विषय मराठी व्याकरण
लेखाचे नाव प्रयोग
लेखातील प्रमुख मुद्दे
  • प्रयोग
  • प्रयोगाचे प्रकार
  • नमुना प्रश्न

प्रयोग

प्रयोग: वाक्यात कर्त्याला किंवा कर्माला प्राधान्य दिल्यामुळे क्रियापदाचे रूप त्याच्याप्रमाणे बदलत असते. वाक्याती कर्ता-कर्म-क्रियापद यांच्या परस्परसंबंधाला प्रयोग असे म्हणतात. ‘प्रयोग’ हा शब्द संस्कृत ‘प्र+युज’ (यश) यावरून तयार झाला असून त्याचा अर्थ ‘जुळणी’ किंवा ‘रचना’ असा आहे. प्रत्येक वाक्यात जे क्रियापद अ त्याच्या रूपाची ठेवण किंवा रचनाच अशी असते की, ते क्रियापद कधी कर्त्याचे किंवा कर्माचे लिंग, वचन किं पुरुष याप्रमाणे बदलते, तर कधी ते क्रियापद मुळीच बदलत नाही.

प्रयोगाचे प्रकार 

मराठीत प्रयोगाचे तीन प्रकार पडतात.

  • कर्तरी प्रयोग
  • कर्मणी प्रयोग
  • भावे प्रयोग

कर्तरी प्रयोग: जेव्हा क्रियापदाचे रूप हे कर्त्याच्या लिंग किवा वाचनानुसार बदलत असेल तर त्या प्रयोगास कर्तरी प्रयोग (Active Voice) असे म्हणतात. उदा.

श्याम      गाणे        गातो.

(कर्ता)   (कर्म)   (क्रियापद)

आता यात कर्ता बदलला तर,  सीता गाणे गाते. (कर्ता बदलला की क्रियापद बदलेल.)

कर्तरी प्रयोगाचे दोन उपप्रकार पडतात.

  1. सकर्मक कर्तरी प्रयोग
  2. अकर्मक कर्तरी प्रयोग

1. सकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असेल तेव्हा त्यास सकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. राम बैल बांधतो.

2. अकर्मक कर्तरी प्रयोग: ज्या कर्तरी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्म आलेले नसते तेव्हा त्यास अकर्मक कर्तरी प्रयोग असे म्हणतात. उदा. सारे पोपट उडाले.

कर्मणी प्रयोग (Passive Voice): क्रियापदाचे रूप कर्माच्या लिंग किवा वचनानुसार बदलते तर त्यास कर्मणी प्रयोग (Passive Voice) असे म्हणतात. उदा. रामने बैल बांधला.

कर्मणी प्रयोगाचे पाच उपप्रकार पडतात.

  1. प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग
  2. नवीन कर्मणी प्रयोग
  3. समापन कर्मणी प्रयोग
  4. शक्य कर्मणी प्रयोग
  5. प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग

प्राचीन कर्मणी प्रयोग / पुराण कर्मणी प्रयोग: प्राचीन मराठी काव्यातील सकर्मक धातूला ‘ज’ प्रत्यय जोडून तयार केलेल्या वाक्यांचा यात समावेश होतो. उदा. नळे इंद्रासी असे बोलिजेले.

नवीन कर्मणी प्रयोग: ह्या प्रयोगात इंग्लिश मधील Passive Voice प्रमाणे वाक्याची रचना आढळते. तसेच वाक्याच्या सुरवातीला कर्म येते व कर्त्या कडून प्रत्यय लागतात. उदा. कंस कृष्णाकडून मारला गेला.

समापन कर्मणी प्रयोग: ज्या कर्मणी प्रयोगातून कृती पूर्ण झाल्याचे सूचित केले जाते. क्रियापद शक्यतो ऊन/हून झाला/झाली या प्रकारचे असते. उदा. त्याचा गृहपाठ करून झाला.

शक्य कर्मणी प्रयोग: जेव्हा कर्मणी प्रयोगतील वाक्याच्या क्रियापदाचा अर्थ कर्त्यामध्ये ती क्रिया करण्याची शक्यता असल्यासारखा असतो, दिसतो तेव्हा त्या प्रयोगास शक्य कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. मुलाच्याने धावले जाते.

प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग: कर्मणी प्रयोगाच्या वाक्यात जेव्हा कर्ता प्रथम मानला जातो तेव्हा त्या प्रयोगास प्रधान कर्तुक कर्मणी प्रयोग असे म्हणतात. उदा. त्याने पत्र लिहीले.

भावे प्रयोग: जेव्हा कर्त्याच्या किवा कर्माच्या लिंग किवा वाचनात बदल करूनही क्रियापद बदलत नाही तेव्हा त्या प्रयोगास भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. रामने बैलाला बांधले.

भावे प्रयोगाचे दोन उपप्रकर पडतात.

  1. सकर्मक भावे प्रयोग
  2. अकर्मक भावे प्रयोग

सकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले असल्यास त्यास सकर्मक भावे प्रयोग म्हणतात. उदा. रामाने रावणास मारले.

अकर्मक भावे प्रयोग: ज्या भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्म आलेले नसल्यास त्यास अकर्मक भावे प्रयोग असे म्हणतात उदा.  मुलांनी खेळावे.

भावकर्तरी प्रयोग:  भावे प्रयोगाच्या वाक्यात कर्ता आलेला नसेल तेव्हा त्यास अकर्तुक भावे प्रयोग असे म्हणतात. उदा. आता सांजावले. (सायंकाळ झाली.)

मिश्र किंवा संकर प्रयोग: एकाच वाक्यात दोन प्रयोगांचे मिश्रण असल्यास त्याला संकर प्रयोग म्हणतात.

कर्तृ-कर्मसंकर: ज्या वाक्यातील क्रियापद कर्ता व कर्म अशा दोन्हींनुसार बदलते, त्यास कर्तृ-कर्मसंकर असे म्हणतात.

कर्म भाव संकर: कर्ता व कर्माला प्रत्यय असतो. क्रियापद कर्माच्या लिंग, वचनानुसार बदलते.

कर्तृ- भावसंकर:या प्रयोगात भावे प्रयोगाची छटा असून कर्त्यांच्या वचनानुसार क्रियापद बदलते.

प्रयोग: नमुना प्रश्न 

प्रश्न 1. प्रतिक पेरू खातो.  या वाक्यातील प्रयोग ओळखा.

(a) कर्तरी प्रयोग

(b) कर्मणी प्रयोग

(c) भावे प्रयोग

(d) यापैकी नाही

उत्तर- (a)

प्रश्न 2. प्रयोग ओळखा – ‘शिवबाने रोहिरेश्वरापुढे शपथ घेतली.’

(a) कर्मणी प्रयोग 

(b) भावे प्रयोग

(c) कर्तरी प्रयोग

(d) भावकर्तरी प्रयोग

उत्तर- (a)

प्रश्न 3.‘प्रतिज्ञा आपण रोजच म्हणतो’ या वाक्याचा प्रयोग ओळखा.

(a) सकर्मक कर्तरी

(b) अकर्मक कर्तरी

(c) कर्मणी

(d) अकर्मक भावे

उत्तर- (a)

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

 

Sharing is caring!

FAQs

मराठीत प्रयोगाचे किती प्रमुख प्रकार पडतात?

मराठीत प्रयोगाचे 3 प्रमुख प्रकार पडतात

प्रयोगाचे प्रकार बद्दल माहिती मला कोठे मिळेल?

प्रयोगाचे प्रकार बद्दल माहिती या लेखात दिली आहे.