Table of Contents
शब्द शक्ती
शब्द शक्ती: WRD जलसंपदा विभाग भरती 2023 मध्ये तांत्रिक व अतांत्रिक संवर्गातील पदांच्या परीक्षेत मराठी विषयास अनन्य साधारण महत्व आहे. मराठी व्याकरण हा कमी वेळेमध्ये जास्त गुण मिळवून देणारा विषय आहे थोड्याशा सरावाने या विषयांमध्ये जास्त गुण मिळवता येतात. शब्दांच्या वेगवेगळे अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीला ‘शब्दशक्ती’ म्हणतात. आज आपण या लेखात विशेषण व विशेषणाच्या सर्व प्रकारांबद्दल थोडक्यात माहिती पाहणार आहे.
शब्द शक्ती: विहंगावलोकन
शब्द शक्ती: विहंगावलोकन | |
श्रेणी | अभ्यास साहित्य |
उपयोगिता | WRD जलसंपदा विभाग आणि इतर सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त |
विषय | मराठी व्याकरण |
लेखाचे नाव | शब्द शक्ती |
लेखातील प्रमुख मुद्दे |
|
शब्द शक्ती
शब्द शक्ती: शब्दांमध्ये वेगवेगळे अर्थछटा असणारे अर्थ व्यक्त करण्याची जी शक्ती असते त्यास “शब्दशक्ती’ असे म्हणतात.
शब्द शक्तीचे प्रकार
शब्द शक्तीचे प्रकार: शब्द शक्तीचे प्रमुख तीन प्रकार पडतात
- अभिधा
- व्यंजना
- लक्षणा
अभिधा:-
एखाद्या शब्दाचा उच्चार केल्यावर त्याचा जो सरळ व समाजमान्य अर्थ निघतो तो अर्थ व्यक्त करण्याच्या शक्तीस अभिधा असे म्हणतात. शब्द उच्चारल्यानंतर ती गोष्ट किंवा वस्तू डोळ्यासमोर येते.
उदा. काल मी एक साप पाहिला. या वाक्यात साप म्हणजे एक विषारी प्राणी आहे.
व्यंजना :-
मूळ न बदलता दुसरा अर्थ व्यक्त करण्याची शब्दाची जी शक्ती आहे तिला व्यंजना असे म्हणतात. एकच शब्द द्विअर्थाने वापरणे, व्यंग करणे याचा यामध्ये समावेश होतो.
उदा. तो माणूस निव्वळ साप आहे.
लक्षणा:-
एखाद्या शब्दाचा मूळ अर्थ लक्षात न घेता त्याच्याशी सुसंगत दुसराच अर्थ लक्षात घ्यावा लागतो त्या शब्द्शक्तीला लक्षणा असे म्हणतात. ही गोष्ट कशी शक्य आहे हे जेव्हा मनात येते तेव्हा लक्षणा शब्दशक्ती असते.
उदा. आम्ही गहू खातो. याचा अर्थ आम्ही गव्हापासून बनवलेले पदार्थ खातो.
शब्द शक्ती: नमुना प्रश्न
प्रश्न 1. मी पु.ल. देशपांडे वाचले. या वाक्यातील शब्द शक्तीचा प्रकार ओळखा.
(a) व्यंजना
(b) लक्षणा
(c) अभिधा
(d) या पैकी नाही
उत्तर- (c)
प्रश्न 2. आजकाल समाजात माणसांपेक्षा लांडग्यांचाच वावर जास्त आहे. या वाक्यातील शब्द शक्तीचा प्रकार ओळखा.
(a) व्यंजना
(b) लक्षणा
(c) अभिधा
(d) या पैकी नाही
उत्तर- (a)
प्रश्न 3. आजोबा ताटावर बसले. या वाक्यातील शब्द शक्तीचा प्रकार ओळखा.
(a) व्यंजना
(b) लक्षणा
(c) अभिधा
(d) या पैकी नाही
उत्तर- (b)
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप