Marathi govt jobs   »   Study Materials   »   मृदा

मृदा: आवश्यक घटक, प्रकार व इतर माहिती | WRD भरतीसाठी अभ्याससाहित्य

मृदा: आवश्यक घटक, प्रकार व इतर माहिती

मृदा: आवश्यक घटक, प्रकार व इतर माहिती: मृदा म्हणजेच जिला आपण सामान्य भाषेत माती असेही म्हणतो निसर्गात आढळणारा एक अतिशय महत्त्वाचा घटक आहे. आगामी काळातील WRD जलसंपदा विभाग भरती मध्ये सामान्यज्ञान विषयावर प्रश्न विचारण्यात येणार आहेत. त्यामुळे या घटकावर हमखास प्रश्न विचारले जाऊ शकतात. त्यामुळे या लेखात आपण मृदा: आवश्यक घटक, प्रकार इत्यादी बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

मृदा: विहंगावलोकन

खालील तक्त्यात तुम्ही मृदा या घटकाचे विहंगावलोकन पाहू शकता.

मृदा: विहंगावलोकन
श्रेणी अभ्यास साहित्य
उपयोगिता WRD भरती व सर्व स्पर्धा परीक्षांसाठी
विषय सामान्य ज्ञान
टॉपिकचे नाव मृदा

मृदा 

मृदेच्या निर्मितीमध्ये मूळ खडक, प्रादेशिक हवामान, जैविक घटक, जमिनीचा उतार व कालावधी हे घटक विचारात घेतले जातात. या सर्व घटकांच्या एकत्रित परिणामातून मृदानिर्मिती होते.

मृदानिर्मितीसाठी आवश्यक घटक :

मूळ खडक : प्रदेशातील मूळ खडक हा मृदानिर्मितीचा महत्त्वाचा घटक असतो. प्रदेशाच्या हवामानानुसार आणि खडकाच्या काठिण्यानुसार मूळ खडकाचे विदारण होते. त्यामुळे मूळ खडकाचा भुगा होऊन मृदा तयार होते. उदा., महाराष्ट्रातील दख्खनच्या पठारावर असलेल्या बेसाल्ट या मूळ खडकाचे विदारण होऊन काळी मृदा तयार होते. या मृदेला ‘रेगूर मृदा’ असे म्हणतात. दक्षिण भारतातील ग्रेनाईट व नीस या मूळ खडकांपासून ‘तांबडी मृदा’ तयार होते.

जैविक घटक : खडकांचे विदारण होऊन त्याचा तयार होतो; परंतु हा भुगा म्हणजे मृदा नव्हे. मृदेमध्ये खडकाच्या भुग्याशिवाय जैविक पदार्थ मिसळले जाणे आवश्यक असते. हे जैविक पदार्थ प्रदेशातील वनस्पती व प्राणी यांच्या विघटनातून मृदेत मिसळतात. वनस्पतींची मुळे, पालापाचोळा, प्राण्यांचे मृतावशेष इत्यादी घटक पाण्यामुळे कुजतात, तसेच त्यांचे विविध जीवांमार्फत विघटन होते. उदा., गांडूळ, सहस्रपाद (पैसा किडा) वाळवी, गोम, मुंग्या इत्यादी. अशा विघटित झालेल्या जैविक पदार्थास ‘ह्युमस’ असे म्हणतात. मृदेमध्ये ह्युमसचे प्रमाण अधिक असेल, तर मृदा सुपीक असते.

प्रादेशिक हवामान : मृदानिर्मितीसाठीचा आवश्यक असणारा हा एक महत्त्वाचा घटक आहे. मूळ खडकाचे विदारण (अपक्षय) होणे, हा मृदानिर्मितीतील पहिला टप्पा असतो. विदारण प्रक्रिया ही प्रदेशाच्या हवामानावर ठरते. प्रदेशाचे हवामान विदारण प्रक्रियेची तीव्रता ठरवते. एकाच मूळ खडकापासून वेगवेगळ्या प्रकारची मृदा हवामानातील फरकामुळे तयार झालेली पाहायला मिळते. उदा., सह्याद्रीच्या पश्चिम भागात हवामान दमट आहे. तेथे बेसाल्ट या खडकाचे अपक्षालन होऊन जांभी मृदा तयार होते. हा मृदेचा प्रकार दख्खनच्या पठारावर कोरड्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या रेगूर मृदेपेक्षा वेगळा आहे.

कालावधी : मृदानिर्मिती ही एक नैसर्गिक प्रक्रिया – आहे. या प्रक्रियेमध्ये मूळ खडकाचे विदारण, हवामान व जैविक घटक या सर्व बाबींचा समावेश होतो. ही प्रक्रिया मंद गतीने होत असल्यामुळे मृदानिर्मितीचा कालावधी मोठा असतो. उच्च दर्जाच्या मृदेचा 2.5 सेंमीचा थर निर्माण होण्यासाठी हजारो वर्षांचा कालावधी लागतो. यावरून मृदा अनमोल असते, हे लक्षात घ्या. जास्त तापमान व जास्त पाऊस असलेल्या प्रदेशात मृदानिर्मितीची प्रक्रिया

मृदा: प्रकार

काळी मृदा : रेगूर किंवा काळी कापसाची मृदा या नावाने देखील ही मृदा प्रसिद्ध आहे. मध्यम पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. नक्ष्यांच्या खोऱ्यांमधील गाळाची मैदाने व दऱ्यांच्या भागात ही मृदा आढळते. दख्खन पठारावर पश्चिम भागात अति काळी तर पूर्वभागात (विदर्भ) मध्यम काळी अशा दोन प्रकारात ही मृदा आढळते. दिसायला काळी असली तरीही या मृदेत जैविक घटकांचे प्रमाण कमी असते.

जांभी मृदा : सह्याद्रीच्या पश्चिमेस कोकण किनारपट्टीत व पूर्व विदर्भात या मृदेचा विस्तार आढळतो. अति पावसाच्या प्रदेशात खडकांचे झालेले विदारण मोठ्या प्रमाणात वाहून जाते. त्यामुळे मूळ खडक उघडा पडतो. खडकातील लोहाचा वातावरणातील प्राणवायूशी संयोग घडून रासायनिक क्रिया घडते. त्यातून ही मृदा निर्माण होते. या मृदेचा रंग तांबडा असतो.

जाडीभरडी मृदा : विदारण क्रिया व कमी पाऊस याच्या परिणामातून हा मृदा प्रकार तयार होतो. पठाराच्या पश्चिम भागात घाट माथ्यावर ही मृदा आढळते. उदा., अजंठा, बालाघाट व महादेव डोंगर. या मृदेत ह्युमसचे प्रमाण नगण्य असते.

किनारपट्टीवरील गाळाची मृदा : कोकणातील बहुतांश नढ्या लांबीला कमी परंतु अतिवेगाने वाहतात. त्यामुळे त्यांनी वाहून आणलेला गाळ नदीच्या मुखाशी साचतो. पश्चिम किनाऱ्यावर नद्यांच्या मुखाशी ही मृदा निर्माण झाली आहे. उदा., धरमतर, पनवेल इत्यादी परिसर.

पिवळसर तपकिरी मृदा : अतिरिक्त पावसाच्या प्रदेशात ही मृदा आढळते. ही मृदा फारशी सुपीक नसते. त्यामुळे शेतीसाठी या मृदेचा उपयोग कमी होतो. चंद्रपूर, भंडाऱ्याचा पूर्वभाग व सह्याद्री पर्वतीय भागात ही मृदा प्रामुख्याने आढळते. मृदा प्रकार व त्यांचे वितरण पाहता असे लक्षात येते की, राज्यातील हवामान, मूळ खडक व कालावधी यांचा प्रभाव मृदा निर्मितीवर पडताना दिसतो.

मृदा: धूप व अवनती 

वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते. वाहते पाणी, हवामान आणि प्राकृतिक रचनेतील विविधता यांमुळे मृदेची धूप होते. मृदेची जशी धूप होते तसेच काही कारणांनी मृदेचे आरोग्य बिघडते. यास ‘मृदेची अवनती होणे’ असे म्हणतात. शेतीतून अधिक उत्पादन मिळवण्यासाठी रासायनिक खते, जंतुनाशके, तणनाशके इत्यादींचा वापर केला जातो. रसायने आणि खतांच्या अशा अतिरेकी वापरामुळेही मृदेची अवनती घडून येते.

अतिरिक्त जलसिंचनामुळे जमिनीतील क्षार वर येतात व जमीन खारपट बनते. रासायनिक द्रव्यांच्या अतिवापरांमुळे ती द्रव्ये मृदेत वर्षानुवर्षे तशीच राहतात; पण त्यामुळे मृदेतील सूक्ष्मजीव नाहीसे होण्याचा धोका असतो. मृदेतील ह्युमसचे प्रमाणदेखील कमी होत जाते व वनस्पतींना आवश्यक पोषक द्रव्ये मृदेतून मिळेनाशी होतात. मृदेचा सामू (PH Value) बिघडला असल्यास मृदेचे आरोग्य बिघडले, असे समजतात.

मृदा प्रदूषण

मृदा प्रदूषण म्हणजे मातीत होणारे प्रदूषण. हे प्रामुख्याने शेतीमध्ये कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे किंवा मातीमध्ये नसावेत अशा पदार्थांच्या प्रवेशामुळे होते. त्यामुळे जमिनीच्या उत्पादन क्षमतेवरही मोठा परिणाम होतो. यासोबतच त्यामुळे जलप्रदूषणही होते.

कारणे:

  • खाण: खाणकामातून निघालेला डेब्रिज जवळच्याच ठिकाणी टाकला जातो. त्यामुळे कचऱ्याचे मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत. इमारतीचे दगड, लोखंड, धातू, अभ्रक, तांबे, इत्यादी खनिजांच्या उत्खननातून निघणाऱ्या ढिगाऱ्यांमुळे जमिनीची सुपीकता नष्ट होते. पावसाळ्यात हा कचरा पाण्यात मिसळून दूरवर जातो आणि माती प्रदूषित करतो.
  • औद्योगिक कचरा: उद्योग अनेक प्रकारचे कचरा निर्माण करतात, रासायनिक किंवा अन्यथा, जे जवळच्या किंवा दूरच्या ठिकाणी टाकले जातात. त्यामुळे त्या भागातील माती प्रदूषित होऊन त्या भागात झाडे-झाडेही वाढू शकत नाहीत.
  • जैविक स्त्रोतांद्वारे मातीचे प्रदूषण: माती प्रदूषणाच्या जैविक स्रोत किंवा घटकांमध्ये ते सूक्ष्मजीव आणि अवांछित झाडे यांचा समावेश होतो ज्यामुळे मातीची सुपीकता कमी होते. या पदार्थांमध्ये, जीवाणू, विषाणू आणि इतर परजीवी यांसारखे हानिकारक जीव मातीत वाढतात.

 

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्राचा महापॅक
महाराष्ट्राचा महापॅक

Sharing is caring!

FAQs

किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोठे आढळते?

किनारपट्टीवरील गाळाची मृदा कोकण किनारपट्टी वर आढळते.

मृदेची धूप म्हणजे काय?

वारा व पाणी यांमुळे मृदेचा थर वाहून जातो, म्हणजे मृदेची धूप होते.