Marathi govt jobs   »   WRD Recruitment 2023   »   WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट
Top Performing

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट, दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट

WRD जलसंपदा विभाग 2023 भरती अपडेट: महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभागाने दि. 19 डिसेंबर 2023 रोजी लेखनिक वापरण्यासाठी परवानगी मागणाऱ्या उमेदवारांसाठी सूचना जारी केल्या आहेत. या लेखात WRD जलसंपदा विभाग 2023 भरती अपडेट बद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन

जलसंपदा विभाग भरती 2023 अंतर्गत विवध संवर्गातील एकूण 4497 पदांसाठी भरती होणार आहे. WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेटचे विहंगावलोकन आपण या लेखात तपासू शकता.

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट: विहंगावलोकन
श्रेणी लेटेस्ट पोस्ट
कार्यालय महाराष्ट्र शासन- जलसंपदा विभाग
भरतीचे नाव जलसंपदा विभाग भरती 2023
पदाचे नाव
  • वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब
  • निम्नश्रेणी लघुलेखक गट ब
  • कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क
  • भूवैज्ञानिक सहाय्यक गट क
  • आरेखक गट क
  • सहाय्यक आरेखक गट क
  • स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
  • प्रयोगशाळा सहाय्यक गट क
  • अनुरेखक गट क
  • दफ्तर कारकून गट क
  • मोजणीदार गट क
  • कालवा निरीक्षक गट क
  • सहाय्यक भांडारपाल गट क
  • कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क
एकूण रिक्त पदे 4497
अर्ज करण्याची पद्धत ऑनलाईन
निवड प्रक्रिया ऑनलाईन परीक्षा
नोकरीचे ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र
अधिकृत संकेतस्थळ http://wrd.maharashtra.gov.in/

 

WRD नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज
WRD नॉन टेक्निकल टेस्ट सिरीज

दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना

  • जलसंपदा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची सुविधा दि. 03.11.2023 ते दि.24.11.2023 पर्यंत उपलब्ध करून देण्यात आलेली होती. त्यानुसार ज्या दिव्यांग उमेदवारांना लेखनिकाची आवश्यकता आहे अशा उमेदवारांनी लेखनिकबाबतचे नमुना 1, 2 व 3 भरून Upload करणेबाबत Application मध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली होती. परंतु बऱ्याचशा उमेदवारांनी सदर नमुने Upload (सलंग्न) केले नसल्याचे दिसून आले.
  • ज्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मागणी केलेली आहे, अशा दिव्यांग उमेदवारांनी, जलसंपदा विभागाच्या https://wrd.maharashtra.gov.in या संकेतस्तळावरील ” दिव्यांग उमेदवारांसाठी मार्गदर्शन सुचना ” याचे अवलोकन करावे व सदर सुचनामध्ये नमुद दिव्यांगाबाबतचे प्रमाणपत्र, नमुना 1, 2 व 2 भरून दि.01.12.2023 पुर्वी wrdexamdivyang@gmail.com या ई-मेलवर पाठविण्याबाबत सुचना देवून देखील बराचश्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाच्या शैक्षणिक अर्हतेबाबतच्या अटीचे पालन केल्याचे दिसुन आलेले नाही.
  • लेखनिकाची शैक्षणिक अर्हता सदर परीक्षेकरीता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी असावी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्याने कमी असावी असे असणे आवश्यक आहे. परंतु ज्या दिव्यांग उमेदवारांनी सहर नमुने सादर केलेले आहेत अशातील बऱ्यांच उमेदवारांनी नमुना 3 लेखनिकाचे प्रमाणपत्रामध्ये लेखनिकाची शैक्षणिक अर्हता परीक्षेकरीता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा जास्त / समान असल्याचे दिसुन आले आहे. तरी अशा दिव्यांग उमेदवारांनी परीक्षेकरीता असलेल्या किमान शैक्षणिक पात्रतेपेक्षा कमी आणि उमेदवाराच्या शैक्षणिक पात्रतेपेक्षा एका टप्याने कमी असावी यांबाबतचा तपशील खालील तक्यानुसार देण्यात येत आहे. तरी ज्या दिव्यांग उमेदवारांनी जास्त शैक्षणिक अर्हता असलेले लेखनिकाचे प्रमाणपत्र सादर करणेत आले आहे त्यानी वरील सुचनेनुसार नवीन लेखनिकाची व्यवस्था करावी अन्यथा आपणा सदर लेखनिक वापरण्यास परवानगी दिली जाणार नाही.
  • तरी ज्या दिव्यांग उमेदवारांनी लेखनिकाची मागणी केलेली आहे. त्यांनी यापुर्वी नमुना 1, 2 व 3 पाठविले असतील तरी त्यांचे पुनश्च अवलोकन करावे व लेखनिकाची शैक्षणिक अर्हता तपासुन सुधारीत नमुना 1,2 व 3 तसेच दिव्यांगत्व प्रमाणपत्र wrdexamdivyang@gmail.com या ई मेलवर दिनांक 21.12.2023 पर्यंत पाठविणेत यावेत. तसेच परीक्षेस येताना सर्व नमुन्यांची मुळ प्रत घेवून यावी. ज्या उमेदवारांनी एका पेक्षा अधिक परीक्षेस अर्ज केला आहे, अशा उमेदवारांनी उपरोक्त नमुद सुचनेनुसार त्या त्या परीक्षाकेंद्रावर सदर स्वतंत्र नमुने सादर करावेत. सदर नमुने सुलभ संदर्भासाठी सोबत पुनश्च सादर करणेत येत आहेत.
  • उपरोक्त सुचनेनुसार सदर नमुने सादर न केल्यास तसेच परीक्षेस उपस्थित राहताना जे उमेदवार परीक्षेस येताणा सदर नमुने सोबत घेवन येणार नाहीत अशा दिव्यांग उमेदवारांस लेखनिक वापरणेस परवानगी देण्यात येणार नाही, याची सर्व दिव्यांग उमेदवारांनी नोंद घ्यावी.
  • लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या सर्व परीक्षार्थीना भरपाई वेळ हा प्रति तास वीस मिनिटे देण्यात येणार आहे.

दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना आणि नमुना 1, 2 व 3 PDF

लेखनिकाच्या शैक्षणिक अर्हतेकरीता मार्गदर्शन सुचना

लेखनिकाच्या शैक्षणिक अर्हतेकरीता मार्गदर्शन सुचना
पदाचे नाव  पद संख्या  
वरिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट ब पदवी किंवा त्यापेक्षा कमी
निम्नश्रेणी लघुलेखक गट ब 9वी किंवा त्यापेक्षा कमी
कनिष्ठ वैज्ञानिक सहाय्यक गट क पदवी किंवा त्यापेक्षा कमी
भूवैज्ञानिक सहाय्यक गट क 12वी किंवा त्यापेक्षा कमी
आरेखक गट क 10वी किंवा त्यापेक्षा कमी
सहाय्यक आरेखक गट क
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक गट क
प्रयोगशाळा सहाय्यक गट क 12वी किंवा त्यापेक्षा कमी
अनुरेखक गट क 10वी किंवा त्यापेक्षा कमी
दफ्तर कारकून गट क 12वी किंवा त्यापेक्षा कमी
मोजणीदार गट क
कालवा निरीक्षक गट क
सहाय्यक भांडारपाल गट क 9वी किंवा त्यापेक्षा कमी
कनिष्ठ सर्वेक्षण सहाय्यक गट क 10वी किंवा त्यापेक्षा कमी

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट: महत्वाच्या तारखा

जलसंपदा विभाग भरती 2023 महत्वाच्या तारखा: जलसंपदा विभाग भरती 2023 साठी नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख दिनांक 08 डिसेंबर 2023 आहे. इतर महत्त्वाच्या तारखांसाठी खालील तक्ता पहावा.

WRD भरती ऑनलाईन अर्ज लिंक 2023: महत्वाच्या तारखा
कार्यक्रम  तारीख 
जलसंपदा विभाग भरती 2023 अधिसुचना 01 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख 03 नोव्हेंबर 2023
जलसंपदा विभाग भरती 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 24 नोव्हेंबर 2023
नॉन क्रिमी लेयर तपशील अद्ययावत करण्यासाठी शेवटची तारीख 11 डिसेंबर 2023

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 परीक्षेचे स्वरूप

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

WRD Non-Tech Preparation Batch
WRD Non-Tech Preparation Batch

Sharing is caring!

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट, दिव्यांग उमेदवारांसाठी सूचना_5.1

FAQs

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती मला कोठे मिळेल?

WRD जलसंपदा विभाग भरती 2023 अपडेट बद्दल सविस्तर माहिती या लेखात दिली आहे.

WRD भरतीसाठी लेखनिकाची शैक्षणिक अर्हता काय हवी?

WRD भरतीसाठी लेखनिकाची शैक्षणिक अर्हता बद्दल माहिती या लेखात दिली आहे.

लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या सर्व परीक्षार्थीना भरपाई वेळ हा प्रति तास किती देण्यात येणार आहे?

लक्षणीय दिव्यांगत्व असलेल्या सर्व परीक्षार्थीना भरपाई वेळ हा प्रति तास वीस मिनिटे देण्यात येणार आहे.