Table of Contents
ZP परीक्षा विश्लेषण 2023
ZP परीक्षा विश्लेषण 2023: जिल्हा परिषद 2023 भरती अंतर्गत दिनांक 23 नोव्हेंबर 2023 रोजी पहिल्या शिफ्टमध्ये वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) या पदासाठी परीक्षा यशस्वीरीत्या घेण्यात आली आहे. शिफ्ट 1 ची परीक्षा आता संपली असल्यामुळे या परीक्षेचे सविस्तर विश्लेषण आपणास या लेखात उपलब्ध करून देण्यात आले आहे. परीक्षा दिलेल्या उमेदवाराच्या प्रतिसादानुसार वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची परीक्षा मध्यम स्वरुपाची होती. या लेखात 23 नोव्हेंबर 2023 रोजी झालेल्या पहिल्या शिफ्टचे ZP परीक्षा विश्लेषण 2023 देण्यात आले आहे. ज्यात विषयवार गुड अटेंम्ट (चांगले प्रयत्न), एकूण काठीण्य पातळी, परीक्षेत विचारण्यात आलेले प्रश्न इ. बद्दल माहिती दिली आहे.
ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन
ZP परीक्षेची काठीण्य पातळी, परीक्षेत कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारण्यात आले होते याबद्दल माहिती या लेखात देण्यात आली आहे. ZP परीक्षा विश्लेषण 2023 चे विहंगावलोकन खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
ZP परीक्षा विश्लेषण 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | परीक्षा विश्लेषण |
विभाग | जिल्हा परिषद |
भरतीचे नाव | ZP भरती 2023 |
पदाचे नाव | वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) |
लेखाचे नाव | ZP परीक्षा विश्लेषण 2023 |
ZP परीक्षा विश्लेषण 2023 | शिफ्ट 1, 23 नोव्हेंबर 2023 (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)) |
नकारात्मक गुणांकन पद्धती | लागू नाही |
परीक्षेचा कालावधी | 02 तास |
एकूण गुण | 200 |
ZP परीक्षेचे स्वरूप 2023
ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची घेण्यात येणार आहे. सदर परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते.
अ. क्र. | विषय | प्रश्नांची संख्या | गुण | कालावधी |
1 | मराठी भाषा | 25 | 50 | 02 तास |
2 | इंग्रजी भाषा | 25 | 50 | |
3 | सामान्य ज्ञान | 25 | 50 | |
4 | बौद्धिक चाचणी | 25 | 50 | |
एकूण | 100 | 200 |
ZP परीक्षा 2023: शिफ्टनुसार परीक्षेची वेळ
ZP परीक्षा 2023 ही 23 नोव्हेंबर 2023 रोजी तीन शिफ्ट मध्ये घेतली जाणार आहे. ZP पदाची शिफ्टनुसार परीक्षेची वेळ खाली देण्यात आली आहे.
शिफ्ट | परीक्षेची वेळ |
शिफ्ट 1 | सकाळी 09 ते 11 |
शिफ्ट 2 | दुपारी 12.30 ते 02.30 |
शिफ्ट 3 | संध्याकाळी 04.30. ते 06.30 |
ZP परीक्षा विश्लेषण 2023: गुड अटेंम्ट (शिफ्ट 1)
ZP भरती 2023 अंतर्गत (वरिष्ठ सहाय्यक (लिपिक)) पदाच्या परीक्षेची काठीण्य पातळी एकंदरीत मध्यम स्वरुपाची होती आणि परीक्षेत कोणतेही नकारात्मक गुणांकन पद्धती नव्हती त्यामुळे सर्व उमेदवारांनी जास्तीत जास्त प्रश्न सोडविणे अपेक्षित होते. गुड अटेंम्ट म्हणजे अश्या प्रश्नांची संख्या ज्याद्वारे आपण आपला कट ऑफ क्लिअर करू शकाल. सर्व उमदेवारांच्या सोईसाठी आम्ही खालील तक्त्यात विषयानुसार गुड अटेंम्ट आणि काठीण्य पातळी दिली आहे.
अ. क्र | विषय | गुड अटेंम्ट | काठीण्य पातळी |
1 | मराठी भाषा | 23-24 | सोपी |
2 | इंग्रजी भाषा | 22-23 | मध्यम |
3 | सामान्य ज्ञान | 22-23 | मध्यम |
4 | बौद्धिक चाचणी | 21-23 | मध्यम |
एकूण | 86-93 | मध्यम |
विषयानुरूप ZP परीक्षा विश्लेषण 2023 (शिफ्ट 1)
ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत मराठी भाषा, इंग्रजी भाषा, सामान्य ज्ञान व बौद्धिक चाचणी या विषयावर प्रत्येकी 25 याप्रमाणे 100 प्रश्न विचारण्यात आले होते. खाली आम्ही विषयानुसार विश्लेषण प्रदान केले आहे.
मराठी विषयाचे विश्लेषण
ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत मराठी विषयावर एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. मराठी विषयाची काठीण्य पातळी सोपी स्वरुपाची होती. यात प्रामुख्याने उताऱ्यावरील प्रश्न, अधोरेखित जागी योग्य शब्द, वाक्यांचा योग्य क्रम लावणे इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते. परीक्षेत विचारण्यात आलेले सर्व विभागांची माहिती खाली दिली आहे.
- उताऱ्यावरील प्रश्न – 4-5 प्रश्न
- मराठी व्याकरण
- काळ
- समानार्थी शब्द
- विरुद्धार्थी शब्द
- अधोरेखित जागी योग्य शब्द
- वाक्यांचा योग्य क्रम लावणे
- चुकीचा शब्द
- गाळलेल्या जागा भरा
इंग्रजी विषयाचे विश्लेषण
ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत इंग्रजी विषय सोपा ते मध्यम स्वरूपाचा होता. इंग्रजी विषयात Passage based Questions, Phrases, Para Jumble, इत्यादी टॉपिकस वर प्रश्न विचारण्यात आले होते.
सामान्य ज्ञान विषयाचे विश्लेषण
- ज्या ZP मध्ये परीक्षा आहे त्या संबंधित प्रश्न: 2 प्रश्न
- चालू घडामोडी वर प्रश्न: जास्त प्रश्न
- इतिहास 1 प्रश्न
- भूगोल
- राज्यघटना
- विज्ञान
- स्टॅटिक जी.के.
परीक्षेत आलेले प्रश्न खाली दिले आहेत
- अनुभव अवॉर्ड कोणत्या मंत्रालय ने दिला?
- पत्रकारितेचे जनक कोणाला म्हणतात?
- वैनगंगा नदी चे उपनद्या कोणते?
- एस सोमनाथ याचे आत्मचरित्र कोणत्या भाषेत आहेत?
- 2023 चे पहिले 3 महिनेचा जीडीपी वाढीचा दर किती आहे?
- सर्वधिक साखर कारखाने कोणत्या जिल्ह्यात आहेत?
- श्रीस्थानक कोणत्या जिल्ह्याचे टोपण नाव आहे?
- कशाला पांढरे सोने म्हणतात?
- सेमीकंडक्टर साठी करार कोणत्या देश सोबत केला आहे?
- 36 वा जिल्हा कोणता आहे?
बौद्धिक चाचणी विषयाचे विश्लेषण
ZP भरती 2023 अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक (लिपिक) पदाच्या परीक्षेत बौद्धिक चाचणी या विषयात एकूण 25 प्रश्न विचारण्यात आले होते. बौद्धिक चाचणी या विषयात प्रामुख्याने कोडी, बैठक व्यवस्था, अक्षरमाला, विधान व निष्कर्ष, पदावली, नफा व तोटा, शेकडेवारी इत्यादी घटकांवर प्रश्न विचारण्यात आले होते.
- नफा व तोटा – 2 प्रश्न
- टक्केवारी – 2 प्रश्न
- भागीदारी
- BODMAS (Simplification) – 2 प्रश्न
- Approximation – 1 प्रश्न
- वेळ व अंतर – 2-3 प्रश्न
- चुकीची मालिका – 3 प्रश्न
- सांकेतिक भाषा
- अक्षरमालिका
- नातेसंबंध
- विधान व निष्कर्ष
- बैठक व्यवस्था –
- कोडी (Puzzles) – 2 No
- अर्थपूर्ण शब्द
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
ZP भरती 2023 संबंधित इतर लेख | |
जिल्हा परिषद भरती 2023 | |
जिल्हा परिषद भरती परीक्षेचे स्वरूप आणि अभ्यासक्रम 2023 | जिल्हा परिषद वेतन 2023 |