Marathi govt jobs   »   Maharashtra Aroyga Vibhag Bharti 2023   »   ZP आरोग्य विभाग अभ्यासक्रम

ZP आरोग्य विभाग अभ्यासक्रम, पदानुसार अभ्यासक्रम तपासा

आरोग्य विभाग अभ्यासक्रम

गट क पदाच्या परीक्षेत 100 प्रश्न 200 गुणांसाठी विचारल्या जाणार आहे. विभागाशी निगडीत तांत्रिक / व्यावसायिक संवर्गातील पदांसाठी 80 टक्के गुण हे पदाशी निगडीत तांत्रिक / शैक्षणिक अर्हतेशी संबंधित असतील आणि उर्वरित 20 टक्के गुण हे मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान व गणित यांच्याशी निगडीत असतील. ज्या पदांसाठी शैक्षणिक अर्हता किमान पदवीधर आहे त्या पदांसाठी मराठी भाषा विषयक प्रश्न वगळता प्रश्नप्रत्रिकेतील सर्व प्रश्न इंग्रजी माध्यमामध्ये असतील.

गट ड अतांत्रिक पदांसाठी मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी याविषयावर प्रत्येकी 25 प्रश्न विचारण्यात येणार आहेत. गट ड संवर्गातील अकुशल कारागीर (परिवहन व एचईएमआर) पदाची परीक्षा एकूण 200 गुणांची होणार आहे. अकुशल कारागीर पदाच्या परीक्षेत मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी करिता करिता प्रत्येकी 5 प्रश्न याप्रमाणे व तांत्रिक ज्ञानावर आधारित 80 प्रश्न असे एकुण 100 प्रश्नांची 200 गुणांची ऑनलाईन परिक्षा राहील.

अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

मराठी, इंगजी, सामान्य ज्ञान, बौद्धिक चाचणी हे विषय प्रत्येक पदासाठी आवश्यक आहेत. त्यांचा सविस्तर अभ्यासक्रम खालील तक्त्यात दिला आहे.

आरोग्य विभाग अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम 2023
अ.क्र. विषयाचे नाव – इंग्रजी 
1 a Grammar (Synonyms, Autonyms, Spelling, Punctuation, Tense.)
b Vocabulary (Use of Idioms and Phrases and there meaning, Expressions)
c Fill in the blanks in sentence
d Simple Sentence structure
2 विषयाचे नाव – मराठी
a मराठी व्याकरण (वाक्य रचना, शब्दार्थ, प्रयोग, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द)
b भाषा सौंदर्य (उपमा, अलंकार, म्हणी व वाक्प्रचार यांचा अर्थ आणि वाक्यात उपयोग, सर्वसामान्य शब्दसंग्रह इत्यादी )
c प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
d योग्य जोड्या लावा
3 विषयाचे नाव – सामान्य ज्ञान 
a चालू घडामोडी (भारत आणि महाराष्ट्र)
b भारतीय इतिहास – नागरिकशास्त्र
c भारताचा भूगोल
d भारतीय संविधान
e सामान्य विज्ञान
f खेळ आणि संस्कृती
g माहितीचा अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015
h माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित मूलभूत ज्ञान
4 विषयाचे नाव – बौद्धिक चाचणी 
a अभियोग्यता चाचणी
b मूलभूत अंकगणित ज्ञान
c गणित (अंकीय, बीजगणित, भूमिती, सांख्यिकी)
d सामान्य विज्ञान (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, जीवशास्त्र आणि पर्यावरण विज्ञान)

निम्न श्रेणी लघुलेखक व उच्च श्रेणी लघुलेखक पदासाठी अतांत्रिक विषयांचा अभ्यासक्रम

अ.क्र. विषयाचे नाव – इंग्रजी 
1 a Spelling, Grammar, Simple Sentence structure, Use of common words
2 विषयाचे नाव – मराठी
a मराठी व्याकरण, सोपी वाक्य रचना नेहमीच्या शब्दांचा वापर, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी व वाक्य प्रचार, प्रसिद्ध पुस्तके आणि लेखक
3 विषयाचे नाव – सामान्य ज्ञान 
a दैनंदिन घटना, नेहमीचे अनुभव, धर्म, साहित्य, राजकारण शास्त्र, सामाजिक व औद्योगिक सुधारणा, क्रीडा या क्षेत्रातील महान व्यक्तींची कार्ये, सर्वसाधारणपणे भारताच्या विशेषतः महाराष्ट्राच्या भूगोलाची रुपरेषा यांवरील प्रश्न संगणक माहिती तंत्रज्ञान

महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.

महाराष्ट्र अभ्यास साहित्य

अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल

अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप

महाराष्ट्र महापॅक
महाराष्ट्र महापॅक

Sharing is caring!

ZP आरोग्य विभाग अभ्यासक्रम, पदानुसार अभ्यासक्रम तपासा_4.1