MPSC राज्यसेवा 2023
MPSC राज्यसेवा 2023: महाराष्ट्र राज्य सेवा आयोग (MPSC) ने 24 फेब्रुवारी 2023 रोजी MPSC राज्यसेवा अधिसूचना त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर म्हणजेच www.mpsc.gov.in वर प्रसिद्ध केली. MPSC राज्यसेवा, MPSC तांत्रिक अभियांत्रिकी सेवा, अन्न आणि औषध सेवा, निरीक्षक प्रमाणीकरण विज्ञान, इ. संवर्गासाठी MPSC राज्यसेवा प्राथमिक परीक्षा अधिसूचना 2023 प्रसिद्ध झाली आहे. MPSC राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2023 4 जून 2023 रोजी नियोजित आहे. MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 साठी एकूण 673 681 रिक्त जागा सोडण्यात आल्या आहेत. MPSC राज्यसेवा रिक्त जागा, पात्रता निकष, महाराष्ट्र नागरी सेवा परीक्षेच्या तारखा इत्यादी तपशील येथे पहा.
MPSC राज्यसेवा 2023: विहंगावलोकन
MPSC राज्यसेवा 2023 विहंगावलोकन: MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 ने एकूण 681 राजपत्रित पदांसाठी घोषणा केली आहे. खाली MPSC राज्यसेवा 2023 2023 परीक्षेचे विहंगावलोकन पहा.
MPSC राज्यसेवा 2023: विहंगावलोकन | |
संस्थेचे नाव | महाराष्ट्र लोकसेवा आयोग |
परीक्षेचे नाव | MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 |
MPSC नागरी सेवा रिक्त जागा | 681 |
पदे | विविध |
MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्वपरीक्षा | 3 जून 2023 |
अर्ज प्रक्रिया | ऑनलाईन |
परीक्षा | ऑफलाईन |
Official Website | mpsconline.gov.in |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023: MPSC ने 11 मे 2022 रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाईटवर MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी अधिकृत भरती अधिसूचना pdf जारी केली होती. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी एकूण 681 रिक्त पदे आहेत. MPSC नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2023, 4 जून 2023 रोजी नियोजित आहे. आपण या लेखात, MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ची अधिकृत अधिसूचना PDF, ऑनलाइन अर्ज, रिक्त जागा, पात्र निकष, वयोमर्यादा इ गोष्टी पाहू शकता.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना PDF
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अधिसूचना PDF:सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब), पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब), सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब), अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) आणि वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) या पदांसाठी संयुक्त पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून, पूर्व परीक्षेची सविस्तर अधिसूचना पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर Click करा.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 च्या महत्वाच्या तारखा
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 च्या महत्वाच्या तारखा: MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 शी संबंधित सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आल्या आहेत.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 च्या महत्वाच्या तारखा | |
Events | Dates |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अधिसुचना | 24 फेब्रुवारी 2023 |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अर्ज सुरु होण्याची तारीख | 2 मार्च 2023 |
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 अर्ज करण्यासाठी शेवटची तारीख | 03 एप्रिल 2023 |
MPSC नागरी सेवा एकत्रित पूर्व परीक्षेची तारीख 2023 | 04 जून 2023 |
MPSC नागरी सेवा एकत्रित प्रिलिम्स निकाल 2023 | ऑगस्ट 2023 |
MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023 | 07, 08 & 09 ऑक्टोबर 2023 |
MPSC स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 | 14 ऑक्टोबर2023 |
MPSC विद्युत अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2023 | 14 ऑक्टोबर 2023 |
MPSC निरीक्षक, वैधमापन शास्त्र मुख्य परीक्षा 2023 | 21 ऑक्टोबर 2023 |
MPSC अन्न आणि औषध प्रशासन सेवा मुख्य परीक्षा 2023 | 28 ऑक्टोबर 2023 |
MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 च्या रिक्त जागा वाढल्या
MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 च्या रिक्त जागा वाढल्या: MPSC राज्यसेवा अधिसुचना 2023 सोबत रिक्त पदाचा तपशील देखील जाहीर करण्यात आले आहे. MPSC राज्यसेवा रिक्त पदे 2023 मध्ये आता सहायक आयुक्त अन्न, गट अ पदाचा समावेश करण्यात आला आहे. यासंदर्भात 17 मार्च 2023 रोजी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने एक शुद्धिपत्रक जाहीर केले आहे. पदानुसार आणि संवर्ग नुसार रिक्त पदाचा तपशील खालील तक्त्यात देण्यात आले आहे.
MPSC राज्यसेवा परीक्षा 2022 द्वारे 623 रिक्त पदांची भरती होणार असून MPSC राज्यसेवा रिक्त पदे 2022 मधील आरक्षणनिहाय रिक्त पदे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
अ.क्र. | विभाग (संवर्ग) | रिक्त पदे |
1 | सामान्य प्रशासन विभाग (राज्य सेवा गट-अ व गट-ब) | 295 |
2 | पाणी पुरवठा व स्वच्छता, जलसंपदा, मृद व जलसंधारण विभाग (महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अव गट-ब) | 130 |
3 | सार्वजनिक बांधकाम विभाग (महाराष्ट्र विद्युत अभियांत्रिकी सेवा गट-ब) | 15 |
4 | अन्न व नागरी विभाग (निरीक्षक, वैधमापन शास्त्र, गट-ब) | 39 |
5 | वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्ये विभाग (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-ब) | 194 |
6 | सहायक आयुक्त, गट अ (अन्न व औषध प्रशासकीय सेवा, गट-अ) | 08 |
Total (एकूण) | 681 |
MPSC राज्यसेवा परीक्षा 2023 द्वारे 681 रिक्त पदांची भरती होणार असून MPSC नागरीसेवा रिक्त पदे 2023 मधील विवीध संवर्गातील आरक्षणनिहाय रिक्त पदे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून अधिसूचना PDF तपासा.
MPSC नागरी सेवा 2023 रिक्त पदे
17 मार्च 2023 रोजी जाहीर झालेले शुद्धिपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
MPSC नागरी सेवा 2023 शुद्धिपत्रक (17 मार्च 2023)
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी लागणारी शैक्षणिक अहर्ता
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 साठी लागणारी शैक्षणिक अहर्ता: उद्योग उपसंचालक (तांत्रिक), गट-अ सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-ब या संवर्गातील पदे वगळून इतर पदांसाठी मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी किया महाराष्ट्र शासनाने मान्य केलेली समतुल्य अहर्ता.
राज्यसेवा परीक्षा:
A. सहायक संचालक, महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- साविधिक विदयापीठाधी किमान 55 टक्क्यांसह वाणिज्य शाखेची स्नातक पदयों किया
- इन्स्टिटयूट ऑफ चार्टर्ड अकाऊंटस आफ इंडिया यांनी घेतलेली सनदी लेखापालाची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- इन्स्टिटयूट ऑफ कॉस्ट अँड वर्क्स अकाऊंटस यांनी आयोजित केलेली परिव्यय लेखाशास्त्राची अंतिम परीक्षा उत्तीर्ण किंवा
- साविधिक विदयापीठाची वाणिज्य मधील पदव्युत्तर पदवी किंवा
- अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेच्या मान्यताप्राप्त संस्थेमधून प्रशासन या विशेषज्ञतेसह पदवी (एम.बी.ए).
B. उद्योग अधिकारी (तांत्रिफ), गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- सांविधिक विद्यापीठ, अभियांत्रिको मधील (स्थापत्य अभियांत्रिकी तसेच स्वापत्य अभियांत्रिकी मधील विषयांच्या गटांशी संलग्न असलेल्या वास्तुविद्या, नगररचना इत्यादी विषयतिरिक्त किया तंत्रज्ञान पदवी किया
- विज्ञान शाखेतील सांविधिक विद्यापीठाची पदवी
C. सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी, गट-अ पदासाठी खालीलप्रमाणे अर्हता आवश्यक :
- यांत्रिकी किंवा स्वयंचलित्र (ऑटोमोबाईल) अभियांत्रिकीमधील किमान 4 वर्षांची पदवी
- मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला गिअर्स, हलकी मोटार वाहने आणि परिवहन वाहने (अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने) यांसह मोटार सायकल चालविण्यासाठी प्राधिकृत करणा-या सक्षम प्राधिकरणाने दिलेले वाहन चालविण्याचे वैध लायसन आवश्यक.
- मुख्य परीक्षेचा अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेला, अवजड मालवाहू वाहने किंवा यथास्थिती, अवजड प्रवासी वाहने, अथवा अवजड मालवाहू वाहने व अवजड प्रवासी वाहने ही दोन्ही वाहने चालविण्याचे वैध लायसन धारण करीत नसेल तर, परिवीक्षा कालावधी पूर्ण होण्यापूर्वी असे वाहन चालविण्याचे लायसन प्राप्त करणे अनिवार्य, अन्यथा सेवा समाप्त करण्यास पात्र असेल.
- कोणताही खंड न पडता वाहन चालविण्याच्या लायसनचे वेळोवेळी नुतनीकरण करणे आवश्यक राहील.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 वयोमर्यादा
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 वयोमर्यादा: MPSC राज्यसेवा अंतरंगात होणाऱ्या सर्व पदांसाठी कमीत कमी वयोमर्यादा 19 वर्ष असून अमागास पदाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वयोमर्यादा 40 वर्ष आहे, तर मागास प्रवर्गाच्या उमेदवारांसाठी जास्तीच जास्त वय वयोमर्यादा 45 वर्ष आहे.
- खुला प्रवर्ग – 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग – 18 ते 45 वर्षे
- खेळाडू – 18 ते 45 वर्षे
- दिव्यांग – 18 ते 45 वर्षे
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज शुल्क
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी अर्ज शुल्क: उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज करण्यापूर्वी अर्ज शुल्क तपासावे जे खाली दिले आहे.
- अराखीव (खुला): 544/- रुपये
- मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक व अनाथ: 344/- रुपये
- उपरोक्त परीक्षा शुल्का व्यतिरिक्त बँक शुल्क तसेच त्यावरील देयकर अतिरिक्त असतील.
- परीक्षा शुल्क ना-परतावा (Non-refundable) आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज लिंक
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज लिंक: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 साठी ऑनलाईन अर्ज आपणास 03 एप्रिल 2023 पर्यंत करायचे होते. MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज करण्यासाठी मुदत संपल्याने आता लिंक Inactive झाली आहे.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (निष्क्रिय)
MPSC राज्यसेवा निवड प्रक्रिया
MPSC राज्यसेवा निवड प्रक्रिया: प्रस्तुत परीक्षा खालील तीन टप्प्यामध्ये घेण्यात येईल:
- पूर्व परीक्षा गुण 400
- मुख्य परीक्षा गुण 800
- मुलाखत गुण 100
- राज्य सेवा पूर्व परीक्षा 2023 च्या निकालाच्या आधारे मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या आणि पूर्व परीक्षेच्या जाहिरातीमध्ये अर्हता व अन्य अटींची विहित दिनांकास किंवा त्यापूर्वी पुर्तता करणा-या उमदेवारास मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र समजण्यात येईल.
- मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी पात्र उमेदवाराने आयोगाकडून निश्चित करण्यात आलेल्या कालावधीत आयोगाच्या https://mpsconline.gov.in या संकेतस्थळाव्दारे फक्त ऑनलाईन पध्दतीने आवश्यक अर्ज/माहिती सादर करणे आवश्यक राहील.
- पूर्व परीक्षेच्या प्रवेशासाठी आयोगास अर्जाद्वारे सादर केलेल्या माहितीच्या आधारेच मुख्य परीक्षेकरीता आवश्यक अर्ज/माहिती विहित पध्दतीने सादर करता येईल.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 विविध केंद्रावर 03 जून 2023 रोजी होणार आहे. त्यासाठीचे प्रवेशपत्र परीक्षेच्या 07 ते 10 दिवस अगोदर उपलब्ध होणार आहे. जसे MPSC Rajyaseva Admit Card 2023 होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 प्रवेशपत्र(निष्क्रिय)
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका
राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 झाल्यानंतर काही दिवसात राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका जाहीर होईल जसे राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका जाहीर होईल तसे आम्ही या लेखात अपडेट करू.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 उत्तरतालिका (निष्क्रिय)
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 निकाल
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 निकाल: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 चा निकाल ऑगस्ट 2023 मध्ये जाहीर होईल MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 निकाल जाहीर झाल्यावर आम्ही या लेखात अपडेट करू.
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 निकाल(निष्क्रिय)
MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप
MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप: MPSC राज्यसेवा परीक्षेत योग्य दिशा मिळवण्यासाठी आपणास MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप माहिती असणे गरजेचे आहे. MPSC राज्यसेवा परीक्षेचे थोडक्यात स्वरूप खालीलप्रमाणे आहे.
- पूर्व परीक्षा – 400 गुण
- मुख्य परीक्षा – 800 गुण
- मुलाखत – 100 गुण
MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम
MPSC राज्यसेवा परीक्षेचा अभ्यासक्रम: जसे परीक्षेचे स्वरूप माहिती असणे आवश्यक आहे तसेच परीक्षेचा अभ्यासक्रम माहित असल्यास आपण आपल्या अभ्यासाचे नियोजन करू शकतो. MPSC राज्यसेवा परीक्षेचे स्वरूप व अभ्यासक्रम याबद्दल विस्तृत माहिती आपण खालील लेखाद्वारे घेऊ शकता.
MPSC राज्यसेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs
MPSC राज्यसेवा मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका PDFs: महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची MPSC परीक्षेत चांगले गुण मिळवण्यासाठी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेणे जास्त महत्वाचे आहे. परीक्षेत कशाप्रकारे प्रश्न विचारतात आणि सर्वात महत्वाचे कोणत्या विषयावर कसे प्रश्न विचारले जातात हे माहित असणे अतंत्य गरजेचे असते. त्या दृष्टीने, परीक्षेला सहाय्य होईल असे मागच्या वर्षांच्या प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण व मागील वर्षाच्या सर्व प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी खालील लेख तुम्हाला नक्कीच मदत करतील.
MPSC राज्यसेवा परीक्षेच्या मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका उत्तर की PDF सह | |
एमपीएससी राज्य सेवा पूर्व परीक्षेचा विषय आणि विषयनिहाय प्रश्न | एमपीएससी राज्य सेवा मुख्य परीक्षेचा विषय आणि विषयनिहाय वजन |
MPSC राज्यसेवा मागील वर्षांचा कट ऑफ
MPSC राज्यसेवा मागील वर्षांचा कट ऑफ: MPSC राज्यसेवा परीक्षेच्या अभ्यासातील सर्वात पहिला आणि महत्त्वाचा टप्पा म्हणजे मागील वर्षीचा कट ऑफ माहित असणे. यामुळे आपल्याला अभ्यासाचे नियोजन आणि गुणांचे ध्येय ठरविण्यात मदत होते. खालील लिंक वर क्लिक करून आपण MPSC राज्यसेवा परीक्षा मागील वर्षांचा कट ऑफ तपासू शकता.
MPSC राज्यसेवा मागील वर्षांचा कट ऑफ
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.