वन विभाग भरती 2023
वन विभाग भरती 2023: महाराष्ट्र वन विभागाने दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर केली. वन विभागाची परीक्षा 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 या कालावधीत घेण्यात आली होती. उमेदवार खाली दिलेल्या लिंकद्वारे आपली वन विभाग उत्तरतालिका 2023 डाउनलोड करू शकतात. महाराष्ट्र वन विभागाने विविध संवर्गातील एकूण 2417 पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 जाहीर केली. वनरक्षक भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 पासून सक्रीय करण्यात आली होती. या लेखात आपण वन विभाग भरती 2023 बद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत ज्यात वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना, महत्वाच्या तारखा, रिक्त पदे, शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज लिंक याबद्दल माहिती दिली आहे.
वन विभाग भरती 2023: विहंगावलोकन
महाराष्ट्र वन विभागाने एकूण 2417 पदांसाठी वन विभाग भरती जाहीर केली आहे. यासाठीउमेदवार अर्ज 10 जून 2023 ते 03 जुलै 2023 या कालावधीत ऑनलाईन अर्ज करू शकतात. वन विभाग भरती 2023 चा संक्षिप्त आढावा खालील तक्त्यात प्रदान करण्यात आला आहे.
वन विभाग भरती 2023: विहंगावलोकन | |
श्रेणी | सरकारी नोकरी |
विभाग | वन विभाग, महाराष्ट्र राज्य |
भरतीचे नाव | वन विभाग भरती 2023 |
पदांची नावे |
|
वन विभाग अधिसूचना 2023 | 08 जून 2023 |
एकूण रिक्त पदे | 2417 |
निवड प्रक्रिया |
|
ऑनलाईन अर्ज प्रक्रिया | 10 जून 2023 ते 03 जुलै 2023 |
परीक्षेची तारीख | 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 |
नोकरीचे ठिकाण | संपूर्ण महाराष्ट्र |
वनविभागाचे अधिकृत संकेतस्थळ | www.mahaforest.gov.in |
वन विभाग भरती 2023 अधिसूचना PDF
वनरक्षक भरती 2023 अधिसूचना PDF: 08 जून 2023 रोजी वन विभाग भरती 2023 अधिसूचना PDF जाहीर करण्यात आली. लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक पदाच्या भरतीसाठी वन विभाग भरती 2023 ची अधिकृत अधिसूचना जाहीर झाली होती. पदानुसार वेगवेगळ्या पदासाठी अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. सर्व पदांच्या अधिसूचना डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग भरती 2023 अधिसूचना | |
पदाचे नाव | अधिसूचना PDF |
Accountant (लेखापाल) | येथे क्लीक करा |
Forest Guard (वनरक्षक) | येथे क्लीक करा |
Surveyor (सर्वेक्षक) | येथे क्लीक करा |
Stenographer (लघुलेखक), Statistics Assistant (Junior and Senior) (सांख्यिकी सहाय्यक (कनिष्ठ व वरिष्ठ)), Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) | येथे क्लीक करा |
वन विभाग भरती 2023 भरती साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख वाढविण्यात आल्याची नोटीस डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग भरती 2023 मुदतवाढ नोटीस
वन विभाग भरती परीक्षेची तारीख व इतर महत्वाच्या तारखा
वन विभाग भरती परीक्षेची तारीख 2023: महाराष्ट्र वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक 10 जून 2023 रोजी सक्रीय झाली असून अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 जून 2023 03 जुलै 2023 आहे. वन विभाग भरती 2023 सर्व महत्वाच्या तारखा खालील तक्त्यात देण्यात आल्या आहे.
वन विभाग भरती 2023 – महत्वाच्या तारखा | |
कार्यक्रम | तारीख |
वन विभाग भरती 2023 अधिसूचना | 08 जून 2023 |
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज सुरु होण्याची तारीख | 10 जून 2023 |
वन विभाग भरती 2023 साठी अर्ज करण्याची शेवटची तारीख | 03 जुलै 2023 |
वन विभाग परीक्षा 2023 | 31 जुलै 2023 ते 11 ऑगस्ट 2023 |
वन विभाग निकाल 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वनरक्षक शारीरिक चाचणी 2023 | लवकरच जाहीर करण्यात येईल |
वन विभाग भरती 2023 मधील रिक्त पदांची संख्या
वन विभाग भरती रिक्त पदे 2023: महाराष्ट्रात वन विभागात लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल, सर्वेक्षक आणि वनरक्षक या सर्व संवर्गातील रिक्त पदांची भरती होणार असून पदानुसार रिक्त पदांचा तपशील खाली देण्यात आला आहे.
Post Name (पदाचे नाव) | Vacancy (रिक्त पदे) |
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी)) | 13 |
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) | 23 |
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य)) | 08 |
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) | 05 |
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) | 15 |
Surveyor (सर्वेक्षक) | 86 |
Accountant (लेखापाल) | 129 |
Forest Guard (वनरक्षक) | 2138 |
Total | 2417 |
वनरक्षक भरती 2023: अर्ज शुल्क
अर्ज शुल्क: वन विभाग भरती 2023 अंतर्गत प्रवर्गानुसार लागणारे अर्ज शुल्क खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: रु. 1000/-
- मागास प्रवर्ग: रु. 900/-
- माजी सैनिक: शून्य
वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक पात्रता निकष
वन विभाग भरती 2023 साठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा व शारीरिक निकष खाली देण्यात आले आहे.
शैक्षणिक पात्रता
Post (पदाचे नाव) | Education Qualification (शैक्षणिक पात्रता) |
Stenographer (Higher Grade) (लघुलेखक (उच्चश्रेणी)) |
|
Stenographer (Lower Grade) (लघुलेखक (निम्नश्रेणी)) |
|
Jr. Engineer (Civil) (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) |
|
Sr. Statistics Assistant (वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) |
|
Jr. Statistics Assistant (कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक) |
|
Surveyor (सर्वेक्षक) |
|
Forest Guard (वनरक्षक) |
|
Accountant (लेखापाल) |
|
वयोमर्यादा
वन विभाग भरती 2023 मधील वनरक्षक पदासाठी आवश्यक वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 27 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 32 वर्षे
इतर संवर्गातील रिक्त पदांसाठी वयोमर्यादा खालीलप्रमाणे आहे.
- सर्वसाधारण प्रवर्ग: 18 ते 40 वर्षे
- मागास प्रवर्ग: 18 ते 45 वर्षे
टीप: वन विभाग भरती 2023 मधील वनरक्षक पदाच्या अधिसूचनेत प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 32 वर्षे दर्शविण्यात आली होती पण आता यासंबंधी शुद्धीपत्रक जाहीर झाले असून आता प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादा 34 वर्षे करण्यात आली आहे. वन विभागाचे शुध्दीपत्रक डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लीक करा.
वन विभाग भरती 2023 प्राविण्यपात्र खेळाडूंसाठी कमाल वयोमर्यादेबद्दल शुध्दीपत्रक
शारीरक निकष
वन विभाग भरती 2023 मध्ये वनरक्षक पदास आवश्यक असणारे शारीरिक निकष खालीलप्रमाणे आहे.
मापदंड | पुरुष | महिला |
उंची | 163 सेमी | 150 सेमी |
छाती | 79 सेमी (84 सेमी फुगवून) | लागू नाही |
वजन | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात | वैद्यकीय मापानुसार उंची व वयाच्या योग्य प्रमाणात |
वनरक्षक पदासाठी उमेदवाराने दूरदृष्टी आणि जवळील दृष्टीचे व विना चष्म्याचे खालील निकष पूर्ण केले असावे.
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक
ऑनलाईन अर्ज लिंक: वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज लिंक दिनांक 10 जून 2023 रोजी सक्रीय झाली आहे. वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख 03 जुलै 2023 होती आता वन विभाग ऑनलाईन अर्ज लिंक निष्क्रिय करण्यात आली आहे.
वन विभाग भरती 2023 ऑनलाईन अर्ज लिंक (लिंक निष्क्रिय)
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज कसा करावा?
वन विभाग भरती 2023 साठी ऑनलाईन अर्ज करण्याच्या सर्व स्टेप्स खाली देण्यात आला आहे.
- सर्वप्रथम वन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळ @mahaforest.gov.in ला भेट द्या
- तिथे भरती प्रक्रिया या टॅब वर क्लीक करा.
- आता नवीन पेज ओपन होईल. तेथील ऑनलाईन लिंक वर क्लीक करा
- To Register समोरील क्लिक हिअर वर क्लीक करा.
- आता ऑनलाईन फॉर्म ओपन होईल.
- सर्व माहिती योग्यरित्या भरा.
- अर्ज शुल्क भरा व अर्जाची प्रिंट काढून घ्या.
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023: वन विभाग भरती 2023 अंतर्गत उमेदवारांची ऑनलाईन लेखी परीक्षा होणार आहे. स्पर्धात्मक लेखी परिक्षा टि.सी.एस. आयओएन (टाटा कन्सल्टन्सी सव्हिर्सेस लिमिटेड) यांचेमार्फत घेण्यात येणार आहे. या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 बद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023
वन विभाग अभ्यासक्रम 2023
वन विभाग अभ्यासक्रम 2023: वन विभाग परीक्षेच्या दृष्टीने प्रत्येक उमेदवाराला वन विभाग अभ्यासक्रम 2023 माहिती असणे गरजेचे आहे. तरच परीक्षेत चांगले यश मिळू शकते. वन विभागाच्या परीक्षेत प्रामुख्याने मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी या विषयावर प्रश्न विचारण्यात येतील. वन विभाग अभ्यासक्रम 2023 सविस्तर पणे जाणून घेण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग प्रवेशपत्र 2023
दिनांक 25 जुलै 2023 रोजी वन विभाग प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. सध्या लघुलेखक (उच्चश्रेणी), लघुलेखक (निम्नश्रेणी), कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, वरिष्ठ सांख्यिकी सहाय्यक, लेखापाल आणि सर्वेक्षक पदांचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आले आहे. वन विभाग प्रवेशपत्र 2023 डाउनलोड करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग उत्तरतालिका 2023
दिनांक 11 सप्टेंबर 2023 रोजी महाराष्ट्र वन विभागाने वन विभाग उत्तरतालिका 2023 जाहीर केली आहे. वन विभाग उत्तरतालिका 2023 डाउनलोड करायची लिंक, वन विभाग उत्तरतालिका कशी डाउनलोड करावी आणि ज्या उमेदवारांना उत्तरतालीकेवर काही आक्षेप असेल तर त्यांनी आक्षेप कसे घ्यावे याबद्दल माहिती मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
वन विभाग भरती 2023 ची निवड प्रक्रिया
निवड प्रक्रिया: वन विभाग भरती 2023 अंतर्गत विविध पदांची भरती केल्या जाणार असून याची पहिले ऑनलाईन परीक्षा होणार आहे. त्यानंतर वनरक्षक पदाची शारीरिक चाचणी घेण्यात येणार आहे. वन विभाग भरती 2023 मधील निवड प्रक्रियेचे टप्पे खालीलप्रमाणे आहे.
- ऑनलाईन परीक्षा
- शारीरिक चाचणी (फक्त वनरक्षक पदासाठी)
- कौशल्य चाचणी (फक्त लघुलेखक पदांसाठी)
- कागदपत्र तपासणी
- वैद्यकीय चाचणी
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळावा.
वन विभाग भरती 2023 शी संबंधित इतर लेख | |
वन विभाग मागील वर्षाच्या प्रश्नपत्रिका | वन विभाग भरती रिक्त पदे 2023 |
वन विभाग परीक्षेचे स्वरूप 2023 | वन विभाग वेतन 2023 |
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |