Table of Contents
Important rivers in Maharashtra: In this article you will get detailed information about Important Rivers in Maharashtra in Marathi. In Talathi, MPSC and State Saral Seva competitive exams we can find direct questions on Revers in Maharashtra. Here in this article we will see Origin, Length, Area, and Tributaries of Important Rivers.
Important Rivers in Maharashtra: Origin, Length, Area, and Tributaries | |
Category | Study Material |
Useful for | Competitive Exams |
Subject | Maharashtra Geography |
Article Name | Important Rivers in Maharashtra |
Important rivers in Maharashtra (Origin, Length, Area, and Tributaries)
Important rivers in Maharashtra: तलाठी, MPSC आणि इतर स्पर्धा परीक्षेत भूगोलाच्या विषयात महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यावर (Important rivers in Maharashtra) बऱ्याचद्या प्रश्न विचारले जातात. त्यामुळे या घटकाचा अभ्यास करणे खूप गरजेचे आहे. Rivers in Maharashtra घटकाचा अभ्यास परीक्षेच्या दृष्टीने हमखास गुण मिळवून देणारा ठरतो. महाराष्ट्रातील नद्यांचा (Rivers in Maharashtra) उगम कुठे होतो, महाराष्ट्रातील नद्यांची लांबी किती आहे, त्यांचे क्षेत्र किती आणि महत्वाचे म्हणजे त्यांच्या उपनद्या कोणत्या आहेत. ही सर्व महत्वाची माहिती आपण आजच्या या लेखात पाहणार आहोत.
Important Rivers in Maharashtra | महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्या (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या)
Important Rivers in Maharashtra: महाराष्ट्र राज्य नद्यांनी समृद्ध असे राज्य आहे. संपूर्ण भारतातील अत्यंत महत्त्वाच्या दोन नद्या (गोदावरी आणि कृष्णा) येथे उगम पावतात. नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाने महाराष्ट्राची जमीन सुपीक बनविली आहे आणि या नद्यांनी महाराष्ट्राच्या आर्थिक-राजकीय-सांस्कृतिक जडणघडणीत खूप मोठे योगदान दिले आहे. महाराष्ट्रातील नद्यांचे त्यांच्या वहनाच्या दिशेनुसार पूर्व वाहिनी, पश्चिम वाहिनी, दक्षिण वाहिनी आणि उत्तर वाहिनी असे वर्गीकरण करता येते.
MPSC च्या सर्व परीक्षांच्या दृष्टीने महाराष्ट्राची नदीप्रणाली (Rivers in Maharashtra) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे आणि या भागावर MPSC च्या सर्व परीक्षांमध्ये दरवर्षी अनेक प्रश्न विचारले जातात. यामध्ये नदीचा उगम, तिची लांबी, तिने व्यापलेले क्षेत्रफळ आणि तिच्या उपनद्या असे विविध प्रकारचे प्रश्न विचारले जातात. या लेखात आपण महाराष्ट्र राज्यातील महत्त्वाच्या नद्या (Important Rivers in Maharashtra), त्यांची उगमस्थाने, एकूण लांबी, क्षेत्रफळ आणि उपनद्या ही भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाची माहिती बघणार आहोत.
महाराष्ट्रातील प्रमुख नद्यांनी व्यापलेले खोरे:
- गोदावरी= 49.5%
- भीमा-कृष्णा = 22.6%
- तापी-पूर्णा = 17.6%
- कोकणातील नद्या = 10.7%
- नर्मदा = 0.5%
मराठी व्याकरण ओळख व व्याकरणाची व्याख्या
Narmada River System in Maharashtra | नर्मदा नदी प्रणाली
- उगम: – अमरकंटक, सातपुडा पर्वत रांग, मध्य प्रदेश
- लांबी: – एकूण = 1315 किमी महाराष्ट्रातील लांबी = 54 किमी
- विस्तार: – विंध्य पर्वत आणि सातपुडा पर्वत खचदारीतून वाहते.महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यातील वायव्य भागातून जाते.
- महाराष्ट्रातील उपनद्या: – डाव्या तीरावरून – उदई व देवगंगा
उजव्या तीरावरून – तवा
Tapi-Purna River System in Maharashtra | तापी-पूर्णा नदी प्रणाली
- उगम: – तापी = मुलताई, बैतुल मध्यप्रदेश (महादेव डोंगररांगा)
- लांबी: – एकूण = 724 किमी. महाराष्ट्रातील लांबी = 208 किमी
- विस्तार: – अमरावती àजळगावàधुळेàनंदुरबार (नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा तालुक्यात गुजरात मध्ये प्रवेश)
- क्षेत्रफळ: – 51504 किमी2 (भारतातील)
- महाराष्ट्रातील उपनद्या: – डाव्या तीरावरून – पूर्णा, गिरणा, बोरी, पांझरा, बुराई, वाघुर, अंजनी, शिवा.
उजव्या तीरावरून – अरुणावती, गोमाई, मोर, वाकी, गुळी, अनेर.
2.1. पूर्णा नदी
- उगम: – मेळघाट (अमरावती)
- प्रवाह: – अमरावती,अकोला, बुलढाणा, जळगाव
- उपनद्या: – डाव्या तीरावरून – नंदवन, भुलेश्वरी, शहानुर, चंद्रभागा, निपाणी
उजव्या तीरावरून – मोरणा, मणा, काटेपुर्णा, पेढी, उमा, नळगंगा, ज्ञानगंगा, विश्वगंगा, बाणगंगा
जीवशास्त्र भाग-1 (वनस्पतीची रचना व कार्ये)
Godavari River System in Maharashtra | गोदावरी नदी प्रणाली
- उगम: – नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर येथे
- लांबी: – एकूण = 1450 किमी महाराष्ट्रातील लांबी = 668 किमी
- क्षेत्रफळ: – एकूण= 313389 किमी2 महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 152588 किमी2
- प्रवाह: – नाशिक à अहमदनगर à औरंगाबाद à जालना à बीड à परभणी à नांदेड à तेलंगण à गडचिरोली
- उपनद्या: – डाव्या तीरावरून – दक्षिण पूर्णा, दुधना, मन्याड, कादवा, शिवना, खाम, दुधगंगा, प्राणहिता
उजव्या तीरावरून – दारणा, प्रवरा, सिंदफणा, मांजरा
3.1. वर्धा-वैनगंगा-पैनगंगा नदीप्रणाली
- गोदावरी नदीचे उपखोरे आणि विदर्भातील सर्वात महत्त्वाची नदीप्रणाली
- उगम: – वर्धा = महादेव डोंगररांगा, बैतुल, मध्य प्रदेश
वैनगंगा = शिवनी, मैकल डोंगर, मध्य प्रदेश
पैनगंगा = अजिंठा डोंगररांगा, बुलढाणा
- लांबी: – वर्धा = 455 किमी (राज्यातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी)
पैनगंगा = 676 किमी (विदर्भातील सर्वात लांब पूर्व वाहिनी नदी)
वैनगंगा = 295 किमी
- क्षेत्रफळ: – वर्धा-वैनगंगा-पैनगंगा खोरे = 46186 किमी2
- उपनद्या: –
A) वर्धा नदी: – बोर, वेण्णा, इराई (डाव्या तीरावरून)
रामगंगा, पैनगंगा, निरगुंडा (उजव्या तीरावरून)
B) वैनगंगा नदी: – चुलबंद, वाघ, गाढवी, खोब्रागडी (डाव्या तीरावरून)
कन्हान, मूल, सुर, बावनथडी (उजव्या तीरावरून)
C) पैनगंगा नदी: – अरुणावती, अडाण, विदर्भी, खुनी (डाव्या तीरावरून)
कयाधू (उजव्या तीरावरून)
महाराष्ट्राचा प्राकृतिक भूगोल-1 (महाराष्ट्रातील वने)
Bhima River System in Maharashtra | भीमा नदी प्रणाली
- उगम: – भीमाशंकर (पुणे जिल्हा)
- लांबी: – एकूण = 860 किमी महाराष्ट्रातील लांबी = 451 किमी
- क्षेत्रफळ: – एकूण= 77000 किमी2 महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 46184 किमी2
- प्रवाह: – पुणे, सोलापूर, अहमदनगर, सातारा, सांगली, बीड, उस्मानाबाद
- उपनद्या: – डाव्या तीरावरून – घोड, सीना
उजव्या तीरावरून – भामा, इंद्रायणी, मुळा-मुठा, नीरा
Krishna River System in Maharashtra | कृष्णा नदी प्रणाली
- उगम: – सह्याद्री पर्वतात महाबळेश्वर जवळ
- लांबी: – एकूण = 1401 किमी महाराष्ट्रातील लांबी = 282 किमी
- क्षेत्रफळ: – एकूण= 259600 किमी2 महाराष्ट्रातील क्षेत्रफळ = 28700 किमी2
- उपनद्या: – डाव्या तीरावरून – येरळा, भीमा
उजव्या तीरावरून – वेण्णा, कोयना, वारणा, पंचगंगा, वेदगंगा, घटप्रभा
या लेखात दिलेल्या माहितीच्या आधारे आपण महाराष्ट्रातील महत्त्वाच्या नद्यांची (उगम, लांबी, क्षेत्र, उपनद्या) उजळणी करू शकता.
महाराष्ट्रातील सर्व स्पर्धा परीक्षांसाठी ऑनलाईन क्लास, व्हिडिओ कोर्स, टेस्ट सिरीज, पुस्तके आणि इतर अभ्यास साहित्य खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून मिळवा.
सर्व स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य
सरळ सेवा जसे कि, कृषी विभाग भरती, तलाठी भरती, जिल्हा परिषद भरती व इतर सर्व परीक्षेचा पेपर देणाऱ्या विद्यार्थ्यासाठी Adda 247 मराठी आपणासाठी सर्व महत्वाच्या टॉपिक वर महत्वपूर्ण लेखमालिका प्रसिद्ध करणार आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्हाला या Adda 247 मराठीच्या लेखमालिकेचा नक्कीच फायदा होईल.
ताज्या महाराष्ट्र सरकारी नोकरीबद्दल माहितीसाठी | माझी नोकरी 2023 |
होम पेज | अड्डा 247 मराठी |
मराठीत चालू घडामोडी | चालु घडामोडी |
अड्डा 247 मराठीचे युट्युब चॅनल
अड्डा 247 मराठी अँप | अड्डा 247 मराठी टेलिग्राम ग्रुप