Table of Contents
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U): प्रधानमंत्री आवास योजना (PMAY) (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)) हा भारत सरकारचा एक उपक्रम आहे ज्यामध्ये 31 मार्च 2022 पर्यंत 2 कोटी (20 दशलक्ष) परवडणारी घरे बांधण्याचे लक्ष्य असलेल्या शहरी गरिबांना परवडणारी घरे दिली जातील. त्याचे दोन घटक आहेत: शहरी गरिबांसाठी प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) ( PMAY-U ) आणि प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण. महाराष्ट्रात Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) ही MHADA च्या अंतर्गत येते. MHADA भरती 2021 ची परीक्षा नोव्हेंबर महिन्यात होण्याची शक्यता आहे. 14 संवर्गाकरीता किमान शैक्षणिक अर्हता हा निकष विचारात घेऊन 7 क्लस्टर्स बनविण्यात आले असून, एका क्लस्टर करीता एकच परिक्षा घेण्यात येणार आहे. म्हाडा भरतीच्या पेपरमध्ये सामान्य ज्ञान विषयावर एकूण 50 विचारले जातील. त्यामुळे आगामी MHADA च्या परीक्षेत Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) यावर प्रश्न विचारण्याची शक्यता आहे. आज या लेखात आपण Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) योजनेचा इतिहास, या योजनेची व्याप्ती, याचा लाभ कोणाला मिळू शकतो आणि अंमलबजावणी पद्धत, याबद्दल माहिती पाहणार आहोत.
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) | प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U): Study Material For MHADA Exam 2021
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U): पंतप्रधान आवास योजना (नागरी) (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)) हा कार्यक्रम गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन मंत्रालया (MoHUPA) द्वारे सुरू करण्यात आला. ह्या अभियानाच्या उद्दिष्टांच्या अंतर्गत, 2022 पर्यंत म्हणजेच जेव्हा आपल्या देशाच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत आहेत, सर्वांना निवास मिळण्याची तरतूद केली जाईल. हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्ट्यांतील लोकांसाठी खाली नमूद केलेल्या योजनांच्या माध्यमातून घराच्या गरजा पूर्ण करू इच्छितेः
- झोपडपट्टीची जमीन हा स्त्रोत वापरून खाजगी विकासकांच्या सहभागाने झोपडपट्टी धारकांचे पुनर्वसन
- क्रेडिट लिंक्ड अनुदानाच्या माध्यमातून दुर्बल घटकांसाठी परवडणा-या घरांना प्रोत्साहन.
- सार्वजनिक आणि खाजगी क्षेत्रांच्या भागीदारीतून स्वस्त/परवडणारी घरे.
- लाभार्थींच्या पुढाकाराने करण्यात येणारी खाजगी घरबांधणी किंवा सुधारणा यासाठी अनुदान.
या लेखात प्रधानमंत्री आवास योजनेबद्दल (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)) माहिती दिली आहे.
म्हाडा ऍक्ट 1976, म्हाडाचा इतिहास, उद्दिष्ट आणि रचना
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)- History | प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U)- इतिहास
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)- History: भारतातील सार्वजनिक गृहनिर्माण कार्यक्रमाची सुरुवात स्वातंत्र्यानंतर लगेचच निर्वासितांच्या पुनर्वसनाने झाली. 1960 पर्यंत उत्तर भारतातील विविध भागांत सुमारे पाच लाख कुटुंबांना घरे देण्यात आली होती. 1957 साली, या योजनेचा दुसरा टप्पा राबविण्यात आला.
1985 मध्ये तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांनी इंदिरा आवास योजना (IAY) लाँच केल्यामुळे, भारतातील सार्वजनिक गृहनिर्माण कार्यक्रमाला चालना मिळाली. SC/ST आणि अल्पसंख्याक लोकसंख्येला लक्ष्य करणारा ग्रामीण गृहनिर्माण कार्यक्रम म्हणून IAY लाँच करण्यात आला. सर्व दारिद्र्यरेषेखालील (बीपीएल) लोकसंख्येचा समावेश करण्यासाठी हा कार्यक्रम हळूहळू वाढवण्यात आला.
ग्रामीण आणि शहरी गरिबांच्या घरांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी भारत सरकारच्या सततच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून, परवडणारी घरे उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने प्रधानमंत्री आवास योजना (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U))जून 2015 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केली,
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) अंतर्गत, केंद्र सरकारकडून ₹ 2 लाख कोटी (US$27 अब्ज) च्या आर्थिक सहाय्यातून 2022 पर्यंत शहरी भागात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक आणि कमी उत्पन्न गटांसह शहरी गरिबांसाठी 2 कोटी घरे बांधण्याचे प्रस्तावित आहे.
Scope of Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) | प्रधानमंत्री आवास योजना- शहरी (PMAY-U) ची व्याप्ती
Scope of Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U): Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) ची व्याप्ती खालील मुद्यावरून स्पष्ठ होते.
- 2015-2022 दरम्यान शहरी भागांसाठी “सर्वांसाठी गृहनिर्माण” हे अभियान राबवण्यात येत आहे. हे अभियान राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या माध्यमातून, पात्र असलेल्या सर्व कुटुंबांना/लाभार्थींना 2022 पर्यंत घरे प्रदान करण्याच्या कार्याची अंमलबजावणी करणा-या संस्थांना केंद्रीय मदत देईल.
- हे अभियान (क्रेडिट लिंक्ड अनुदान हा घटक वगळता) केंद्र शासन पुरस्कृत योजना (Centrally Sponsored Scheme – CSS) म्हणून राबविण्यात येईल. क्रेडिट लिंक्ड अनुदान हा घटक केंद्रीय क्षेत्र योजना म्हणून राबवण्यात येईल.
- सर्व घटकांचा समावेश असलेल्या अभियानाची अंमलबजावणी 17.06.2015 पासून सुरू झाली आणि 31.03.2022 पर्यंत राबविण्यात येईल.
Beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) | PMAY-U योजनेचे लाभार्थी
Beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U): Beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana- Urban चे लाभार्थी याचे काही निकष आहेत त्या निकषांच्या आधारावर त्यांना याचा लाभ मिळू शकतो. MHADA च्या पेपरमध्ये यावरून पण प्रश्न विचारल्या जाऊ शकतो जसे की, LIG म्हणजे काय? त्यांच्या उत्पन्नाची मर्यादा किती आहे? Beneficiaries of Pradhan Mantri Awas Yojana- Urban च्या लाभार्थ्याचे निकष खालीलप्रमाणे आहे
- हे अभियान शहरातील गरिबांसाठी तसेच झोपडपट्टीधारकांसाठी घराच्या गरजा पूर्ण करू इच्छिते. एक झोपडपट्टी म्हणजे अतिशय छोट्या परिसरात किमान 300 लोकांचे वास्तव्य किंवा सुमारे 60 – 70 कुटुंबांचे आरोग्यासाठी हानीकारक आणि दाटीवाटीने अयोग्यरित्या बांधलेल्या सदनिकांमधे वास्तव्य जिथे साधारणपणे स्वच्छता आणि पिण्याचे पाणी यासारख्या पायाभूत सुविधांची उणीव असते.
- लाभार्थींमधे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically weaker section – EWS) आणि अल्प उत्पन्न गट (low-income groups – LIGs) यांचा समावेश होतो. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा EWS साठी 3 लाखापर्यंत आणि LIG साठी 3-6 लाखापर्यंत आहे. EWS गटातील लाभार्थी अभियानाच्या चारही योजनांकडून मिळणा-या सहाय्यासाठी पात्र आहेत. तर LIG गट केवळ क्रेडिट लिंक्ड अनुदान योजना (Credit linked subsidy scheme – CLSS) या अभियानातील घटकाच्या अंतर्गत पात्र आहे.
- या योजने अंतर्गत EWS किंवा LIG लाभार्थी म्हणून निश्चित करण्यासाठी, व्यक्तिगत कर्ज घेऊ इच्छिणारा अर्जदार उत्पन्नाचा पुरावा म्हणून स्वतःचे प्रमाणपत्र/प्रतिज्ञापत्र सादर करेल.
- लाभार्थी कुटुंबात पती, पत्नी, अविवाहित मुलांचा आणि/किंवा अविवाहित मुलींचा समावेश असेल.
- या अभियाना अंतर्गत केंद्रीय मदत मिळवण्यास पात्र ठरण्यासाठी भारताच्या कुठल्याही भागात लाभार्थी कुटुंबातील त्याच्या/तिच्या नावाने किंवा त्याच्या/तिच्या कुटुंबातील कुठल्याही व्यक्तीच्या नावाने पक्क्या घराची मालकी असता कामा नये.
- राज्य/केंद्रशासित प्रदेश, स्वतंत्र अधिकारात एक अंतिम तारीख ठरवू शकतात ज्यामधे लाभार्थी या योजने अंतर्गत लाभ घेण्यास पात्र ठरण्यासाठी त्या नागरी क्षेत्राचे रहिवासी असणे आवश्यक आहे.
झोपडपट्टीचा दशकातील वाढीचा दर 34% असून, या झोपडपट्ट्यांमधील कुटुंबीयांचा आकडा 18 दशलक्षपर्यंत जाईल असा अंदाज आहे. झोपडपट्टीत न राहणा-या शहरातील 2 दशलक्ष गरीब कुटुंबीयांचा या अभियाना (Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)) अंतर्गत समावेश करण्याचा प्रस्ताव आहे. त्यामुळे नवीन अभियानाच्या माध्यमातून एकूण 20 दशलक्ष घरांची कमतरता दूर करण्याचे उद्दिष्ट आहे.
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)- Implementation Methodology | PMAY-U अंमलबजावणी करण्याची पद्धती
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)- Implementation Methodology: Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) यात चार मुख्य योजनांच्या माध्यमातून या अभियानाची अंमलबजावणी लाभार्थी, ULBs आणि राज्यशासनाला पर्याय देऊन केली जाईल. या चार योजना खालीलप्रमाणे.
स्वाभाविक स्थितीमध्ये (इन सितु) झोपडपट्टी पुनर्विकास
Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U) यात पात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांना घरे देण्यासाठी जमिनीचा स्त्रोत म्हणून वापर करणे ही संकल्पना घेऊन खाजगी क्षेत्राच्या सहभागाने ह्या योजनेची अंमलबजावणी केली जाईल. केंद्रसरकार आणि राज्यसरकार/ नागरी स्थानिक संस्था /खाजगी जमिनीवरील झोपडपट्टया, पात्र असलेल्या सर्व झोपडपट्टीधारकांना घरे देण्यासाठी “in-situ” पुनर्विकासाला घेतल्या गेल्या पाहिजेत. अशाप्रकारे पुनर्विकास केलेल्या झोपडपट्ट्या अनिवार्यरित्या डिनोटिफाईड केल्या गेल्या पाहिजेत.
या सर्व प्रकल्पांमधे पात्र असलेल्या झोपडपट्टी धारकांसाठी बांधलेल्या सर्व घरांसाठी सरासरी एक लाख रूपये प्रति घर असे अनुदान ग्राह्य ठरेल.
कोविड-19 स्पर्धा परीक्षांसाठी महत्वाची माहिती
क्रेडिट लिंक्ड अनुदानाच्या माध्यमातून स्वस्त घरे
क्रेडिट लिंक्ड अनुदानाच्या अंतर्गत आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांचे (EWS) आणि अल्प उत्पन्न गटाचे (LIG) लाभार्थी बँकेकडून, हाऊसिंग फायनान्स कंपन्यांकडून आणि इतर संस्थांकडून नवीन बांधकामासाठी आणि वाढीव गृहनिर्मिती म्हणून विद्यमान घरांची सुधारणा करण्यासाठी गृहकर्ज घेऊ शकतात. क्रेडिट लिंक्ड अनुदानासाठी 6 लाखापर्यंतची कर्जे पात्र असतील आणि अशा कर्जाच्या रकमेवरील 6.5 % दराने व्याजासाठी अनुदान उपलब्ध होईल. याची मुदत 15 वर्षे किंवा कर्जाची मुदत यापैकी जी कमी असेल त्यानुसार ठरेल. व्याजाच्या अनुदानाची नेट प्रेझेंट व्हल्यू (NPV) 9 % सवलतीच्या दराने मोजली जाईल. 6 लाख रूपयांपेक्षा अधिक घेतलेल्या अतिरिक्त कर्जासाठी विनाअनुदानित दर लागेल. व्याजाचे अनुदान लाभार्थींच्या कर्ज खात्यात कर्ज देणा-या संस्थांच्या माध्यमातून आगाऊ जमा केले जाईल. परिणामी इफेक्टिव्ह हाऊसिंग लोन (प्रभावी गृह कर्ज) आणि इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट (समान मासिक हप्ता) (EMI) कमी होईल.
या घटका अंतर्गत बांधण्यात येणा-या घरांचा कार्पेट एरिया (चटई क्षेत्र) EWS साठी 30 चौ.मी पर्यंत आणि LIG साठी 60 चौ.मी पर्यंत असले पाहिजे. याचा अर्थ असा की जर चटई क्षेत्रांची संबंधित मर्यादा ओलांडली तर या घटकांतर्गत असलेल्या लाभांचा फायदा घेण्यासाठी लाभार्थी पात्र ठरणार नाहीत.
या योजने अंतर्गत EWS / LIG गटातील लाभार्थींपैकी सफाई कामगार, महिला (विधवांना विशेष प्राधान्य), अनुसूचित जाती/अनुसूचित जमाती/इतर मागासवर्गीय, अल्पसंख्याक, विकलांग आणि ट्रान्सजेंडर व्यक्ति यांना प्राधान्य दिले जाईल.
भागीदारी माध्यमातून स्वस्त/परवडणारी घरे
हे अभियान राज्ये/केंद्रशासित प्रदेश/शहरे यांच्या विविध भागीदारी अंतर्गत EWS खालील बांधलेल्या प्रत्येक घरास 1.5 लाख रूपये आर्थिक मदत प्रदान करेल. परवडणा-या गृहनिर्माण प्रकल्पामधे (EWS, LIG आणि HIG इत्यादी) वेगवेगळ्या श्रेणींसाठी मिश्रप्रकारची घरे असू शकतात. परंतु प्रकल्पातील किमान 35% घरे ही EWS श्रेणीसाठी असतील आणि एका प्रोजेक्टमधे किमान 250 घरे असल्यास हे प्रकल्प केंद्रीय आर्थिक मदत मिळवण्यासाठी पात्र असतील
लाभार्थीच्या पुढाकाराने खाजगी घर बांधणीसाठी अनुदान
जर EWS गटातील कुटुंबे या अभियानातील इतर कुठल्याही घटका अंतर्गत लाभ घेऊ शकत नसतील तर या गटाखालील अनुदान EWS कुटुंबांना नवीन घरे बांधण्यासाठी किंवा त्यांच्या सध्याच्या घरात सुधारणा करण्यासाठी व्यक्तिगतरित्या देण्यात येईल. अशी कुटुंबे रूपये 1.5 लाखापर्यंत केंद्रीय मदतीचा लाभ घेऊ शकतात आणि HFA PoA मधे सहभागी असतील. अस्तित्वात असलेल्या घरापेक्षा किमान 9.0 चौ.मी अतिरिक्त चटई क्षेत्र, ‘लाभार्थींच्या पुढाकाराने बांधकाम’ या अभियाना अंतर्गत केंद्रीय मदतीस पात्र असावे लागेल.
या घटका अंतर्गत सहाय्य घेऊ इच्छिणारा लाभार्थी आपल्या उपलब्ध जमिनीच्या मालकीच्या दस्ताऐवजांसह नागरी स्थानिक संस्थांकडे (ULBs) अर्ज करतील. असे लाभार्थी झोपडपट्टीत किंवा झोपडपट्टी बाहेरही रहात असतील. पुनर्विकास न झालेल्या झोपडपट्टीत राहणारे लाभार्थी, जर त्यांचे घर कच्चे किंवा अर्धवट पक्क्या बांधकामाचे असेल तर या घटका अंतर्गत येऊ शकतात.
Study material for MHADA Exam 2021 | MHADA भरती 2021 परीक्षेसाठी अभ्यास साहित्य
Study material for MHADA Exam 2021: म्हाडा भरती 2021 मध्ये सामान्य ज्ञान विषयाला चांगले वेटेज आहे. त्यामुळे या विषयाचा अचूक व पक्का अभ्यास असणे आवश्यक आहे. हा विषय तुम्हाला परीक्षेत यश मिळऊन देऊ शकतो. MHADA परीक्षेत सर्वसाधारण पदे (Non Technical Post) मध्ये प्रत्येक विषयाला 50 गुण आहेत. त्याचा विचार करता सर्व विषय कव्हर करण्याचा प्रयत्न Adda 247 मराठी करणार आहे. त्या अनुषंगाने मराठी, इंग्लिश व सामान्य ज्ञान या विषयावर काही लेख (Study material for MHADA Exam 2021) प्रसिद्ध केले आहे. त्याच्या सर्व लिंक तुम्ही खालील तक्त्यात पाहू शकता आणि दररोज यात भर पडणार आहे. त्यामुळे तुम्ही Adda 247 मराठी च्या अधिकृत वेबसाईट ला भेट द्या. यामुळे तुम्हाला आगामी होणाऱ्या म्हाडा (MHADA) व जिल्हा परिषदेच्या पेपर मध्ये जास्त गुण मिळवण्यास मदत होईल.
FAQs: Pradhan Mantri Awas Yojana- Urban (PMAY-U)
Q1. PMAY-U ची सुरवात कधी झाली?
Ans. PMAY-U ची सुरवात 2015 पासून झाली
Q2. EWS म्हणजे काय?
Ans. आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (Economically weaker section – EWS).
Q3. LIG म्हणजे काय?
Ans. अल्प उत्पन्न गट (low-income groups – LIG).
Q4. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट मला कुठे बघायला मिळतील?
Ans. MHADA भरती 2021 चे सर्व अपडेट तुम्हाला Adda247 मराठी या वेबसाईट वर बघायला मिळेल.
Adda247 मराठी App | Add247Marathi Telegram group
YouTube channel- Adda247 Marathi
केवळ सरावच परीक्षेत चांगले गुण मिळण्यास मदत करू शकतो